daily horoscope

बुधवार 13 जानेवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in
बुधवार 13.जानेवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य

बुधवार 13 जानेवारी आज चंद्ररास धनु 12:05 पर्यंत व नंतर मकर. चंद्रनक्षत्र उत्तराषाढा 29:27  पर्यंत. आज भोगी आहे अमावास्या 10:29  पर्यंत नंतर प्रतिपदा.

daily horoscope

वरील दोन्ही राशी चा व नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–शेजारच्यांच्या अडचणीला धावून जावे लागेल. सकाळपासून हातात घेतलेल्या कामाात दिरंगाई होत असल्याचे जाणवेल. लहान मुलांच्या नाकाला मार लागण्याची शक्यता आहे. मुलांच्या हातात टोकदार वस्तू देऊ नका.

वृषभ :– कुटुंबात विवाहाबाबतची चर्चा सुरू होईल. तरी तुम्ही तुमच्या अपेक्षा नक्की ठरवा. मित्रांच्या संगतीने व्यसनाकडे वळाल तरी मनावर संयम घाला. महिलांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवल्यास पुढील त्रास होणार नाही.

मिथुन :- तरूण मंडळीनी स्वत:च्या क्षमतेपेक्षा कामाचा बोजा अंगावर घेऊ नये. नोकरीतील कामातील घाई काम बिघडेल तरी आजचे काम शांतपणे करावे. व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाचा आता विचारकरायचीवेळ आली आहे.

कर्क :–लहान मुलांच्या इच्छा पुरवताना नाकी नऊ येतील. पत्नीच्या माहेरच्यांचे घरी येणे होईल व  कुटुंबातील वातावरण आनंदाचे होईल. सोरँसिस असलेल्यांनी डाँक्टरांच्या सल्ल्याशिवाय मनाने निर्णय घेऊ नयेत.

सिंह :–बाजारातील नव्याने विक्रीस आलेल्या वस्तूचा लोभ निर्माण होईल. मित्राच्या आईच्या आजारपणासाठी मदत करावी लागेल. मौल्यवान वस्तूला हाताळताना वस्तू बिघडणार आहे. .  आज मुली नटण्याकडे जास्ती लक्ष देतील.

कन्या :–इलेक्टाँनीक्सच्या दुकानात काम करणार्‍यांनी  आज सतत अलर्ट रहावे. वयस्कर मंडळींच्या पायाला दुखापत होण्याचा संभव आहे. बाजारात एखादा जूना मित्र भेटेल.  डाँक्टर मंडळीना एखादी गुंतागुंतीची केस सोडवावी लागेल.

तूळ :– तरूणांना सकाळपासूनच प्रवासाचे वेध लागतील. उच्चशिक्षण घेऊ इच्छिणार्यांना आपल्याला इच्छापूर्ण होणार आहेत याची खात्री बाळगा. बँकेच्या कर्मचार्‍यांनी कोणत्याही परिस्थितीत दुसर्‍याला जामीन राहण्याचा शब्द देऊ नका.

वृश्र्चिक :– कालच्यापेक्षा आज मेहनतीला कमी पडणार नाही याची खात्री करा. नव्याने नोकरीत जाँईन झालेल्यांनी कोणतीही घाई करू नये. वडील बंधुच्या सासुरवाडीकडील पाहुणे घरी येतील. कुटुंबात वादग्रस्त विषयावरील बोलणे टाळा.

धनु :– मनाला आनंद. मिळणार्‍या घटना घडतील. वडीलांकडून प्रेमाचा वर्षाव होईल. हातातील पैशाला आवरावे लागेल उगीचच मोठ्या रकमेची खरेदी कराल. विद्यार्थ्यांनी दुसर्यांबरोबर स्पर्धा करण्याऐवजी स्वत:च्या प्रगतीचा विचार करावा.

मकर :– इतरांना  अवघड वाटणार्‍या गोष्टी प्रयत्नाने करून दाखवाल. बहिणीबरोबरच्या गप्पामधून बरीच एनर्जी मिळेल व मनाला हलके वाटेल. व्यवसायिक महिलांनी जरा शांतपणे घ्यावे. अधिकारी वर्गाने आपल्या अधिकाराचा गैरवापर होणार नाही याची काळजी घ्यावी.

कुंभ :–गुरूमंत्र घेतलेल्या साधकांना दैवी शक्तीचा अनुभव येईल. शाळकरी मुलामुलींना प्रोजेक्टच्या कामासाठी निवडले जाईल. कलाकार व खेळाडूंना आजच्या दिवसात मानसिक ताण येणारे प्रसंग उद्भवतील. वडीलांबरोबर बाहेर जावे लागेल.

 

मीन :–स्वत:च्या वाढीपेक्षा इतरांना काय वाटते याचा विचार करा. कोणालाही शब्द देण्यापूर्वी दहा वेळा विचार करा. कोणत्याही प्रकारच्या वाहनावर दंड भरावा लागेल. एखाद्या शासकिय आश्रमशाळेच्या सोयीसाठी पैसे खर्च करावे लागतील.

|| शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *