Read in
मंगळवार 19 जानेवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य
मंगळवार 19 जानेवारी 2021 चे दैनिक आज चंद्ररास मीन दिवसरात्र. चंद्रनक्षत्र उत्तराभाद्रपदा 09:53 पर्यंत नंतर रेवती.
वरील रास व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–आपल्या हाताखालील मंडळींबरोबर वागताना फार जवळकीच्या नात्याने वागू नका. त्यांची जबाबदारी त्यांना कळू द्या. भाड्याच्या घरात राहणार्यानी आपल्या तक्रारी सौम्यपणाने सांगा. विद्यार्थ्यानी यशाकरता फक्त क्लासवरच अवलंबून राहू नये.
वृषभ :–आज तुमचा मानसन्मान वाढवणारा दिवस आहे. तुमच्या मऊ स्वभावाचा बरोबरचे लोक फायदा घेऊ पाहतील तरी सावध रहावे. व्यवसायात अचानक नवीन उलाढाल घडून येईल. बर्याच दिवसापासून आजारी असलेल्यांना आज दुपारनंतर प्रकृतीत फरक दिसून येईल.
मिथुन:–भागिदाराबरोबर अती चर्चा करू नका कांहीतरी आर्थिक अडचण निर्माण होईल. बँकेच्या कर्ज प्रकरणाची चौकशी करा. कर्ज मंजूर होणार आहे. तरूणां कडून ओव्हरड्राफ्टच वापर करण्यात येईल.
कर्क :–पतीपत्नीच्या व्यवहारातील स्पष्टपणा महत्वाचा ठरेल. कुटुंबातील समस्येवर चर्चेने सुटण्याचे मार्ग सापडतील. महिलांच्या जून्या दुखण्यांवर डाँक्टरांकडून आवश्यक ती ट्रिटमेंट मिळेल. विद्यार्थ्यांना अवघड विषयासाठी व्यक्तिगत पातळीवर योग्य शिक्षकांची सोय होईल.
सिंह :–सध्या नवीन योजना राबवण्याचे स्वप्न बघु नका. घरातील रेंगाळलेल्या कामात प्रथम लक्ष घाला. महिलांनी, विशेषत: तरूणींनी कडक बोलणे टाळावे. त्याचा परिणाम त्रासदायक होईल. व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील.
कन्या :–तज्ञांच्या सल्ल्याशिवाय गुंतवणूकीचे कोणतेही निर्णय घेऊ नका. परदेशी असलेल्या मुलांबरोबर च्या गप्पांतून एखादी मनाला त्रास देणारी बातमी कळेल. आजी आजोबांकडून लहान वयाच्या मुलांना विशेष किंमती भेटवस्तू मिळेल. पुरोहित, पुजारी यांनी कामाची गर्दी करू नये.
तूळ :–उत्पादन क्षेत्रात असलेल्यांनी त्यांच्या हाताखाली काम करणार्या प्रत्येक घटकांवर वचक ठेवावा. अन्यथा ढिलाई मुळे नुकसान होईल. व्यवसायात जून्या योजनेतून नवीन योजना जन्म घेणार आहे तरी सुरू असलेल्या योजनांचा अभ्यास करावा.
वृश्र्चिक :–सामाजिक कसामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी सवत:च्या जबाबदार्या ओळखून वागावे. तरूणांनी व प्रौढ विवाहेच्छूंनी ही विवाहाची स्वप्ने बघायला हरकत नाही. व्यवहारात चोख रहावे लागेल. आज उधार उसनवार देऊ नका.
धनु :–तरूणांनी अपेक्षांचे ओझे कमी केल्यास विवाहाची बोलणी पुढे सरकतील. हार्टच्या पेशंट्सनाी डाँक्टरांनी दिलेला सल्ला तंतोतंत पाळावा. बहिण भावंडामधील प्रेमाचे गुपित गुपितच राहू द्या. नवीन घराच्या बाबतीत निर्णय घेऊ नका फसगत होईल.
मकर :– पोलिस खात्यातील मंडळीना वरिष्ठांकडून शाबासकी मिळेल. महिलांना नोकरी व संसार सांभाळताना नाकी दम येईल. फँशनेबल कपड्यांच्या निर्मितीतील तुमचे योगदान तुम्हाला ओळख मिळवून देईल. एखाद्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तरूणाची प्रकृती बिघडेल.
कुंभ :–तुमच्या कार्यक्षेत्रातील अडचणी दूर होऊन कामे मार्गी लागतील. तरूणांच्या कामात तत्परता येऊन कामे हातावेगळी होतील. महिलांना अचानक सोने खरेदी करण्याची इच्छा निर्माण होईल. विवाहेच्छूंनी कोणतीही घाई करू नये.
मीन :–तुम्हाला पडलेल्या स्वप्नाचा अर्थ समजून घ्या. शिक्षक मंडळींना आपली शिकवण्याची पद्धत बदलावी लागेल. आई वडीलांच्या हट्टापुढे तुमचे कांहीही चालणार नाही. तरूण मुलांनी आपले हक्क व कर्तव्य यातील फरक ओळखावा. विनाकारण गैरसमज करून घेऊ नयेत.
| शुभं-भवतु ||