Read in
बुधवार 20 जानेवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य
बुधवार 20 जानेवारी आज चंद्ररास मीन 12:35 पर्यंत व नंतर मेष सुरू. चंद्रनक्षत्र रेवती 12:35 पर्यंत व नंतर अश्र्विनी सुरू. आजचा दिवस 13:14 पर्यंतच शुभ आहे. त्यानंतर महत्वाची कामे करू नयेत.
वरील रास व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष:–आज तुमच्याकडे पाहून सर्वांच्या लक्षात येईल की कामाला वाहून घेणे म्हणजे काय असते. आंतरिक शक्तीमधे वाढ होऊन कामाला गती येईल. कंटाळवाणी कामेही मार्गावर येथील. मुलांकडून काहीबाही चूका होऊनही आज मुले शहाण्यासारखी वागतील.
वृषभ :–आजची सकाळ आशेचा व उत्साहाचा नवा किरण घेऊनच येणार आहे. तुम्ही तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या मार्गावर आहात. तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात इतरांनाही सामिल करून घ्या. वस्तुस्थितीत कर्जप्रकरणे मानसिक त्रास देणार नाहीत उगाच काळजी करू नका.
मिथुन :–व्यवसायात व्यापारातील गणिते अचानक बदलू लागतील. जागा घेणे, पैशांची गुंतवणूक करणे यासारखी कामे अचानक इतरांच्या सल्ल्याने घाईघाईने करू नका. मध्यान्हानंतर तर कोणतेच आर्थिक व्यवहार करू नका.गुंतागुंत वाढेल.
कर्क :–ज्यांना ज्यांना पूर्वी उधार उसनवार पैसे दिलेले होते त्याच्याकडून पैसे परत मिळण्याचे मार्ग ओपन होतील. फक्त तुमच्या एका निरोपाची, फोनची आवश्यकता आहे. प्रकृती अस्वास्थ्यामूळे वयस्कर मंडळीना आज दिवसभर आराम करावा, झोपून रहावे असे वाटेल.
सिंह :–भल्या पहाटे उठून कामाला लागणार्या व्यक्तींना आज बारा हत्तीचे बळ येईल. कोणतेही अवघड वा मोठे कार्य करण्याची मानसिकता राहील. राजकीयदृष्टय़ा तुमच्या कडून समाजाच्या हिताच्या व ऐरणीवर असलेल्या कामाकडे जास्त लक्ष राहील.
कन्या :–बोलण्याच्या ओघात अचानक समोरिल व्यक्तीच्या मनाला लागेल असे बोलले जाईल तरी आज बोलताना सावधपणा बाळगावा. विवाहित बहिणीकडील ज्येष्ठ मंडळींच्या प्रकृतीचा प्रश्र्न चिंताजनक राहील. विशेष चौकशी करावी.
तूळ :– मागिल महिन्यातील महत्वाच्या घटनेचे रिपीटेशन होईल. लाभदायक गोष्टींची मालिका तयार होईल. नव्याने सुरू केलेल्या अभ्यासात अडचणी निर्माण होतील. विद्यार्थ्यांनी इतरांचे अनुकरण करण्यापेक्षा स्वत:चे नियोजन तयार करावे.
वृश्र्चिक :–आपल्या कुटुंबियांना आपलेसे करून पुढील वाटचाल सुरू करा. प्रथम ओळखीत मनातील विचार व्यक्त करू नका. नात्यातील व्यक्तींविषयीचे पूर्वानुग्रह दूर करून त्याच्याकडे पाहिल्यास स्वत:ची चूक लक्षात येईल. सामाजिक स्तरावर वैचारिक संघर्षाची ठिणगी पडेल तरी सावध रहावे हे उत्तम.
धनु :–मनातील शंकाकुशंका जेष्ठांना, तज्ञाना विचारून मनावरचे ओझे कमी करा. विद्यार्थ्यांनी स्वत:विषयी अवास्तव केलेल्या कल्पना चुकीच्या आहेत याची जाणिव होईल. कष्ट करण्यास मागे पुढे पाहणार नाहीत ते नक्कीच यशाच्या मार्गाने जातील. आळस झटकावा लागेल.
मकर :– स्थावर इस्टेटीच्या कामात आज दिवसभर गुंतून रहाल. आवश्यक असेल तेथे गोड बोलून काम करून घ्या. लाच देण्यासारखे कोणत्याही प्रकारे आर्थिक व्यवहार करू नका. लहान रांगत्या बाळाच्या आरोग्याची तक्रार उद्भवेल, काळजी घ्या.
कुंभ :– पुढील महिन्यातील नियोजित कामाच्या काळजीने त्रस्त व्हाल. कांही जबाबदार्या योग्य त्या सहकार्यांवर सोपवा. लोखंडी वस्तूने काहीतरी इजा होण्याचा संभव आहे तरी काळजीने वागा. महिलांनी स्वयंपाकघरात काळजीपूर्वक कामे करावीत.
मीन :–जवळच्या मित्राची अचानक पैशाची गरज भागवावी लागेल. आपल्या आर्थिक व्यवहाराची कुटुंबियांना कल्पना द्या. केवळ गप्पा मारणाऱ्या व बढाई मारणाऱ्या लोकांकडून कामाची अपेक्षा करू नका व त्यांच्या भरवश्यावर राहू नका. उत्पादन क्षेत्रात अचानक मोठी आँर्डर मिळेल.
| शुभं-भवतु ||
Thank you Tai