daily horoscope

सोमवार 11 जानेवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in
सोमवार 11 जानेवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य

सोमवार 11 जानेवारी 2021 आज चंद्ररास वृश्र्चिक 09:08 पर्यंत नंतर धनु. चंद्रनक्षत्र ज्येष्ठा 09:08 पर्यंत नंतर मूळ.

daily horoscope

वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–कामातून ओळखी निर्माण होतील. महिलांचे अचानक महत्वाच्या गोष्टीत घुमजाव होईल.. विद्यार्थ्यांनी इतरांच्या गोष्टी ऐकून स्वत:विषयी मत बदलु नये. जागेचा ठरलेला व्यवहार अचानक बिघडणार नाही याची दक्षता घ्या.

वृषभ :– अध्यात्मिक मंडळीना अचानक दैवी शक्तीचा अनुभव येईल किंवा एखादी सूचक घटना घडेल. कुटुंबात मोठ्या भावाविषयीची विवाहाची बोलणी पुढे सरकण्याची जबाबदारी तुमच्यावर येईल. मनाला शांतता लाभेल.

मिथुन :–काल घडलेल्या घटनेने मनाला दु:ख होईल. आईच्या तब्बेतीची काळजी घ्यावी लागेल. बँकेच्या व्यवहारात तुमच्या हातून गडबड होणार आहे तरी आज कोणताही बँकेचा व्यवहार करू नका.

कर्क :– तुम्हाला आज भावनाना आवर घालणे कठीण जाईल. स्वत: च्या हिमतीवर होणारेच कार्य स्विकारा. आज तुमच्या जीवावर काम टाकून जाणारे तुम्हाला भेटणार आहेत. कुटुंबातील ज्येष्ठांकडून आवडणारी भेटवस्तू मिळेल.

सिंह :– मित्राच्या आर्थिक संकटात त्याच्यामागे उभे रहावे लागेल. नोकरीतील दुर्लक्षित कामाचा भार तुमच्यावर येईल. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून नव्याने फायदा होईल. सध्या नवीन गुंतवणूक करू नका.

कन्या :– कोणत्याही व्यक्तीला क्षुल्लक लेखू नका. महिलांनी मनातील विचाराना वाट करून द्यावी. व्यावसायिकांनी आपल्या प्राँडक्टची पथ जाणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे आहे. वयस्कर मंडळीनी आज दगदग करू नये.

तूळ :–मित्राला  प्रवासाची गरज निर्माण होऊन त्याच्याबरोबर जावे लागेल. तरूणांनी उत्साहाच्या भरात मपैसे खर्च करू नयेत. वयस्कर मंडळीना त्यांच्या जीवाभावाचे मित्र भेटतील व हितगुज होईल.

वृश्र्चिक :– नव्याने खरेदी केलेली वस्तू खराब लागण्याचा धोका आहे. घराच्या किल्ल्या जपून सांभाळून ठेवा आज गहाळ होण्याचा धोका आहे. कुटुंबात नवीन पाहुणा येणार असल्याची गोड बातमी कळेल.

धनु :– कुटुंबात स्थावर इस्टेटीबाबत चर्चा होईल पण मनासारखा निर्णय होणार नाही. हाती घेतलेल्या कामात कोणत्याही प्रकारचा अडथळा न येता काम यशस्वीपणे पूर्ण होईल. मानसिक ताण येणार नाही याची काळजी घ्या.

मकर :– वडीलांनी मुलांवर किंवा इतरांवरही विसंबून राहू नये. तरूणांना व्यायामाचे महत्व पटेल. लाईटचे काम करणार्‍या वायरमननी अतिशय काळजीपूर्वक काम करावे. पोलवर चढणार्‍यानी विशेष लक्षात ठेवावे.

कुंभ :–दहा वर्षाच्या आतील मुलांना बाहेर नेल्यास सांभाळावे. तसेच त्यांच्या हातात आज सायकल वगैरे देऊ नये. वयस्कर मंडळीनी घरी चालताना सावकाश चालावे पायात पाय अडकण्याची शक्यता आहे.

मीन :–नोकरीतील अवघड काम पूर्ण करण्याचे घेतलेले चँलेंज पूर्ण करण्याचा ध्यास लागेल. नवीन घराच्या शोधात असलेल्यांनी घाई करू नये फसगत होण्याचा धोका आहे. खाण्यापिण्याची दक्षता घ्यावी लागेल.

|| शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *