Read in
रविवार 17 जानेवारी 2021 ते शनिवार 23 जानेवारी 2021 चे साप्ताहिक राशीभविष्य
17 रविवार चंद्र रास कुंभ 25:15पर्यंत नंतर मीन. चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा अहोरात्र. 18 सोमवार चंद्ररास मीन चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा 07:42 पर्यंत नंतर उत्तरा भाद्रपदा. 19 मंगळवार चंद्ररास मीन.
चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा 09:53 पर्यंत व नंतर रेवती. 20 बुधवार चंद्ररास मीन 12:35 पर्यंत नंतर मेष. चंद्र नक्षत्र रेवती 12:35 पर्यंत व नंतर अश्र्विनी. 21 गुरूवार चंद्ररास मेष व चंद्रनक्षत्र अश्र्विनी 15:35 पर्यंत व नंतर भरणी. 22 शुक्रवार चंद्ररास मेष 25:23 पर्यंत व नंतर वृषभ. चंद्रनक्षत्र भरणी 18:18 पर्यंत व नंतर कृतिका. 23 शनिवार चंद्ररास वृषभ. व चंद्रनक्षत्र कृतिका 21:31 पर्यंत व नंतर रोहिणी.
मेष :– 17 मित्रमैत्रिणींच्या मदतीने कामातील अडचणी दूर करता येणार आहेत. मनातील विचार ओळखून जावईबुवा कडून चांगले सहकार्य मिळेल. 21,22 रोजी बर्याचश्या गोष्टी मनासारख्या करता येणार आहेत. बर्याच दिवसापासून मनात असलेल्या इच्छा पूर्ण करण्याचे मार्ग सापडतील. 23 ला व्यवसायात चांगली प्रगती होईल. 18 व 19 ला वडीलांकडील नातेवाईकांसाठी दवाखान्यात जावे लागेल. व आर्थिक मदतही करावी लागेल.
वृषभ :–23 जोडीदाराचे वागणे मनाला आनंद देणारे असेल. जेथे जाल तेथे तुमचा प्रभाव पडेल.18, 19, व 20 रोजी वडील भावंडाकडून व्यवसायासाठी आर्थिक मदत मिळेल. वयस्कर, निवृत्त महिलां ज्या पैशाची वाट पहात असतील ते मिळण्याचे संकेत मिळतील. अचानक गुडघे दुखीचा त्रास सुरू होईल. तरी मनाने कांहीच ठरवू नये. डाँक्टरांचा सल्ला घ्यावा.नोकरदार वर्गाच्या 21 व 22 रोजी परदेशी असलेल्या संस्थेबरोबर बोलाचाली होतील.
मिथुन :–21 व 22 रोजी नोकरीच्या ठिकाणी आजपर्यंत न मिळालेले अधिकार मिळणार आहेत याची बातमी मिळेल.नुसत्या बातमी एच मनाला समाधान मिळेल. 18 व 19 रोजी वडील भावंड व मित्र यांच्या सहकार्याने सरकारी कामात प्रगती होईल. 23 रोजी राजकीय मंडळीना त्रासदायक राहील. प्रतिस्पर्धी आक्रमक होतील. 20 रोजी वडीलांच्या कोर्टाच्या कामासाठी त्यांच्याबरोबर जावे लागेल.
कर्क :–18 व 19 मेव्हण्यांच्या मदतीने उच्चशिक्षणाच्या मार्गांची माहिती मिळेल व त्याबाबतचे रखडलेले काम पुन: सुरू करता येईल. 20, 21 व 22 रझी व्यवसायातील नवनवीन प्रयोगाची गणिते ठरतील. तज्ञांनी दिलेल्या मार्गदर्शनानंतरच प्रयोग करण्याचे पक्के करा. 17 व 18 रोजी सासुरवाडीकडील मंडळींची भेट होईल. बिन पावताच्या पैशांचा व्यवहार अजिबात करू नका संकट ओढवून घ्याल. सरकारी मंडळीनी कोणत्याही प्रकारात बक्षिसी घेऊ नये.
सिंह :–21 व 22 ला अतिशय ज्ञानी व गुरूतुल्य व्यक्तीची भेट होईल. अनेक प्रकारच्या ऐंश्र्वर्याचा अर्थ कळेल. 18 व 19 ला कोणत्याही परिस्थितीत आर्थिक देवघेव करू नका. कुटुंबातील ज्येष्ठांच्या तब्बेतीची काळजी घ्यावी लागेल. विशेषत: अस्थमा व कफ प्रकृतीच्या मंडळींकडे दुर्लक्ष करू नका. 17 चा दिवस फक्त व्यवसायिक बोलणी करण्यासाठीच राखीव ठेवावा. वायफळ व गोंधळात टाकणार्या चर्चा करू नयेत.
कन्या :–18, 19 व 20 या तीन दिवसात विवाहेच्छूंच्या विचारांच्या बाबतीत सकारात्मक बदल होतील. तसेच समोरील पार्टीबरोबरील केलेले बोलणे फलद्रूप होईल. अती चिकीत्सेमुळे चांगली संधी निघून जाते व नुकसान होते हे लक्षात ठेवा. 23 रोजी आयुष्यातील कांही महत्वाचे निर्णय घेण्याची जबाबदारी तुमच्यावर येईल. पूर्ण विचारानेच निर्णय घ्या. 17 रोजी नोकरीच्या ठिकाणी महत्वाचा बदल करण्याच्या चर्चा होतील. 21, 22 हे दोन दिवस मानसिक त्रासाचे असल्याने मन शांत ठेवावे.
तूळ :–17 रोजी हातातील मोठी रक्कम नव्याने गुंतवण्यास हरकत नाही. स्वत:च्या व नाणे व्यवहार करण्यापेक्षा तज्ञांचे किंवा सी. ए. चे मत घ्या. निवृत्त लोकांचे न आलेले पैसे लवकरच येण्याचे संकेत मिळतील. 21 व 22 रोजी पतीपत्नीच्या एकत्र व्यवसायात चांगलीच प्रगती होत असल्याचे जाणवेल. 23 रोजी बर्याच वर्षापूर्वी गुंतवलेल्या शेअर्समधून मोठा लाभ होईल. 18 व 19 रोजी कुटुंबात विनाकारण कलह निर्माण होईल तरी सर्वानीच आपले विचार शांतपणे मांडावेत.
वृश्र्चिक :–17 रोजी शेती, शेतमाल त्यांच्या किंमती याबाबत चांगला लाभ होईल. गायी, म्हशी दुधदुभते यांच्या बाबतीत रखडलेली कामे मार्गी लागतील. व ज्या अडचणी होत्या त्यांचे निराकरण होईल. महिलांनी गुप्त ठेवलेले पैसे त्यांना बाहेर काढावे लागतील. 18 व 19 या दोन दिवसात अपत्यप्राप्तीच्या इच्छूकांना गोड बातमी मिळणार आहे. 21 व 21 महत्वाची वस्तू किंवा मौल्यवान चीजवस्तू हरवण्याची, गहाळ होण्याचा धोका आहे.
धनु :–ज्या पत्राची, निरोपाची अगदी आतुरतेने वाट बघत आहात ते 17 रोजी मिळेल किंवा मिळण्याच्या आटोक्यात येईल. 18 व 19 मध्ये जाईंट अकाउंट मधील पैशाविषयी साशंकता निर्माण होईल. लगेच व्यवहार तपासून पहा. आज ए. टी. एम. कार्ड वापरताना विशेष काळजी घ्या. 18, 19 व 20 रोजी संततीकडून अत्यंत समाधानाची बातमी कळेल. प्रेमाच्या व्यवहारात निर्माण झालेल्या अडचणी दूर होतील. 21 व 22 रोजी विद्यार्थ्यांची काँन्फिडन्स लेवल वाढेल व यशाची खात्री पटेल. 23 रोजी नोकरीत, व्यवहारात, तसेच राजकारणात शत्रू उघडपणे त्रास देण्याचा प्रयत्न करतील तरी सावध रहावे.
मकर :– पूर्वी झालेल्या वारसाहक्काच्या प्रश्र्नांवर 17 च्या चर्चेतून कांहीतरी चांगला मार्ग निघेल. 18 व 19 रोजी लहान भावंडासाठी स्वत:च्या मनावर संयम ठेवावा लागेल. आज कोणत्याही योजनांना भुलून जाऊ नका. 20 आर्थिक व्यवहारासाठी लाभदायक राहील. 21 व 22 रोजी चार चाकी वाहन घेण्याचे सर्वानुमते ठरेल. सुखाच्या कल्पना बदलतील. दैवी उपासना करणार्यांना 23 हा दिवस विशेष लाभदायक आहे. नवीन गुंतवणूक करण्यासही चांगला आहे.
कुंभ :–आरोग्याच्या बाबतीत 17 तारीख ही रिकव्हरीची राहील. मैदानी खेळ किंवा कोणत्याही स्पर्धेचा निकाल आज तुमच्या बाजूने लागेल. 18, 19 व 20 रोजी व्यवसायातील उधारी वसूल होईल. वडीलांकडून किंवा वडीलबंधू कडून खास मदत मिळेल. एक गठ्ठा रक्कम मिळेल. 21 व 22 रोजी गूढ शास्त्राच्या अभ्यासकांना आत्मशक्तीचा अनुभव येईल. या विषयातील योग्य व आदरणिय गुरूची भेट होईल. तुमच्याकडे असलेल्या गुणांचे कौतुक होईल.
मीन :–18, 19 व 20 या तीनही दिवसात तुम्हाला जेजे करायचे आहे ते तुम्ही करू शकाल. यश तुमच्यासमोर चालून येईल. 21 व 22 रोजी नोकरीतील अधिकारपदात वाढ होऊन सन्मान वाढेल. एखाद्या ग्रूपचे लिडर केले जाईल. 23 रोजी राहिलेले महत्वाचे पत्रव्यवहार कराल. महत्वाच्या कागदपत्रांवर सह्या होतील. 17 रोजी मानसिक त्रास संभवतो. मित्रांसाठी पोलीस स्टेशनला जावे लागेल.
|| शुभं-भवतु ||