daily horoscope

शनिवार 23 जानेवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in
शनिवार 23 जानेवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य

शनिवार 23 जानेवारी  आज चंद्ररास वृषभ दिवसरात्र.  चंद्र नक्षत्र कृतिका 21:31 पर्यंत  व नंतर रोहिणी.

daily horoscope

 

वरील रास व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

आज रविचा श्रवण नक्षत्रात प्रवेश  27:59. (. वाचा मकर राशीमधे येणारी नक्षत्रे  उत्तराषाढा चरण 2, 3, 4..श्रवण चरण 1, 2, 3, 4 .. धनिष्ठा 1, 2..) श्रवण नक्षत्रातील रविचा फायदा घ्या.

मेष :–आज तुमच्या पैशाचा होणारा खर्च विशेष कारणी लागणार नाही. चैनीच्या अनावश्यक वस्तूंची खरेदी करण्याचा मोह आवरणार नाही. प्रकृतीच्या दृष्टीने आज आपल्याला समाधान मिळणार नाही.

वृषभ :–पोटाचा कोणताही विकार असलेल्यांनी दुर्लक्ष न करता डाँक्टरांचा सल्ला घ्यावा. महिलांना सासरकडून व पुरूषांना सासुरवाडीकडून आश्चर्यजनक लाभ होईल. बहिणींना बंधुराजांकडून एखादी गोडशी भेट मिळेल.

मिथुन :–ज्या ज्या गोष्टींची मनात इच्छा दबलेली आहे त्यांची पूर्तता होण्याचे मार्ग सुकर होतील. व्यावसायिकांना व्यवसायात आर्थिक भरभराट व बरकत येत असल्याचे जाणवेल. महत्वाच्या कामासाठी जिल्ह्याबाहेर लहानशा प्रवास करावा लागेल.

कर्क :–राजकीय मंडळीनाी आपले हित कशात आहे याचा विचार करावा. सुखाचे मार्ग मोकळे होतील व नोकरीत ज्या अधिकारांची अपेक्षा करत होता ते अधिकार प्राप्त होणार असल्याची कुणकुण लागेल.

सिंह :–महाअधिकाराची संधी चालून येईल. सामाजिक कार्य करणार्‍यांना आपल्या कर्तृत्वाने इतरांकडून मान मिळेल व कौतुक होईल. आनंदाच्या भरात आत्मविश्वास डळमळू देऊ नका. आज कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल.

कन्या:–आज लहानश्या कारणानेही मन दुखावले जाईल. रागावर नियंत्रण मिळवा तरच त्रास होणार नाही. तरूणाची बिघडलेली आर्थिक घडी बसू लागेल व तसे संकेत मिळतील. पूर्वीच्या अनुभवावर आज गुंतवणूक करण्याची तीव्र इच्छा होईल पण करू नये.

तूळ :–वादग्रस्त विषयावरील चर्चेमुळे मानसिक त्रास होईलच पण त्याहीपेक्षा आर्थिक नुकसान होईल. लहान कामाच्या आँर्डर मुळे त्याच्याबरोबर मोठे काम मिळेल. वडीलांच्या सल्ल्याने आजचे निर्णय घ्या.

वृश्र्चिक :–भागिदारीच्या व्यवसायात अचानक मन नाराज करणारे प्रसंग घडतील. सामाजिक स्तरावर तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीची निवड होईल. शाळा काँलेजमधील विद्यार्थ्यांनी स्वत:ला पेलतील एवढाच उड्या माराव्या. फुकट बडेजाव करू नये.

धनु :–नोकरीतील कामाचा ताण वाढेल. मनाची प्रसन्नता आज नेहमीसारखी राहणार नाही तरी स्वत:हून मनाची शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करावा. मोठ्या हाँस्पिटलमधील डाँक्टर्सना काही प्रसंगामुळे मानसिक त्रास संभवतो.

मकर :–प्रेमाच्या व्यवहारात तणावपूर्ण वातावरण राहील. गैरसमजाच्या वातावरणाने नात्यात संशय निर्माण होईल. नोकरीत अचानक ज्येष्ठ पदावरील अधिकार्यांचे अधिकार काढून घेतले जातील किंवा तशा प्रकारची कारवाई करण्याची सूचना मिळेल.

कुंभ :–आज कोणताही गोष्ट बुद्धीच्या जोरावर तपासू नका. आईकडील नात्यातून आनंदाची बातमी कळेल. लहान भावाच्या प्रेमाखातर आज तुमचा खिसा चांगलाच रिकामा होणार आहे. तरूणाच्या नावावर एखादा पराक्रम जमा होईल.

मीन :–व्यवसायिक शत्रू तुमची मानहानी करण्यासाठी कांहीतरी युक्ती काढतील. सरकारी नियमात अडकणारी कृत्ये आपल्या हातून होत नसल्याची खात्री करून घ्या. आजारी व्यक्तीना आपल्या दुखण्याचा जोर कमी होत असल्याचे जाणवेल.

 

| शुभं-भवतु ||

 

One thought on “शनिवार 23 जानेवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *