daily horoscope

शनिवार 16 जानेवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in
शनिवार 16 जानेवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य

शनिवार 16  जानेवारी आज चंद्ररास कुंभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र शततारका 30:08  पर्यंत.

daily horoscope

आज विनायक चतुर्थी आहे. वरील राशीचा व नक्षत्राचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :– बर्‍याच दिवसापासून ठरवलेले काम अचानक पणे रद्ध कराल.  काम पुढे नेण्याचे धाडस राहणार नाही. व्यवसाय व्यापारातील अंदाज अचूक ठरतील. वडीलांनी कडक बोलणे टाळावे तुमच्या बोलण्यावर कुटुंबात नाराजी निर्माण होईल.

वृषभ :–दैनंदिन कामा शिवाय इतर कोणत्याही कामात आज विशेष लक्ष घालू नका. स्वत:ला आवडती कामे करण्याला आज प्राधान्य द्या. विद्यार्थी अभ्यासातील मागे पडलेला भाग भरून काढण्यासाठी तत्पर राहतील.

मिथुन:– राजकिय मंडळीनी आपली इमेज सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न करावा. मोठ्या हाँस्पिटलमधील डाँक्टर्सना औषधांच्या साईडईफेक्टसच्या दुष्परिणाम झालेल्या पेशंटना दुरूस्त करण्याची जबाबदारी येईल व अतिशय कष्ट पडतील.

कर्क :–भागिदारीच्या व्यवसायात अती केलेल्या चर्चेमुळे तुम्ही अडचणीत येणार असल्याची जाणिव होईल. नोकरदार वर्गास नोकरीत अधिकारपदाची प्राप्ती होईल. पण पगारात फारसा बदल होणार नाही. गर्भवती महिलांनी डाँक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये.

सिंह :–प्रतिस्पर्धी पार्टीकडून तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जाईल. कलाकार मंडळींना आपल्या कलेचे सादरीकरण करण्यास अनपेक्षितपणे मोठे व्यासपीठ मिळेल. महिलांना उपासनेचे महत्व कळेल. स्वत:चे म्हणणे पुढे रेटू नका.

कन्या :–जवळच्या व्यक्तीकडून मानसिक त्रास संभवतो. बोलण्याच्या ओघात नको असलेल्या गोष्टी पण बोलून जाल. आई वडीलांसाठी महत्वाची व त्यांच्या आवडीची वस्तू खरेदी कराल. माहेरील घरी भावंडांच्या वादात मध्यस्थाची भूमिका करावी लागेल.

तूळ :–तरूणांनी व व्यावसायिकांनी रेंगाळलेली व अडकलेली कामे मार्गी लागण्यासाठी प्रथम वकीलांशी संपर्क साधावा. मित्रमैत्रिणींच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास हजेरी लावता येणार नाही.

वृश्र्चिक :–नोकरीत कामाच्या प्रकारात बदल केला जाईल पण ठिकाण तेच राहील. ज्येष्ठांना अचानक तब्बेतीचा त्रास जाणवेल. वयस्कर मंडळीनी शांततेने प्रश्र्न सोडवण्याकडे कल ठेवावा अन्यथा वेगळाच प्राँब्लेम उभा राहील. आरोग्याच्या बाबतीत मुलांची पण काळजी घ्या.

धनु :–तुम्हाला मिळणार्‍या यशामुळे कुटुंबात आनंद निर्माण होईल. विद्यार्थ्यांनी तुसत्या क्लासवरच विसंबून राहू नये स्वत:च्या मेहनतीला प्राधान्य द्यावे. मैदानी खेळाडूंना स्वत:च्या विजयापुढे आकाश ठेंगणे वाटेल.

मकर :–व्यवसायातील तुम्ही वर्तवलेल्या अंदाजामुळे नियोजन योग्य प्रकारे करता येणार आहे. घरातील आवराआवर करताना फारपूर्वी हरवलेली वस्तू सापडेल. मैत्रीच्या संबंधातून मानसिक त्रास निर्माण होईल व संबंध बिघडल्याचे जाणवेल.

कुंभ :– कष्टाचे फळ किती गोड असते याचे उदाहरण समाजासमोर दाखवून द्याल. अपेक्षित व्यक्तींकडून महत्वाच्या कामाची पूर्तता होणार नाही. जमिन विकत असाल तर व्यवहाराची घाई करू नका. मारूतीरायाचे दर्शन घ्या व शरण जा.

मीन :-कालपासूनच्या कामातील झालेल्या दगदगीमुळे आजारी असल्यासारखे वाटेल. कोणतीही शंका मनात घेऊ नका. परदेशी असलेल्या मुलांबरोबर झालेल्या संवादांमुळे कुटुंबात आनंद निर्माण होईल. ज्येष्ठांसाठी सुग्रास भोजनाचा बेत जमेल.

|| शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *