Read in
लेखांक 44 वा. नक्षत्रीय फलादेश – भाग 9
जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 या कालावधीतील प्रत्येक नक्षत्रांचा कालावधी व मिळणार्या संधीबाबतची माहिती.
वर्षाच्या बारा महिन्यातून येणारा हा कालावधी फक्त आणि फक्त त्याच कालावधीत घडणार्या घटनांसाठी जर वापरला तर आपली जी दमछाक होते ती होणार नाही. व अपेक्षित यशही मिळेल. म्हणून या वेगळ्या पद्धतीने नक्षत्रीय फलादेश द्यायचे ठरवले. जसे पावसाळ्यापूर्वीच जागरूकतेने आवश्यक त्या पूरक कामांची आपण जोडणी करतो तसेच हे पण आहे. थोडक्यात काय तर येणार्या कालावधीतील सर्व त्या संधींचा फायदा घेणे. या विचाराने हे विचार मी आपल्यासमोर मांडत आहे. प्रत्येक राशीमधे सव्वादोन नक्षत्रे येत असल्याने त्यानुसार रोज एका राशीची देण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण हे वाचावे व आपला अभिप्रायही द्यावा ही विनंती.
धनु राशीत येणारी नक्षत्रे मूळ चरण 1, 2, 3, 4..पूर्वाढाषा चरण 1, 2, 3, 4..उत्तराषाढा चरण 1.
धनु रास, नक्षत्र मूळ चरण 1 ते 4.
मूळ नक्षत्राच्या चरण 1.ते 4 चा कालावधी 15 डिसेंबर ते 29 डिसेंबर आहे. हा कालावधी संपला असल्याने या नक्षत्रा करीता चे नियोजन पुढील वर्षात करता येईल.
धनु रास नक्षत्र पूर्वाषाढा चरण 1 ते 4.
30 डिसेंबर ते 10 जानेवारी या कालावधीत सूर्य पूर्वाषाढा या चरणातून भ्रमण करणार आहे.
बुद्धीमान, कार्यकुशल, अतिशय चतुर , व उच्च विचारसरणी असलेले आहात. स्वभावात नम्रपणा., प्रामाणिकपणा असून, अतिशय न्यायी वृत्तीचे आहात. स्वभाव विश्र्वासू व मनमोकळा असून स्वभावात समतोलपणा आहे.
- 13 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत शुक्र पूर्वाषाढा या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. अतिशय सुख समाधान देणारा कालावधी आहे. या कालावधीत तुम्ही पुढीलप्रमाणे व्यवसाय करू शकता. कलात्मक व सौंदर्य वस्तू, घर सुशोभित करणार्या वस्तू, सुंदर पडदे ,वेगवेगळ्या प्रकारची तोरणे, मूर्त्या मातीच्या धातूच्या मूर्त्या. सुगंधी अत्तरे, रूम फ्रेशनर्स, अंगावर मारायचे परफ्युम्स, वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे शेप्स असलेले चष्मे, गाँगल्स. वेगवेगळ्या वासाच्या उदबत्त्या, वेगवेगळ्या प्रकारचे लाईटस्, लाईटच्या माळा इ. सौंदर्यप्रसाधनाच्या साहित्य, मेकअपचे साहित्य, केसांचे वेगवेगळ्या स्टाईलचे विग इ.
- 18 डिसेंबर ते 27 डिसेंबर या कालावधीत बुध पूर्वाषाढा या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. वाचन साहित्यात ललित कथा, प्रेमकथा. काव्य साहित्यात प्रेमगीत, मैत्रीगीत सौंदर्यगीत, निसर्गगीत, आनंदी, व प्रेमगीताच्या, गाण्यांच्या सीडी तयार करणे, संकलन करणे प्रेमकथा चे आँडीओ तयार करणे व वितरण करणे. जाहिरात कंपनीद्वारा वेगवेगळ्या मनोरंजनात्मक, आशयपूर्ण, वेगवेगळ्या रंगांची उधळण करून आकर्षक जाहिराती तयार करणे.
- 29 डिसेंबर. 2021 ते 10 जानेवारी 2022 या कालावधीत सूर्य या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. या चालू वर्षीच्या 09 जानेवारीपर्यंत सूर्य पूर्वाषाढा नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. या कालावधीत अग्नीवर शिजले किंवा भाजले जाणारे कोणतेही खाद्यपदार्थांचे व्यवसाय करू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे मसाले चांगले मार्केट देतील. भाजके काजू, बदाम, शेंगदाणे, फुटाणे, वेगवेगळ्या प्रकारच्या लाह्या, कुरमुरे, कुरमुर्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भेळी इ. प्रकारचे उद्योग जोरात चालू शकतात.
- मंगळाचा कालावधी 16 जानेवारी 2022 ते 3 फेब्रुवारी 2022 असा येत आहे. तरी त्याचा विचार 2022 त्या नियोजनात करूया.
वरील प्रकारे व्यवसाय किंवा लहानसे उद्योग जरी सुरू केले तरी खूप चांगला व्यवसाय चालेल व लवकरच लक्ष्मीपती व्हाल. हे तुम्हाला खुष करण्याकरीता सांगितलेले नाही तर वस्तुस्थिती आहे अनुभव घ्या व धनाढ्य व्हा.
धनु रास नक्षत्र उत्तराषाढा चरण १
11 जानेवारी ते 14 जानेवारी या कालावधीत सूर्य उत्तराषाढा च्या पहिल्या चरणातून भ्रमण करतो. या चालु वर्षी 10 जानेवारी 2021 ते 14 जानेवारी या कालावधीत सूर्य या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे.
तुम्ही अतिशय बुद्धीमान , उत्तम स्मरणशक्ती चे व उत्तम आकलनशक्तीचे असून , अतिशय महत्वकांक्षी आहात. मेहनतीला कधीही मागेपुढे न पाहणारे, अतिशय निश्र्चयी व कष्टाळू आहात.
या कालावधीत सरकारी योजनांचा कसा लाभ घेता येईल याचा विचार करा. शासकिय परवानग्या पण सहजपणे मिळतील. एम. एम. आर. डी. सारख्या किंवा इतर कोणत्याही शासनाकडून चालवणार्या योजनांचा विचार करा. टेंडर भरणे वगैरे कामी दुर्लक्ष न करता केल्यास या योजनांची संधी मिळेल.ला माहित असलेली यादी तुटपुंजी होऊन आपल्या ङातातून एखादी संधी जाऊ नये म्हणून सरकारी योजनांचाी तुम्हीच माहिती मिळवा.
|| शुभं-भवतु ||