Read in
सोमवार 18 जानेवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य
सोमवार 18 जानेवारी आज चंद्ररास मीन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा 07:45 पर्यंत व नंतर उत्तराभाद्रपदा.
वरील रास व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष:–ज्य़ा पत्राची किंवा निरोपाची गेले आठवडाभर वाट बघत आहात ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे मार्ग खुले होतील. बहिण भावंडामधील वादाला ज्येष्ठांची मध्यस्थी उपयोगी पडेल. कालची केलेली खरेदी आज बदलून आणावी असे वाटेल.
वृषभ:– महिलांना आर्थिक लाभ होणार असल्याचे संकेत मिळतील. लहान मुलांच्या शाळा प्रवेशाच्या प्रश्र्नाने मानसिक गोंधळ उडेल. व्यवसायिक दृष्टीकोनातून व्यवसाय वाढवण्यासाठी वडील भावंडाकडून मोठ्या रकमेची सोय होईल.
मिथुन :–कोर्टाच्या कामातील झालेल्या उशीराबद्दल वकिलांबरोबर भेटून अडचण सोडवून घ्या. प्रसंगी मित्राला बोलायला लावा. महिला पैसे वाचवण्याच्या दृष्टीकोनातून एखादी वस्तूची खरेदी लांब जाऊन करतील. दूरगावी असलेल्या आईची व मुलांची अचानक भेट होईल.
कर्क :– वडीलांकडून अभ्यासात असलेले बरेचसे डाऊटस् क्लीअर होतील. लहान मुलांकडून त्यांच्या बुद्धी चातुर्याने लोक अचंबित होती. विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणाची काळजी सतावेल. आर्थिक विचार भंडावून सोडतील.
सिंह :–मुलांच्या अभ्यासातील प्रगतीवर खूष व्हाल. विद्यार्थ्यांचे शिक्षकांकडून कौतुक होईल. आज नोकरदारांना नवीन नोकरीची माहीती मिळेल नोकरीच्या शोधात असलेल्यांनी विचार करावा. वरिष्ठांकडून त्याविषयी योग्य सल्ला मिळेल.
कन्या :–प्रेमाच्या व्यवहारातील स्वत:चे विचार स्पष्ट ठेवावे लागतील. विवाहेच्छूंनी आलेल्या स्थळाचा विचार सकारात्मक करावा. सत्संगास जाणार्यांना सकारात्मक अनुभव येईल. सामाजिक कार्यकर्त्यानी सारासार विचार करूनच कृती करावी.
तूळ :–आजची गुंतवणूक सोन्यामधे करायला हरकत नाही. फायदेशीर राहील. राजकीयदृष्टय़ा महत्वाच्या चर्चा करण्यासाठी कोणाचीही मदत घेण्याची गरज पडणार नाही. लहान मुलांच्या हातातील खेळण्याकडे लक्ष द्यावे लागेल.
वृश्र्चिक :–अपत्यप्राप्तीचा मार्गात अडचणी निर्माण झालेल्यांनी आयव्हीएफच्या मार्गाचा विचार करावा. हा मार्ग यश देईल. वयस्कर मंडळीनी आपल्या अभ्यासाशिवाय बोलू नये उगाच तरूण वर्गाचा रोष निर्माण होईल. टुकार वस्तूंच्या खरेदीसाठी खूप पैसे खर्च कराल.
धनु:– परदेशी असलेल्या संततीकडून अतिशय आनंद देणारी बातमी कळेल. विद्यार्थी वर्गाकडून आज प्रशंसनीय काम होईल. नोकरीत हातातील प्रोजेक्टमधे कोणतीच अडचण उरणार नाही. अधिकारी वर्गास आपले अधिकार वापरताना अहंपणा येईल.
मकर :–बुद्धीमत्तेने यशस्वी होऊनही पुढील शिक्षणासाठी आर्थिक गरज निर्माण होईल. तरूण दातांच्या त्रासाने हैराण होतील. व्यावसायिकांनी आपले व्यवहार स्वच्छ ठेवावेत. कोर्टाच्या कामातील तुमच्या गैरहजेरीचा फायदा समोरील पार्टीला होईल.
कुंभ :–आज सकाळपासूनच कामाची दगदग सुरू होईल. सरकारी योजनांतून मिळणार्या लाभाबाबत पुरेशी चौकशी करा. खेळाडूंना डावा दंड दुखण्याचा त्रास होईल. तेलकट, तूपकट पदार्थ खाल्ल्याने वयस्कर मंडळी खोकल्याने हैराण होतील.
मीन :–रिटेल दुकानदार मोठ्या प्रमाणात फायदा होण्यासाठी अचानक किंमती कमी करण्याचा फंडा वापरतील. पुरातन वस्तूच्या विक्रीतून डबल फायदा होईल. पोस्ट कर्मचार्यांना आपले टार्गेट गाठणे अवघड जाईल. अधिकारी वर्गाने आपले बोलणे स्पष्ट ठेवावे.
| शुभं-भवतु ||
Dhanyawad Tai