Read in
शनिवार 09 जानेवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेशशनिवार 09 जानेवारी चंद्र रास वृश्र्चिक दिवसरात्र चंद्रनक्षत्र विशाखा 12:31 पर्यंत व नंतर अनुराधा.
वरील राशीचा व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–जमिनीची कामे विचारपूर्वक करा. कालपासून हातात घेतलेल्या कामाला मार्गस्थ कराल. पतीपत्नीच्या व्यवसायात अचानक बहिणीकडून मदतीचा हात मिळेल. आत्मविश्वासाने प्रसंगाला सामोरे जा.
वृषभ:–कामातील अडचणींवर मनासारखा उपाय सापडेल. राजकीय व्यक्तींना आपले हेतू साध्या करता येणार आहेत. व्यवसायातील घडामोडींवर विचार करून परिस्थितीवर मात कराल. शेजारच्यांना मदत करावी लागेल. .
मिथुन :–ध्यासाचा व जिद्धीचा अतिरेक होणार नाही याची दक्षता घ्या. सार्वजनिक क्षेत्रातील अडचणी मांडण्यासाठी सतत तुम्हीच नेतृत्व करण्याची गरज नाही. जबाबदारी इतरांवरही सोपवा. तुमच्या विचारांना सर्वांकडून मान मिळेल.
कर्क :– जगावेगळे मत मांडताना सगळे विरोधात जातील पण तुमचे मत त्यांना कालांतराने पटणार आहे. खिशातील पैसे पाहूनच खरेदीचे बेत आखला. वडीलांकरीता महत्वाच्या कामासाठी बरोबर जावे लागेल.
सिंह :–नातेवाईकांबरोबर गहन चर्चा करावी लागणार आहे व त्यात तुमचा सहभाग महत्वाचा राहील. ज्येष्ठांना दिलेला शब्द नंतर बदलता येणार नाही तरी विचार करून मगच शब्द द्या. भाड्याच्या घराचा शोध आता फार दिवस करावा लागणार नाही.
कन्या :–उगीचच फालतू चर्चमधे वेळ घालवू नका. विद्यार्थ्यांनी इतरांच्या बरोबर बरोबरी न करता स्वत:चे हित बघणे महत्वाचे आहे. आँन लाईन क्लासेसच्या वेळी लक्ष न दिल्याचा परिणाम सोसावा लागेल जूने विचार सोडून द्या.
तूळ :–सततच्या कामामुळे मनावर व डोळ्यावर ताण येईल. मशीनवर काम करणार्यांनी विशेष काळजी घ्यावी. अचानक तुमच्या कामातील अडचणी दूर करू शकणार्या व्यक्तीची गाठभेट होईल.
वृश्र्चिक :–अती स्पर्धात्मक वृत्तीमुळे मानसिक त्रास होईल. विद्यार्थ्यांना जागरणाचा त्रास होईल. गेले महिनाभर करत असलेल्या सरावामुळे आज यश मिळत असल्याचे जाणवेल. महत्वाच्या कामासाठी तज्ञांचा सल्ला आवश्यक ठरेल.
धनु :–कोणतेही काम मनापासून करण्याची सवय लावून घ्या. मोठ्या भावंडाकडून प्रेमाची भेट मिळेल. गणित शाखेच्या विद्यार्थांना अवघड गणिते येऊ लागल्याने सर्वांकडून कौतुक होईल व स्वत:लाही आनंद होईल.
मकर :–प्रवासाला जाताना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल व औषधे विसरू नका. आज खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. तरूणांच्या मनामध्ये आलेल्या सकारात्मक विचारांमुळे वैचारिक दिशा बदलेल.
कुंभ :–आज मुलांना महत्वाच्या कामासाठी पैशाचा तुटवडा जाणवेल व पैशाचे महत्व कळेल. वयस्कर मंडळीनी आपले विचार व्यक्त करावेत पण इतरांवर लादू नयेत. गायक मंडळीना मैफिलीत गाणे सादर करता येईल.महिलांना संमिश्र दिवस जाईल.
मीन :–तुम्ही कृती करण्यापूर्वी समोरच्याचे ऐकून घ्या व मगच निर्णय घ्या. व्यवसायातील भागिदारास आपले विचार स्पष्टपणे सांगा. विद्यार्थ्यानी यशाकरता फक्त क्लासवरच अवलंबून राहू नये. डॉक्टर मंडळीना दगदगीचा दिवस आहे.
|| शुभं-भवतु ||