Read in
लेखांक 45 वा नक्षत्रीय फलादेश भाग 10 वा.
जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 या कालावधीतील प्रत्येक नक्षत्रांचा कालावधी व मिळणार्या संधीबाबतची माहिती.
वर्षाच्या बारा महिन्यातून येणारा हा कालावधी फक्त आणि फक्त त्याच कालावधीत घडणार्या घटनांसाठी जर वापरला तर आपली जी दमछाक होते ती होणार नाही. व अपेक्षित यशही मिळेल. म्हणून या वेगळ्या पद्धतीने नक्षत्रीय फलादेश द्यायचे ठरवले. जसे पावसाळ्यापूर्वीच जागरूकतेने आवश्यक त्या पूरक कामांची आपण जोडणी करतो तसेच हे पण आहे. थोडक्यात काय तर येणार्या कालावधीतील सर्व त्या संधींचा फायदा घेणे. या विचाराने हे विचार मी आपल्यासमोर मांडत आहे. प्रत्येक राशीमधे सव्वादोन नक्षत्रे येत असल्याने त्यानुसार रोज एका राशीची देण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण हे वाचावे व आपला अभिप्रायही द्यावा ही विनंती.
मकर. राशीमधे येणारी नक्षत्रे उत्तराषाढा चरण 2, 3, 4..श्रवण चरण 1, 2, 3, 4 .. धनिष्ठा 1, 2..
मकर रास नक्षत्र उत्तराषाढा चरण 2, 3, 4..
उत्तराषाढाच्या चरण 2 ते 4 चा कालावधी 15 जानेवारी ते 24 जानेवारी हा आहे.
या कालावधीत सूर्य उत्तराषाढा या नक्षत्रातून भ्रमण करतो.
तुम्ही अतिशय बुद्धीमान , संशोधक वृत्तीचे, गणिताचे प्रेमी व प्रगल्भ बुद्धीचे आहात. स्वभाव शिस्तप्रिय, व्यवहारकुशल व निश्र्चयी आहे. कष्टाळू, चिकाटीने काम करणारे व कार्यतत्पर असून अतिशय विश्र्वासू आहात. या नक्षत्राचे वैशिष्ट्य असे आहे की, तुमच्याकडे हार न मानणारी इच्छाशक्ती आहे.
14 जानेवारी ते 23 जानेवारी 2021 या कालावधीत सूर्य या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे.
10 जानेवारी ते 24 जानेवारी 2021 या कालावधीत शुक्र या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे.
- मध्यमवर्गातील सेवकवृत्तीच्या वर्गाला हे नक्षत्र जास्त फलदायी आहे. रवीच्या अधिपत्याखाली असलेला कोणताही व्यवसाय चांगला चालणार आहे.
- ज्यांचे आधीच व्यवसाय आहेत त्यांचे व्यवसाय या कालावधीत फ्लरीश होउ लागतील. व ज्याना कोणताही उद्योग करावयाचा आहे त्यांनी ही संधी सोडू नये.
- पोस्टासंदर्भातील कामे, औषधी कंपनीतील कामे, सुरक्षा रक्षक, लोकरीच्या वस्तू, चामड्याच्या वस्तू, प्रवासी संस्थेबाबतची कामे, विमा कंपन्या, सेल्सटँक्स, होमिओपॅथीच्या औषधाची दुकाने, पुराणवस्तु. इ.
मकर रास नक्षत्र श्रवण चरण 1 ते 4.
तुम्ही अतिशय बुद्धीमान, चिकाटीने काम करणारे, निश्र्चयी, आणि आपण करत असलेल्या कामाशी एकनिष्ठ आहात. वृत्ती दिर्घोद्योगी असून अतिशय मेहनती पण अती चिकीत्सक आहात.
- 24 जानेवारी 2021 ते 6 फेब्रुवारी 2021 या कालावधीत सूर्य श्रवण या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. सेल्स टँक्स, इन्कम टँक्स, इंजिनीअरींग, वकिली, पोस्ट खाते, सरकारी हाँस्पिटलस् मधील परिचारिका इ. विभागात नोकरी नसल्यास या विभागाशी संबंधीत कोणताही उद्योग केल्यास तुम्हाला यश येणार आहे.
- 11 जानेवारी ते 19 जानेवारी या कालावधीत बुध श्रवण या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. पोस्ट, टेलिग्राफ व तार खाते, टेलिप्रिंटर, टेलिफोन, दूरध्वनी, लहान लहान व्यवसायातील मध्यस्थाची कामे, दलाल, सेल्स टँक्स, इन्कम टँक्स, एजंट्स, कन्सल्टन्सी सर्विस, कुरियर सर्विस, रेडियो, आकाशवाणी, टीव्ही. यापैकी कोणत्याही विभागातील कोणत्याही कामाचा व्यवसाय सुरू केला तरी चांगला चालणार आहे.
- 5 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत शुक्र या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. वरील कालावधीत तुमजे जे व्यवसाय सुरू आहेत ते तसेच सुरू ठेवावेत त्यात विशेष घडामोडी करू नयेत.
- 6 जानेवारी ते 4 मार्च या कालावधीत गुरू श्रवण नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. शैक्षणिक संस्थेत काम करणार्या व्यक्ती, शैक्षणिक प्रकल्पामध्ये किंवा एखाद्या मोठ्या प्रोजेक्टमधे सहभागी असलेल्या व्यक्ती, खाजगी शिकवशी वर्ग, तसेच न्यायालयासंबंधीतील कर्मचारी वर्ग व अधिकारी वर्ग. मानसोपचार तज्ञांनी सध्या आपल्या कामाच्या कक्षा वाढवाव्यात. वरील कार्यक्षेत्रातील व्यक्तीनी त्या त्या कामाशी रिलेटेड उद्योग सुरू केल्यास चांगला चालणार आहे.
- शनि महाराज 21 जानेवारी 2021 पासून 17 फेब्रुवारी 2022 पर्यंत श्रवण नक्षत्रातून भ्रमण करणार आहेत. हा कालावधी सर्वच राशीना कसा जाणार आहे यावर वेगळा लेख देत आहे.
मकर रास नक्षत्र धनिष्ठा चरण 1 व 2 .
सूर्य धनिष्ठा नक्षत्रातून 7 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी या कालावधीत धनिष्ठा नक्षत्रातून भ्रमण करणार आहे.
तुम्ही अतिशय प्रगल्भ बुद्धी असलेले, संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे आहात. असामान्य साहस व धाडस असून अंग मोडून काम करण्याची वृत्ती आहे. तीव्र इच्छाशक्ती असून, अतिशय उच्च दर्जाची महत्वाकांक्षा आहे. निर्णय घेणे व त्याप्रमाणे वागणे हे तुमचे ब्रीदवाक्य आहे.
- 19 जानेवारी ते 25 जानेवारी या कालावधीत बुध धनिष्ठा नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. या कालावधीत तुमचे जे व्यवसाय आहेत ते तसेच सुरू ठेवा. त्यामधे कोणत्याही प्रकारच्या नव्याने घडामोडी करू नका. फारशा लाभदायक होणार नाहीत. आहे त्या व्यवसायापेक्षा दुसरा व्यवसायासाठी केलेली धडपड व्यर्थ जाईल म्हणून जसे चाललेय तसेच चालू राहूदे.
- 7 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी या कालावधीत सूर्य या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. या कालावधीत जी जी सरकारी क्षेत्रे आहेत त्यातील तुमच्याकडे असलेल्या क्षमताांचा विचार करून व्यवसायाचा विचार करा. इथे सरकारी कार्यक्षेत्रांची माहिती देताना भलीमोठी लिस्ट होईल. तरी तुम्हीच सरकारी क्षेत्रांचा अभ्यास करू जे जे शक्य आहे ते ठरवा. सरकारी परवानग्या ही तुम्हाला सहजपणे मिळणार आहेत. जे पूर्वीपासूनच सरकारी कार्यक्षेत्राच्या व्यवसायात आहेत त्यांना अतून कार्यक्षेत्र वाढवावयाचे असेल तरी वाढवू शकता.
- 15 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी या कालावधीत शुक्र धनिष्ठा या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. जूने व्यवसाय तसेच सुरू ठेवा. नव्याने सुरू करण्याचे ठरवू नका व करू पण नका.
- 4 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीत गुरू धनिष्ठा या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. शैक्षणिक संस्था, शाळा, काँलेज , शिक्षण संस्थेचे प्रकल्प, कोणत्याही प्रकारचे प्रोजेक्ट कोचिंग क्लासेस इ. क्षेत्रांना सपोर्ट करणारा कोणताही व्यवसायात तुम्हाला यश येईल. न्यायालयासंबंधीतील कामे, स्टेनो, टायपिस्ट, कर्मचारी वर्ग यांच्या क्षेत्रातील कामे. जेलसंबंधीतील कामे. आश्रमशाळा, बालसुधार केंद्र, बालसंगोपन केंद्र, पाळणाघरे याक्षेत्रातील कामे. पुजारी, पुरोहित वगैरे.
वरीलपैकी कोणत्याही क्षेत्रातील तुम्हाला शक्य असलेले कोणतेही काम तुम्ही करू शकता. हा कालावधी तुमच्यासाठी भरभराटीचा आहे.
|| शुभं-भवतु ||