Read in
शुक्रवार 15 जानेवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य
शुक्रवार 15 जानेवारी आज चंद्ररास मकर 17:05 पर्यंत व नंतर कुंभ. चंद्रनक्षत्र धनिष्ठा 29:16 पर्यंत व नंतर शततारका.
आज संक्रांतीचा करिदीन आहे. आजचा दिवस अशुभ असल्याने महत्वाची कामे करू नयेत. वरील दोन्ही राशी चा व नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :– जी कामे मागे पडलेली आहेत व तुमचेही दुर्लक्ष झाले आहे त्या कामाना प्रथम प्राधान्य द्या. पूर्वीच्या गुंतवणूकीतून चांगला लाभ होईल. अध्यात्मिक अभ्यासाची ओढ असणार्यांनी विश्र्वासाने व श्रद्धेने सराव केल्यास अभ्यास मार्गी लागेल.
वृषभ :–राजकीय क्षेत्रातील मंडळीना विरोधकांचा त्रास कमी होऊ लागेल व अचानक त्यांच्याकडून हातमिळवणीचे प्रयत्न होतील. व्यावसायिकांनी आपले मार्केटींगचे फंडे बदलावेत व त्यात नाविन्य आणावयाचा प्रयत्न करावा.
मिथुन :–पैसे फक्त साठवत बसू नका त्याचा उपयोग कसा करावयाचा याचा विचार करा. महिलांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये. जागेचा व्यवहार ठरला असला तरी त्यात बदल करण्याची गरज निर्माण झाल्यास बदल करण्याची तयारी ठेवा.
कर्क :–जूळ्या मुलांची प्रकृती बिघडण्याची शक्यता मोठी आहे. नोकरी निमित्ताने प्रवास करावा लागेल. सरकारी क्षेत्रातील कर्मचार्यांना वेगळ्याच उंचीवर असल्याचे जाणवेल. पतीपत्नीमधील वाद संपुष्टात आणण्यासाठी तुम्ही पुढाकार घेतल्यास यश मिळेल.
सिंह :–नवीन कामासाठी कितीही प्रयत्न केले तरी आजची परिस्थीती फारशी आशादायक राहणार नाही. विचारात बदल केल्यास वेगवेगळे मार्ग सापडतील. पुरूष मंडळीना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.
कन्या :–अतिशय जवळची व्यक्ती अडचणीत सापडल्याने बेचैनी येईल तरीष तातडीने भेटण्याचे ठरवा. तुमच्या मनाप्रमाणे होत नसलेल्या गोष्टींबाबत खेद करू नका. कुटुंबात वादग्रस्त विषय प्रेमाने सोडवण्याचा प्रयत्न करा.
तूळ :–शेअर मार्केट मधे उसळी मारू शकाल. नोकरीत जूनी केलेली गुंतवणूक लाभदायक राहील. योग्य वेळी माघार घेतलीत तर नव्याने उसळी मारून काम कराल. आर्थिक बाबतीत नियोजनाची गरज निर्माण होणार आहे.
वृश्र्चिक :–रागावर नियंत्रण ठेवण्याची कला आत्मसात केलीत तर सर्वच गोष्टी सुरळीत होतील. बुद्धी चातुर्याने इतरांची मने जिंकण्याचा प्रयत्न करा. स्टँम्पवेंडर च्या व्यवसायात कांहीतरी गडबड झाल्याचे जाणवेल.
धनु :–तुमची बलस्थाने ओळखून त्यांचा वापर कसा करता येईल याचा विचार करा. तसेच कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न करा. आपल्या व्यवसायात इतरांनी दिलेल्या टीप्स कशा उपयोगी पडतील याचा विचार करूनच वापरा.
मकर :– कामातील केलेल्या सुधारणेमुळे कामाची प्रतही वाढेल व वरिष्ठांकडून कौतुक होईल. बँक कर्मचार्यांना एखाद्या संकटाला सामोरे जावे लागेल. मनातील गोष्टी इतरांना सांगत बसू नका. घरातील नात्यात संशयाचे वातावरण राहील.
कुंभ :– कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीचा मान ठेवा. नजरचुकीने महत्वाची कागदपत्रे ठेवलेल्या जागी सापडणार नाहीत. मासिक कामाचे नियोजन महत्वाचे ठरेल. बोलण्यातील स्पष्टपणामुळे आज नोकरीच्या ठिकाणी गैरसमज निर्माण होतील.
मीन :– बँकेतील कर्जप्रकरण लवकर होणार नाही. तरी त्याच्यावर विसंबून राहू नका. न्यायालयातील वाद बाहेर मिटवता येत असल्यास त्याचा विचार करा. महिलांना आवडत्या वस्तूसाठी पायपीट करावी लागूनही मनासारखी मिळणार नाही.
|| शुभं-भवतु ||
Thank you Tai