Read in
गुरूवार 21 जानेवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य
गुरूवार 21 जानेवारी 2021 आज चंद्ररास मेष दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अश्र्विनी 15:35 पर्यंत व नंतर भरणी. आज श्री शाकंभरीदेवीच्या नवरात्राला सुरूवात होत असून आजचा संपूर्ण दिवस शुभ आहे.
वरील रास व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :– आज तुमच्या स्वभावातील लहरीपणा मधे वाढ होऊन कोणताच विचार पक्का राहणार नाही. आजचा दिवस तुम्ही स्वत:ची काळजी घेण्याचा आहे. . विजेवर चालणार्या वस्तू काळजीपूर्वक हाताळा तसेच .आज नव्याने कोणतेही महत्वाचे काम करू नका.
वृषभ :- पूर्वी ज्यांच्याबरोबर वाद झाला आहे तो वाद त्यांच्याकडून पुन्हा उकरून काढला जाईल. कोणत्यातरी कारणाने पोलीस स्टेशनला जावे लागेल. कोर्टाच्या कामामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ करू नका व वशिला लावायचा पण प्रयत्न करू नका.
मिथुन :–परदेशी असलेल्या व्यक्तींनी तेथील नियमांचे काटेकोरपणे पालन करावे जराही चालढकल किंवा हलगर्जीपणा करू नये. मित्रमंडळीमधे कोणत्याही विषयावर आज जास्त चर्चा करू नये. तुमच्या माघारी त्याविषयी तुमचे हसे होईल.
कर्क :– व्यवसायातील नव्या मार्गाचा विचार तूर्तास तरी थांबवावा लागेल. मोठ्या भांडवलाची सोय होणार आहे. महिला व पुरूष दोघांनाही सासूबाईंकडून उपदेशाचे चार खडे बोल ऐकावे लागतील. अती खाण्याने किंवा जेवण्याने अपचनाचा त्रास जाणवेल.
सिंह :–आई कडून अध्यात्मातील तुमच्या असलेल्या शंका दूर केल्या जातील. परदेशी उच्चशिक्षण घेत असलेल्यांना अचानक शिक्षणाविषयी आस्था कमी होऊ लागल्याचे जाणवेल. नातवंडाची विशेष काळजी घ्या दुसर्याच्या भरवश्यावर सोडू नका.
कन्या :–बद्धकोष्ठतेचा त्रास असणार्यांनी दुर्लक्ष न करता डाँक्टरांचा इलाज करावा. मोठ्या आंतड्याचे दुखणे निघून अवघड परिस्थिती होईल. कुटुंबात आज कोणाचे श्राद्ध तिथी असेल तर त्या विषयी बेफिकीर राहू नका ते करणे आवश्यक आहे हे समझून घ्या.
तूळ :– ज्यांचा स्वतंत्र व्यवसाय आहे अशांनी फार पूढचा विचार न करता प्रथम आजचा विचार करावा. स्त्री व पुरूष दोघांच्याही लैंगिक भावना अचानक वाढल्याने मानसिक त्रास होईल तरी काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना भाषणात किंवा बोलताना अचानक विसरले जाण्याचा प्रसंग येईल.
वृश्र्चिक :– आज आत्मचिंतनात मग्न व्हावे असे वाटेल. अचानक अध्यात्मिक वृत्तीत वाढ होऊन एखाद्या देवाची पोथी वाचण्याची इच्छा निर्माण होईल. मनात नसतानाही गरजवंताला अचानक कांहीही विचार न करता आर्थिक मदत कराल.
धनु :–बर्याच दिवसापूर्वी दिलेल्या मुलाखतीतून तुमची निवड झाल्याचा निरोप येईल. दळणवळण क्षेत्रात काम करणार्यांनी विशेष काळजी घ्यावी एखादी गडबड तुमच्या अंगावर येण्याचा धोका आहे. संततीच्या वागण्याचा मानसिक त्रास होईल.
मकर :–उच्चशिक्षण घेत असलेल्यांना एखाद्या नोकरीची संधी निर्माण होईल व काय करावे याचा मानसिक गोंधळ उडेल. आईच्या प्रकृतीबाबत चिंता निर्माण होईल. कुटुंबातील एखाद्या गहन विषयावरील चर्चा करावी लागेल व त्याचे सूत्र तुमच्याकडे असेल.
कुंभ :–तुमच्या नक्की मनात काय चाललय याचा तुम्हालाच थांगपत्ता लागणार नाही. मोठ्या भावंडांबरोबर तात्विक मतभेदाचा मानसिक त्रास होईल. आई व पत्नी यांच्याबरोबरील चर्चा फलद्रूप होतील.
मीन :–मोठी रक्कम अचानक खर्च करण्याचे कलम निर्माण होईल. नोकरीत न मिळालेली थकबाकी अचानक मंजूर होईल. संततीच्या प्रगतीच्या बातम्या सुखावह ठरतील. वकील मंडळींकडून कोर्टातील कामात आज कांहीतरी गडबड होण्याचा धोका आहे.
| शुभं-भवतु ||
Aabhari Aahe Tai