Read in
लेखांक 46 वा भाग 11 वा नक्षत्रीय फलादेश.
जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 या कालावधीतील प्रत्येक नक्षत्रांचा कालावधी व मिळणार्या संधीबाबतची माहिती.
वर्षाच्या बारा महिन्यातून येणारा हा कालावधी फक्त आणि फक्त त्याच कालावधीत घडणार्या घटनांसाठी जर वापरला तर आपली जी दमछाक होते ती होणार नाही. व अपेक्षित यशही मिळेल. म्हणून या वेगळ्या पद्धतीने नक्षत्रीय फलादेश द्यायचे ठरवले. जसे पावसाळ्यापूर्वीच जागरूकतेने आवश्यक त्या पूरक कामांची आपण जोडणी करतो तसेच हे पण आहे. थोडक्यात काय तर येणार्या कालावधीतील सर्व त्या संधींचा फायदा घेणे. या विचाराने हे विचार मी आपल्यासमोर मांडत आहे. प्रत्येक राशीमधे सव्वादोन नक्षत्रे येत असल्याने त्यानुसार रोज एका राशीची देण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण हे वाचावे व आपला अभिप्रायही द्यावा ही विनंती.
कुंभ राशीमधे येणारी नक्षत्रे धनिष्ठा चरण 3 व 4. शततारका चरण 1, 2, 3, 4. पूर्वा भाद्रपदा चरण चौथे.
कुंभ रास नक्षत्र धनिष्ठा चरण 3, 4..
धनिष्ठा च्या चरण 3 व 4 चा कालावधी 13 फेब्रूवारब ते 19 फेब्रुवारी आहे. या कालावधीत सूर्य धनिष्ठा च्या 3 रया व चौथ्या चरणातून भ्रमण करतो.
तुम्ही संशोधक वृत्तीचे असून अतिशय उद्योगी, व मेहनतीला मागेपुढे न पाहणारे आहात. अत्यंत विश्र्वासू व कोणत्याही कामात अग्रेसर आहात.
- 19 जानेवारी ते 25 जानेवारी या कालावधीत बुध धनिष्ठा या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे व 11 मार्च ते 16 मार्च या कालावधीत बुध धनिष्ठा या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. या कालावधीत पुढील उद्योग करणे खूपच फायद्याचे राहील. पुरग्रस्त, भूकंपग्रस्त व दुष्काळग्रस्त यांचे पुनर्वसन करणार्या संस्थेमधे काम करणे, टेलिव्हिजन टेलिफोन, तारखाते. सर्व प्रकारची खनिज तेले. चामड्याचे उद्योग उदा. बँग्ज, चप्पल व शोभेच्या वस्तू. भंगार वस्तूंची खरेदी विक्री. बागकाम व शेतीची कामे. यापैकी कोणतीही कामे तुम्ही करत असाल तर त्यात मेहनत वाढवण्यास काहीच हरकत नाही व नसल्यास जे जे शक्य आहे ते करावे.
- 12 .फेब्रूवारी ते 19 फेब्रूवारी 2021 या कालावधीत सूर्य या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. व्यवसाय करण्यासाठी सरकारी क्षेत्रे तुम्हाला खुणावत आहेत. कोणतेही क्षेत्र निवडले तरी तुमचा उद्योग चांगलाच चालणार आहे. येथे सरकारी कार्यक्षेत्रांची यादी देत नाही ती तुम्हीच ठरवा. सरकारी योजनांची माहिती घ्या. त्या पण राबवता येतात का तेही बघा. अशी संधी क्वचितच येथे त्याचा फायदा घेता आला पाहिजे.
- 21 फेब्रूवारी ते 26 फेब्रूवारी या कालावधीत शुक्र धनिष्ठा या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. या कालावधीत नव्याने कोणते व्यवसाय सुरू करू नयेत. जे आहेत तसेच सुरू ठेवावेत.नव्याने करायला गेलात तर फारसे सुखावह होणार नाही.
- 5 एप्रिल ते 21 मे या कालावधीत गुरू या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. शैक्षणिक संस्थेचे कोणत्याही प्रकारचे काम करा.शाळा, काँलेज, विद्यार्थी हाँस्टेल, आश्रमशाळा, नियमिन शाळा, कोचिंग क्लासेस याच्याबरोबर करता येणारे कोणतेही काम केल्यास तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा बेस तयार होईल. बालसंगोपन , वृद्धाश्रम, बालसुधार केंद्र, पाळणाघरे यांना मदत करणारी कामे. न्यायालयाच्या संबंधातील कामे, टायपिस्ट, स्टेनोग्राफर, वकिल, स्टँम्पवेंडर, झेराक्स व इतर सहाय्य करणारी कामे.
अशाप्रकारे धनिष्ठा नक्षत्राच्या कालावधीत तुम्ही तुमच्या क्षमताांचा विचार करून उद्योगाला सुरूवात करा. व्यवसायाला लागणारे आवश्यक ते सर्व गुण तुम्हाला नक्षत्राने दिलेलेच आहेत त्यामुळे कोणतीही शंका मनात न बाळगता कामाला लागा.
कुंभ रास नक्षत्र शततारका चरण 1, 2, 3, 4..
शततारका या नक्षत्रातून सूर्य भ्रमणांचा कालावधी 20 फेब्रूवारी चे 4 मार्च असतो.
अप्रतिम बुद्धीमत्ता, नवनवीन शिकण्याची आवड, आकलनशक्ती उत्तम, स्मरणशक्ती तर तोडच नाही. वृत्ती अतिशय महत्वाकांक्षी, कर्तबगार, कर्तृत्ववान, कष्टाची तमा न बाळगणारा, दृढ निश्र्चयी. आता मुख्य गुण म्हणजे स्वतंत्र विचार, चिकित्सक अतिशय विश्र्वासू व सेवावृती.
- 19 फेब्रूवारी ते 3 मार्चपर्यंत सूर्य शततारका नक्षत्रातून भ्रमण करणार आहे व 16 मार्च ते 25 मार्च या कालावधीत बुध या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. सरकारी खात्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील कामाची यादी करा व कोणते काम तुम्हाला करण्यास जमणार आहे त्याचा विचार करा. ढबळ मानाने आपण कांही मुख्य क्षेत्रे पाहुया. इंकम टँक्स, सेल्स टँक्स, जून्या पुराण्या वस्तूंची खरेदी विक्री, जुनी हस्तलिखिते, ऐतिहासिक गोष्टी, वस्तू. भूगर्भशास्त्र, विज्ञानातील शोधकार्य, जूने अभिलेख, खनिज संशोधन, मातीविषयीचे संशोधन इ. संख्याशास्त्र, अर्थशास्त्र, ज्योतिषी, गूढविषय, ड्राफ्टसमन, इ. इतर सर्व सरकारी निमसरकारी क्षेत्रे विचारात घ्यावीत.
- 26 फेब्रूवारी ते 09 मार्चपर्यंत शुक्र या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. या कालावधीधीत नव्याने कांहीही सुरू करू नये. जे आहे जसे आहे तसेच सुरू ठेवावे.
- 21 मे ते 21 जुलै या कालावधीत गुरू शततारका नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. या कालावधीत व्यवसायिक कोणत्याही नवीन घडामोडी करू नयेत. फारशा लाभदायक राहणार नाहीत. या कालावधीत अध्यात्मिक अभ्यासकांनी आपली प्रगती करण्याचा प्रयत्न करावा. श्री गुरूमाऊलीकडून दिक्षा घ्यावी. गुरूमंत्र घ्यावा. उपासना वाढवावी. ज्यांचा कुंडलीनी जागृतीचा अभ्यास सुरू आहे त्यांनी योग्य तर्हेने करावा. चांगला प्रत्यय येईल. दैवी उपासनेकडे लक्ष द्यावे. दैवी शक्तीची अनुभूती मिळेल.
कुंभ रास, नक्षत्र पूर्वा भाद्रपदा, चरण 1, 2, 3.
अतिशय बुद्धीमान , संशोधनाची वृत्ती, उत्तम कल्पनाशक्ती, कर्तृत्ववान व दूरदर्शी आहात. वृत्ती आशावादी असून , अतिशय प्रामाणिक व विश्र्वासू आहे.
5 मार्च ते 14 मार्च या कालावधीत सूर्य पूर्वा भाद्रपदा या नक्षत्रातून भ्रमण करतो.
- 9 मार्च ते 17 मार्च या कालावधीत शुक्र पूर्वा भाद्रपदा या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. हा कालावधी कलाकार मंडळीना अतिशय लाभदायी आहे. त्यांच्याकडे ज्या कला आहेत त्यानी एनकँश करण्याची संधी सोडू नये. कलाकार गायक, वादक वा चित्रकार पेंटींग्ज करणारे असोत त्यांनी मार्केटमधे काय चालते याचा विचार करावा व ठरवावे. प्रदर्शन भरवावे. सौंदर्यप्रसाधने, फँशनेबल वस्तू महिलांच्या नटण्याच्या वस्तू कांहीही असो त्याला उद्योगाचे रूप दिल्यास चांगला लाभ होईल. सुगंधी द्रव्ये, अत्तरे, रूम फ्रेशनर्स, अंगावर मारायचे परफ्युम्स यांचाही विचार करावा. याशिवाय कागदाच्या, मातीच्या शोभेच्या वस्तू, कलात्मक वस्तू याचाहीं व्यवसाय करू शकता. सध्याच्या काळातील लोकांची आवड ओळखून विचार करा व आलेल्या संधीचा फायदा घ्या.
- 4 मार्च ते 14 मार्च या कालावधीत सूर्य या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. या वरील कालावधीत नव्याने काहीही करू नका. फारसे फलद्रूप होणार नाही. जे पूर्वीपासूनच आहे व जसे आहे तसेच सुरू ठेवा.
- मार्च ते 31 मार्च या कालावधीत बुध पूर्वा भाद्रपदा या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. कोणत्याही विषयातील कामातील मध्यस्थीचेी कामे, दलाली, किंवा मोठमोठ्या व्यवहारातील एजंट्स ,बातमीदार, वृत्तपत्राबाबतचची कामे, प्रकाशक, संपादक. इ. पोस्ट खाते, टेलिफोन खाते, दूरदर्शन, आकाशवाणी, टेलिग्राफ, प्रिंटर इ. जाहिरात कंपनी, स्टेशनरी साहित्य. प्रचारक, सेल्समन इ. झेराक्स, कुरियर, वगैरे. अशा प्रकारे या कालावधीत वरीलप्रमाणे व लहान लहान कोणतेही व्यवसाय करायचा विचार करावा. व आलेल्या संधीचा फायदा घ्यावा.
|| शुभं-भवतु ||