Read in
मंगळवार 12 जानेवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य
मंगळवार 12 जानेवारी आज चंद्ररास धनु अहोरात्र व चंद्रनक्षत्र मूळ 07:37 पर्यंत नंतर पूर्वाषाढा 30:20 पर्यंत व नंतर उत्तराषाढा.
वरील दोन्ही राशी चा व नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :– सरकारी महिला कर्मचार्यांना अचानक सुखद अनुभव मिळणार आहे. कोणत्याही अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवास करू नये. खाजगी नोकरीतील अधिकारी वर्ग स्वतःच्या विचारांचे व यशाचे भांडवल करतील.
वृषभ :– चित्रकार मंडळीनी आपल्या चित्रांचे प्रदर्शन लावण्याचा निर्णय वेळेवर घ्यावा. सहकार क्षेत्रातील कर्मचार्यांना नवीन काँन्ट्रक्टचा विचार करावा लागेल. आईचे आँपरेशन करण्याचे नक्की ठरेल व आर्थिक मदत करावी लागेल.
मिथुन :–गर्भवती महिलांच्या बाबतीत बेजबाबदारपणे वागल्यास त्रास सोसावा लागेल. कुटुंबात आजोबांच्या वाढदिवसाचा निमित्त कार्यक्रम ठरेल व सगळा खर्च तुम्हालाच करावा लागेल. नोकरी निमित्ताने प्रवास करावा लागेल.
कर्क :– हातातील पैशावर मित्रमैत्रिणींचे लक्ष लागेल. अनाठायी पैसे खर्च करू नका. आज मौल्यवान वस्तू खरेदीचा योग आहे. बहिणीकडील गोड बातमीने कुटुंबात आनंद निर्माण होईल. विद्यार्थ्यांनी भ्रमात राहू नये.
सिंह :–मधुमेही व्यक्तीनी विशेष काळजी घ्यावी. हुषार व्यक्तींना आपली हुषारी सिद्ध करण्याची संधी मिळेल. सोनारानी आपले व्यवहार चोख ठेवावेत. आजोबांच्या प्रवासाचा बेत रद्ध करावा लागेल.
कन्या :–कुटुंबात नातवंडांचे येणे राहील. तुमच्यामुळे ज्येष्ठांना मानसिक त्रास होणार नाही याची काळजी घ्या. शेजार्यांबरोबरचे संबंध अचानक ताणले जातील. अचानक मोबाईल सापडणार नाही गहाळ होईल.
तूळ :–व्यवसायाच्या विषयात बाकीचे अनेक विषय चर्चेला घेतले जातील. नोकरीतील काँन्फरन्सची जबाबदारी तुमच्यावर येईल. मुलींच्या बाबतीत आईवडील उगीचच हळवे होतील. आज बाहेरचे अन्न खाऊ नका.
वृश्र्चिक :–शेतकरी मंडळीना आपला माल चांगल्या किंमतीला विकला जाण्याचा अनुभव येईल.. वयस्कर मंडळीना उष्णतेचा व बद्धकोष्ठतेचा त्रास संभवतो. बँकेच्या व्यवहारातून मानसिक बळ वाढेल. शिक्षकांवरील कामाचा ताण वाढेल.
धनु :– मनातील राग व्यक्त करताना योग्य भाषेचा वापर करा. आनंदाच्या भरात स्वतःची गोष्ट खुषीने देउन टाकाल .जमिनीच्या केस बाबतची वकीलबुवांची फी तातडीने द्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी जाताना जागरूक रहावे.
मकर :–नवीन घराच्या शोधात असलेल्यांनी घाई करू नये. सर्वानीच सहविचाराने निर्णय घ्यावा. गूढविद्ध्या शिकण्याची इच्छा असणार्यांनी योग्य त्या गुरूंकडूनच शिकायचे ठरवावे. वयस्कर मंडळीना झोप न लागण्याचा त्रास होईल.
कुंभ :–अध्यात्मिक अभ्यासकांना आत्मशक्तीचा अनुभव येईल पण त्याचा बाजार करू नये. कलाकार मंडळी आपले कौशल्य पणास लावतील. वडील बंधूंच्या इच्छेखातर मोठ्या दानधर्मात सहभाग घ्यावा लागेल.
मीन :– मनातील इच्छा प्रत्यक्षात पूर्ण होणार असल्याचे संकेत मिळतील. बहिणीला भावाच्या मित्राकडून विवाहाबाबतची इच्छा व्यक्त केली जाईल. आईवडीलांसाठी प्रवासाचा बेत ठरवताना बारीक सारीक बाबींकडे लक्ष द्यावे लागेल.
|| शुभं-भवतु ||