Read in
रविवार 10 जानेवारीचे 2021 दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश रविवार 10 जानेवारी 2021 आज चंद्ररास वृश्र्चिक अहोरात्र असून चंद्रनक्षत्र अनुराधा 10:49 पर्यंत असून नंतर ज्येष्ठा सुरू होत आहे.
वरील राशीचा व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–मानसिक ताणतणाव वाढेल. प्रथम ब्लडप्रेशर चेक करा. व मगच कामाला लागा. लहान मुलांकडे लक्ष द्यावे लागेल. कांहीतरी जखम होऊन रक्तस्त्राव होईल. सरकारी कामातून फायदाच फायदा होईल असे संकेत मिळतील.
वृषभ :–आज सकाळपासून लगबगीचा दिवस आहे. महत्वाच्या कामात व्यस्त रहाल. गुरूतुल्य व्यक्तीचा सहवास मिळेल. बुद्धीच्या जोरावर कामातील अडथळे दूर करालच पण त्याचबरोबर नोकरीत न क्रेडीट ही घ्याल.
मिथुन :– कुटुंबात आज पतीपत्नी दोघांच्याही नात्याकडील पाहुणे अचानक येणार आहेत. भेटीगाठीतून आनंद मिळेल. पत्नीच्या बहिणीकडून व्यवसायात मोठ्या रकमेचा सहभाग मिळेल.
कर्क :– आज सकाळीच पित्ताचा त्रास होईल. ताबडतोप औषध घ्या. लेखक मंडळीना स्वत:च्या पुस्तकाबद्दल भरभरून बोलता येणार आहे तरी संधी घालवू नका. विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा जोर वाढवावा.
सिंह :–कोर्टाच्या कामातील दिरंगाई त्रासदायक ठरल्याचे जाणवेल. वकीलांकडून पाठपुरावा करा. आईसाठी दवाखान्यात जावे लागेल. तरूणांना मनातील भावभावनांना आवर घालता येणार नाही.
कन्या :–आईवडीलांसमवेत एखाद्या नव्या योजनेचे नियोजन कराल. नवीन घरात जाण्यासाठी आतूर व्हाल. लहान मुलांच्या हातातील वस्तु कडे लक्ष द्या तोंडात घालण्याचा आज धोका आहे.
तूळ :– कामातील दुसर्यांवर टाकलेला विश्र्वास निष्फळ ठरेल व आता काम दुप्पट करावे लागेल. सरकारी दंड वसूल करण्यात येईल. मशीनवर काम करणार्यांनी घाई करू नये. आज प्र ासाचे नियोजन नको.
वृश्र्चिक :– नवीन वस्त्राची खरेदी कराल. घर सजावटीच्या खरेदीत विचार न करता पैसे खर्च होतील. कुटुंबात एखादा धार्मिक विधी करण्याचे नियोजन होईल व त्याची जबाबदारी तुमच्यावर राहील.
धनु :–अभ्यासातील गती समाधानकारक राहणार नाही. तुमच्या वागण्यातील हट्टीपणा कमी होऊ लागल्याचे जाणवेल. आई वडिलांबरोबर चांगला रेपो जमेल. कुटुंबात एकत्रीत सुग्रास जेवणाचा बेत जमेल.
मकर :– प्रवासात नव्याने झालेल्या ओळखीचा उपयोग होत असल्याचे जाणवेल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीचा ईतर नातेवाईकांकडून सन्मान केला जाईल. कलाकार मंडळींचे समाजाकडून कौतूक होईल.
कुंभ :–पूर्व नियोजित कार्यक्रम रद्ध करावा लागेल. नोकरीच्या निमित्ताने करावयाचा प्रवासही रद्ध होणार आहे. व्यावसायिकांना भांडवलात वाढ करावी लागणार आहे तरी तशी तरतूद करावी लागेल.
मीन :– बर्याच दिवसापासूनची मनातील सूप्त ईच्छा पूर्ण होणार असल्याचे संकेत मिळतील. गुरूतुल्य व्यक्तीकडून मोठे मार्गदर्शन मिळेल. व्यवसायात मागिल वर्षाचे राहिलेली उधारी मिळण्याचे मार्ग दिसतील.
|| शुभं-भवतु ||