daily horoscope

शुक्रवार 22 जानेवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in
शुक्रवार 22 जानेवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य

शुक्रवार  21 जानेवारी चंद्ररास मेष 25:23 पर्यंत व नंतर वृषभ. चंद्रनक्षत्र भरणी 18:38 पर्यंत व नंतर कृतिका. आजचा दिवस 18:38 पर्यंत चांगला आहे. त्यानंतर महत्वाची कामे करू नयेत.

daily horoscope

 

वरील रास व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :– निर्णय घेण्यात फारच लवचिकता राहील. आरोग्याच्या बाबतीत बेजबाबदारपणे वागल्याने होणार्‍या त्रासासाठी डाँक्टरांचा इलाज करावा लागेल. मावस भावंडाकडून आनंदाची बातमी कळेल. परदेशी जाणार्‍यांचे बेत पक्के होतील.

वृषभ :–कितीही शांत रहायचा विचार केलात तरी आज कोणत्यातरी कारणाने मनस्ताप होणार आहे. हातातील पैशांना अचानक मार्ग सापडेल व अनपेक्षित खर्च निघेल. लहान मुलांना कुत्र्या मांजराकडून दुखापत होण्याची भिती आहे.

मिथुन :–आज तुमच्या मनाला बोचणी लावणार्‍या घटना घडणार आहेत तरी त्यांचा त्रास किती करून घ्यायचा याचाच विचार करा. राजकीय क्षेत्रात तुमच्या विरोधातील  मंडळी विनाकारण गाँसिपींग करतील.

कर्क :–महिलांना आज एकदम आनंदाचा व सुखाचा अनुभव येईल. व्यवसायात लाभदायक घटनांचा अनुभव येईल. खाजगी क्षेत्रातील पदधिकार्यांनी आपल्या बोलण्याचा रोख स्पष्ट ठेवावा. जेष्ठांनी चालताना आपला तोल जाणार नाही याची काळजी घ्यावी.

सिंह :– व्यवसायातील मागिल उधारी वसूल होऊ लागेल. प्रेमाच्या व्यवहारात अडचणी निर्माण होऊन नात्यात संशयाचे वातावरण राहील. परदेशी असलेल्या नोकरदार मुलांना वैयक्तिक जीवनात अडचणी जाणवतील व घरची ओढ वाढेल.

कन्या :–मोठ्या भावंडाची भेट होऊन त्याच्याबरोबर व्यवसायातील घडामोडींवर चर्चा होईल. संततीकडून प्रतिष्ठा वाढवणार्‍या गोष्टी घडतील. कुटुंबात मंगलकार्याचे विचार सुरू होतील. अपत्यप्राप्तीच्या इच्छूकांनी जेष्ठ व अनुभवी महिलांचा  सल्ला घ्यावा.

तूळ :–बरेच दिवसापासून आजारी असलेल्यांना आजारावर उतार पडत असल्याचे जाणवेल. अडचणीच्या कालावधीत तुम्हाला आधार दिलेल्या मित्राच्या गरजेला धावून जावे लागेल. तरूणांना मनातील ईच्छा पूर्ण होण्याचे संकेत मिळतील.

वृश्र्चिक :–मनातून कोणत्यातरी गोष्टीचे भय निर्माण होईल. जोडीदाराबरोबर अचानक वाद निर्माण होऊन त्याचे पर्यावसान त्रासदायक राहील. शिक्षक मंडळीना विद्यार्थ्यांच्या वागण्याचा त्रास होईल. पुरूष मंडळीनी अचानक आपले निर्णय बदलू नयेत.

धनु :–सरकारी योजनेतून मिळणारा फायदा नियोजित वेळेत मिळणार नाही.   त्वचाविकाराचा त्रास असलेल्यांनी अतिशय जपून वागावे. लेखक व शिक्षक यांना अचानक नव्या प्रोजेक्टमधे काम करण्यासाठी  विचारले जाईल.

मकर :– आज महिलांना रोजचीच कामे करताना सुद्धा कष्ट वाढणार आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत शिक्षकांना कांही नवीन जबाबदार्‍या स्विकाराव्या लागतील. पूर्वनियोजित कार्यक्रम अचानक बदलावा लागेल.

कुंभ :–जास्त पैसे मिळण्याच्या हेतुने गुंतवलेल्या रकमेबाबत शंका निर्माण होतील. पुरूष मंडळीना खर्चावर नियंत्रण ठेवूनही मोठ्या खर्चाला बळी पडावे लागेल. नोकरीत सहकारी वर्गाकडून आवश्यक ते सहकार्य मिळेल.

मीन :–अचानक होणार्या आर्थिक प्राप्तीने खूष व्हाल. शिक्षकांना विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून कामाचे स्वरूप बदलावे लागेल. डाँक्टर मंडळींचे समाजाकडून कौतूक होईल. शासकीय योजना राबवण्याची कागदपत्रे पुढे सरकतील.

 

| शुभं-भवतु ||

 

One thought on “शुक्रवार 22 जानेवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *