Read in
लेखांक 47 वा भाग 12 वा नक्षत्रीय फलादेश.
जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 या कालावधीतील प्रत्येक नक्षत्रांचा कालावधी व मिळणार्या संधीबाबतची माहिती.
वर्षाच्या बारा महिन्यातून येणारा हा कालावधी फक्त आणि फक्त त्याच कालावधीत घडणार्या घटनांसाठी जर वापरला तर आपली जी दमछाक होते ती होणार नाही. व अपेक्षित यशही मिळेल. म्हणून या वेगळ्या पद्धतीने नक्षत्रीय फलादेश द्यायचे ठरवले. जसे पावसाळ्यापूर्वीच जागरूकतेने आवश्यक त्या पूरक कामांची आपण जोडणी करतो तसेच हे पण आहे. थोडक्यात काय तर येणार्या कालावधीतील सर्व त्या संधींचा फायदा घेणे. या विचाराने हे विचार मी आपल्यासमोर मांडत आहे. प्रत्येक राशीमधे सव्वादोन नक्षत्रे येत असल्याने त्यानुसार रोज एका राशीची देण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण हे वाचावे व आपला अभिप्रायही द्यावा ही विनंती.
मीन राशीमधे येणारी नक्षत्रे पूर्वा भाद्रपदा चरण 4, उत्तरा भाद्रपदा चरण 1, 2, 3, 4, रेवती चरण 1, 2, 3, 4
मीन राशीमधे येणारी नक्षत्रे पूर्वा भाद्रपदा चरण 4
15 मार्च ते 18 मार्च या कालावधीत सूर्य पूर्वा भाद्रपदा या नक्षत्रातून भ्रमण करतो.
तुम्ही बुद्धीमान असून तुम्हाला सतत नवनवीन ज्ञान मिळवण्याची इच्छा असते. स्वभाव आनंदी व मोकळ्या मनाचा असून अतिशय प्रामाणिक आहे. वृत्ती परोपकारी असून मनाने सतत गरजवंताला मदत करावयाची इच्छा असते.
- 14 मार्च ते 17 मार्च या कालावधीत सूर्य या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. जे कुलगुरू, प्राचार्य, प्रोफेसर आहेत त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील अडचणींवर मार्ग काढण्याबाबत चर्चा, परिसंवाद, सूचना व उपाय मागवणे यासारख्या गोष्टींना प्राधान्य द्यावे.मंत्री, सल्लागार यांच्याबरोबर चर्चा कराव्यात शैक्षणिक आराखड्यातील उणीवा, दुरूस्त्या यांचाही अभ्यास करून सादर करावे. हा तुमच्या करियरचा भाग बनेल.
- 17 मार्च ते 19 मार्च या कालावधीत शुक्र या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. या कालावधीत आपल्याला नव्याने काहीही करावयाचे नाही.जो व्यवसाय किंवा जे काम जसे सुरू आहे तसेच सुरू ठेवायचे आहे, त्यात कोणताही बदल करायचा नाही आहे.
- 31 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत बुध पूर्वा भाद्रपदा या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. या कालावधीत व्यावसायिक क्षेत्रातील कोणतीही गणिते बदलू नका. तुमचे पर्सनल असिस्टंट, टायपिस्ट किंवा स्टेनोग्राफर यांना विशेष महत्वाची बातमीत सामावून घेऊ नका. सध्या आपण कोणताही बदल केला तरी तो सुखकर होणार नाही.
अशाप्रकारे फक्त सूर्याच्या अधिपत्याखाली येणार्या क्षेत्रात प्रगती करा व विशेष लक्ष घाला.
मीन रास उत्तरा भाद्रपदा चरण 1, 2, 3, 4..
उत्तरा भाद्रपदा या नक्षत्रातून सूर्य 19 मार्च ते 30 मार्य या कालावधीत भ्रमण करत असतो.
तुम्ही अतिशय बुद्धीमान असून, तुम्हाला सतत कांहीतरी शिकण्याची इच्छा असते. तुम्ही तत्वज्ञानी वृत्तीचे असून व्यवहारकुशल संपन्न, कर्तृत्ववान व कर्तबगार आहात. बौद्धीक व वैचारिक पातळीवर शांतपणे विचार करणारे असून निश्र्चयी आहात. वृत्ती धाडसी, व धडाडीने काम करणारी असल्याने स्वत:च्या जबाबदारीवर तुम्ही कितीही अवघड असलेले काम करायला तयार होत असता.
- उत्तरा भाद्रपदा या नक्षत्रातून सूर्य 19 मार्च ते 30 मार्च या कालावधीत भ्रमण करणार आहे. सरकारी कार्यक्षेत्रातील कामे ज्या पद्धतीने सुरू आहेत त्याच पद्धतीने सुरू राहू देत. त्यात विशेष कांही बदल करू नका. तसेच कारखाने, इंडस्ट्री, कोणत्याही प्रकारच्या मशीनरीवर करण्यात येणारे काम, उत्पादन याबाबतीत नव्याने कांही करू नये. तसेच नवीन उलाढाली पण करू नयेत.
- मार्च ते 30.मार्च या कालावधीत शुक्र या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. हा कालावधी अतिशय सुख समाधान देणारा आहे. तुमचा कोणताही व्यवसाय असो वा नसो पुढील क्षेत्रात नव्याने उडी मारायला हरकत नाही. घर सजावटीचे साहित्य , कलाकुसरीची कामे , कलात्मक सौंदर्यवान वस्तू , इंटिरीअर डेकोरेटर्स , फोटोग्राफी , मिठाईची दुकाने , वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळ्या प्रकारची मिठाई , ब्युटी पार्लर सुंदर सुंदर फर्निचर इत्यादी. सर्वप्रकारच्या मनाला आल्हाददायक वस्तूंचा व्यवसाय करण्याचा हा कालावधी आहे तरी त्याचा फायदा घ्या.
- 2 एप्रिल ते 10 एप्रिल या कालावधीत बुध उत्तरा भाद्रपदा या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. या कालावधीत बुध व शनी यांच्या संयुक्त गुणधर्माचे कोणतेही व्यवसाय सुरू केले तरी ते उत्तमच चालणार आहेत. वार्षिक व्यवहारातील मध्यस्थांची कामे, व्यवहारातील दलाल, एजंट्स. कोणत्याही प्रकारची कन्सल्टन्सी सर्विस, वेगवेगळ्या क्षेत्रातील सल्लागार, पोस्ट खाते, टेलिफोन खाते, आकाशवाणी व दूरदर्शन खाते. वेगवेगळ्या जाहिरात संस्था, जनसंपर्क खाते. स्टेशनरी साहित्य, प्रिंटींग, झेराक्स इत्यादी. जून्या पुराण्या वस्तूची देवघेव, जून्या देवदेवतांच्या किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातील मूर्त्या वस्तू, कोणत्याही धातूच्या वस्तू. चामड्याच्या वस्तू, बँगा, चप्पल बूट, बिल्डींग मटेरियल, टायपिंग, शाँर्टहँड, सँनिटरी मटेरियल.
अशाप्रकारे या कालावधीत उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या मदतीने जे जे मिळणार आहे ते मिळवा. पुन: वर्षभरात हा कालावधी मिळत नाही. एकदा सुरूवात करा व मग अनुभव घ्या.
मीन रास नक्षत्र रेवती चरण 1, 2, 3, 4 .
तुम्ही बुद्धीमान असून चाणाक्ष व चतुर आहात. प्रामाणिक, याच्या विचारात सचोटिला महत्व असते. स्वभावाला नरम असून माणुसकीने वागणारे असतात. तुम्हाला कायद्याचा सतत आदर असतो. तुमच्याकडून कायदा कधीच मोडला जात नाही.
- 31 मार्च ते 13 एप्रिल या कालावधीत सूर्य रेवती या नक्षत्रातून भ्रमण करतो. तसेच 10 एप्रिल ते 16 एप्रिल या कालावधीत बुध या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. या दोघांच्या गुणधर्माची क्षेत्रे पाहिल्यास तुम्हाला इतके व्यवसाय तुमच्या समोर येतील की काय करावे हा प्रश्र्न समोर उभा राहील. तरी जे शक्य आहे, जे करण्याची क्षमता आहे व जे काम आपण आपल्या स्वत:च्या हिमतीवर करू शकतो असेच क्षेत्र निवडा व लागा कामाला. ही संधी घालवू नका. एकदम सर्वच बाबतीत भरभराट देणारा कालावधी. प्रत्येक गोष्ट बुद्धीने पडताळून बघणारा कालावधी. बुद्धीच्या जोरावर काहीही करा यशस्वी होणारच. सरकारी कोणत्याही विभागातील कोणत्याही विषयावरची कार्यालये व त्यातील कोणतेही काम घ्या फायदाच फायदा. सेल्स टँक्स, इन्कम टँक्स, रोजगार कार्यालय, आयात निर्यात विभाग, एक्साईज, आंतरराष्ट्रीय व्यापार. बँक, पतसंस्था, चार्टर्ड अकाऊंटंट, आँडीटर, शेअर मार्केट, शेअर ब्रोकर्स. शाळा, काँलेज, विद्यापीठ, त्यातील शिक्षक. वृत्तपत्र, प्रकाशक, संपादक, लेखक, साहित्यिक, प्रचार व प्रसिद्धी विभाग.. जाहिरात कंपन्या, बातमीदार, प्रिंटींग प्रेस. टेलिफोन, टेलिप्रिंटर, दूरदर्शन, आकाशवाणी. रेडियो, टेपरेका़ँर्डर, मोबाईल, लँपटाँप, टीवी.
वरील क्षेत्रासंबंधीत कोणतेही काम करायला घेतलेत तरी तो तुमच्या व्यवसायाचा बेस तयार होईल. आता नाही केले तर पुन: वर्षभर हातावर हात ठेवून बसावे लागेल. आलेल्या संधीचा लाभ घ्या.
|| शुभं-भवतु ||