जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 या कालावधीतील प्रत्येक नक्षत्रांचा कालावधी व मिळणार्‍या संधीबाबतची माहिती. #8

Read in
लेखांक 43 वा. नक्षत्रीय फलादेश – भाग​ 8
जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 या कालावधीतील प्रत्येक नक्षत्रांचा कालावधी व मिळणार्‍या संधीबाबतची माहिती.

वर्षाच्या बारा महिन्यातून येणारा हा कालावधी फक्त आणि फक्त त्याच कालावधीत घडणार्‍या घटनांसाठी जर वापरला तर आपली जी दमछाक होते ती होणार नाही. व अपेक्षित यशही मिळेल. म्हणून या वेगळ्या पद्धतीने नक्षत्रीय फलादेश द्यायचे ठरवले. जसे पावसाळ्यापूर्वीच जागरूकतेने आवश्यक त्या पूरक कामांची आपण जोडणी करतो तसेच हे पण आहे. थोडक्यात काय तर येणार्‍या  कालावधीतील सर्व त्या संधींचा फायदा घेणे. या विचाराने हे विचार मी आपल्यासमोर मांडत आहे. प्रत्येक राशीमधे सव्वादोन नक्षत्रे येत असल्याने त्यानुसार रोज एका राशीची देण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण हे वाचावे व आपला अभिप्रायही द्यावा ही विनंती.

वृश्र्चिक राशीमध्ये येणारी नक्षत्रे ( विशाखा चरण चौथे, अनुराधा चरण 1, 2, 3, 4. ज्येष्ठा चरण 1, 2, 3, 4.
वृश्र्चिक रास नक्षत्र विशाखा चरण चौथे.

17 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत सूर्य विशाखा नक्षत्राच्या चौथ्या चरणातून भ्रमण करणार आहे.

तुम्ही अतिशय स्वतंत्र विचाराचे  अतिस्पष्ट बोलणारे बुद्धीमान , नेतृत्व गुण असणारे आहात. तर्कबुद्धी उत्तम, कूटनितीचे चांगले ज्ञान, स्वभाव उमदा , धाडसी प्रामाणिक आहे. वृत्ती उदार असून प्रांजळपणा पण तितकाच असतो.

  1. 2  आँक्टोबर ते 5 आँक्टोबर या कालावधीत शुक्र विशाखा नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. येथे आपल्याला फक्त चौथ्या चरणाचा विचार करायचा आहे. विमा कंपनी, विमा एजंटची कामे, शेअर मार्केटचा स्टाफ, आयुर्वेदीक औषधांच्या कंपन्यांमधील कर्मचारी वर्ग, आयुर्वेदीक औषधा बरोबर वेगवेगळी तेले, रसायने यांचे निर्माते अशा प्रकारचे काम करणारे.  शिक्षक, प्रोफेसर इ.
  2. 21  नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या कालावधीत बुध विशाखा नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. न्यायसंस्थेतील कर्मचारीच नाही तर न्यायाधिश, वकील  हे सुद्धा याच नक्षत्राच्या अधिपत्याखाली येतात. संरक्षण संस्थेचे सर्व विभाग.
  3. 16  नोव्हेंबर ते 19  नोव्हेंबर या कालावधीत रवि विशाखा नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. संरक्षणाच्या क्षेत्रातील विभाग., औद्योगिक कारखाने , फौजदारी वकील, जज्ज, हे विभाग या नक्षत्राच्या अधिपत्याखाली येतात.
  4. 05  डिसेंबर ते 09  डिसेंबर या कालावधीत मंगळ  विशाखा नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. 
  5. सर्जन, डाँक्टर, वेगवेगळ्या सरकारी व खाजगी बँका, इंजिनीअर्स, जमिनीचे मालक, बांधकाम खात्यातील सर्व प्रकारचे वर्ग  अशा प्रकारे ही सर्व क्षेत्रे या नक्षत्राच्या अधिपत्याखाली येतात. या नक्षत्रातील व्यक्तीनी  वर उल्लेखलेल्या कोणत्याही क्षेत्राविषयीचा एखादा व्यवसाय सुरू केल्यास चांगला चालतो  गुरूचे रवि व मंगळ हे मित्र असल्याने रवि व मंगळाचे जो उद्योग करता येईल त्याचा विचार करावा. शुक्र व गुरू जरी मित्र नसले तरीही विम्यासंबंधातील उद्योग करायला हरकत नाही.

औषधी तेलाची विक्री घरातूनच करू शकता त्यासाठी दुकान पाहिजे हा विचार नको


रास वृश्र्चिक नक्षत्र अनुराधा चरण 1, 2, 3, 4..

20 नोव्हेंबर ते 02 डिसेंबर या कालावधीत सूर्य अनुराधा नक्षत्राच्या चारही चरणातून भ्रमण करतो. 

तुम्हाला कलाकौशल्याची प्रचंड प्रमाणात आवड  असून गायन, वादन व नृत्य यांचे दर्दी  आहात. चित्रकला, पेंटींग  व कलेची आवड. मौल्यवान अलंकार, उंची वस्त्रे व वेगवेगळी अत्तरे यांचेही प्रचंड शौकिन आहात. . वाहनाविषयीचे आकर्षण असल्याने  वाहनसुखाची अत्यंत लालसा  अस                                                                   .                 .                                                                                                                                                                                                                                                                  ते.                                                                                                

  1. 05 आँक्टोबर ते 17 आँक्टोबर या कालावधीत शुक्र अनुराधा या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. चामड्याच्या दैनंदिन गरजेच्या व शोभिवंत वस्तू. अपंगांची साधने वा साहित्य. बिल्डींग मटेरियल जसे रेती विटा, सिमेंट वगैरे. जून्या वस्तूंचे व्यवसाय. ड्रायफ्रूट्स.घरगुती, किंवा लाकडी घाण्यातून काढलेली तेले.यापैकी कोणताही उद्योग करावा किंवा अशा उद्योगात शामिल व्हावे. त्यातून चांगले उत्पन्न मिळेल.
  1. 19 नोव्हेंबर ते  02 डिसेंबर या कालावधीत सूर्य अनुराधा नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. प्रथम वडिलोपार्जित व्यवसायात लक्ष घालावे व तसे नसल्यास मग स्वत:चा सुरू करण्याचा विचार करावा. खाद्यपदार्थांचा व्यवसाय. खाद्यपदार्थ, नाश्ता, जेवण हाँस्पिटलना पुरवणे, आँफिसर्सना पुरवणे, हाँस्टेल्स, धर्मशाळा येथे अन्नछत्र चालवणे तसेच खानावळ  चालवणे. कोणत्याही इव्हेंट्सना जेवण, चहा, नाश्ता पुरवणे.
  1. 23 नोव्हेंबर ते 02 डिसेंबर या कालावधीत बुध या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. आकाशवाणी, टीव्ही खाते येथे काम करणे. दूरध्वनी खाते व रेडीओ. या क्षेत्रांचा वापर करणे, जाहिराती बनवणे सामाजिक आशयावर लेखन करणे, परिसंवाद, चर्चा व ओरिएंटेशन देणे.
  1. 09 डिसेंबर ते 28 डिसेंबर या कालावधीत मंगळ अनुराधा नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. दारूगोळा, फटाके, पेट्रोलियम पदार्थ. आँपरेशन थिएटरमधील साधने, हत्यारांचा व्यवसाय. मेकँनिकल इंजिनीअर अश्या शाखेचे काम. लोखंडी किंवा स्टीलचा व्यवसाय. सुरक्षा यंत्रणेतील सहभाग, नोकरी किंवा त्याचे प्रशिक्षण देणे.

अनुराधा हे नक्षत्र अतिशय धडाडीने काम करणारे आहे. सतत नेतृत्वाची आस असल्याने  व स्वभाव लढवय्या असल्याने तुमच्याकडे उत्साह पुरेपूर असतो. अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी सतत तत्पर असता. अतिशय महत्वाकांक्षी व कोणतीही अंमलबजावणी करण्यास सतत तयार असणे हा मुख्य गुण आहे. 

वरील गुणधर्मावरून पूर्ण विचार करून व्यवसायाचा विचार करावा व तज्ञांचेही मत घ्यावे. कारण जिंकू किंवा मरू हे तत्व कायमस्वरूपी सुखावह होत नाही. त्यामुळे शक्यतो नोकरीच करावी  व्यवसायाच्या नादाला लागू नये.


वृश्र्चिक रास नक्षत्र ज्येष्ठा चरण 1, 2, 3, 4. 

3  डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत सूर्य ज्येष्ठा नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. 

तुम्ही अभ्यासू, उत्साही, धाडसी, पराक्रमी व अत्यंत निश्र्चयी आहात. स्वभाव महत्वाकांक्षी असून अतिशय स्वाभिमानी आहात. तर्कशक्तीचे असून ज्योतिष, गुढशास्त्राची प्रचंड आवड आहे. बुद्धी तीक्ष्ण असून वादविवादात तरबेज आहात. 

3 डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत सूर्य ज्येष्ठा नक्षत्रातून भ्रमण करणार आहे  तसेच 

  1. 1 डिसेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत बुध ज्येष्ठा नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. मिलिटरी, नेव्ही, अग्निशमन दल, एक्साईज खाते, वकील, बँरिस्टर  अकाउंटंट, फाँरेस्ट खाते येथे काम करणारे सर्व स्तरातील व्यक्ती. प्रथम श्रेणीपासून पासून चतुर्थ श्रेणीपर्यंत.
  1. आँडिटर, कस्टमखाते., स्टेटेनोग्राफर्स, टपालखाते, पत्रकार, जाहिराती, करीयर, विमाकंपनीयाखात्यातीलसर्ववर्ग. अधिकारीवर्गापासूनतेशिपाईपर्यंत. यादोन्हीकालावधीतवरीलपैकीकोणत्याहीकामासंबंधितव्यवसायकेल्यासउत्पन्नमार्गीलागेल. याक्षेत्रांसंबंधितएखादाव्यवसायअसेलतरयावरीलकालावधीतव्यवसायातजास्तलक्षघाला. नक्कीचतुमचाफायदाहोईलवआजपर्यंतनजमलेलेगणितजमेल. 
  2. 28 डिसेंबर ते 00 डिसेंबर या कालावधीत मंगळ ज्येष्ठा नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. 
  3. विषवएखाद्याबलाढ्यवअसाध्यरोगावरचीलसशोधणाऱ्यासंस्था,   डाँक्टर्स , सर्जन्सना आँपरेशनसाठी लागणारी उपकरणे. तुरूंग प्रमुख, तेथील कर्मचारी, केबल वायर निर्माण करणारी इंडस्ट्री. 

अशाप्रकारे या कालावधीत वर दिलेल्या विभागातील जे जे व्यवसाय किंवा नोकरी करत असाल तर नक्कीच तेथे प्रगती होणार आहे. या विभागांची सपोर्ट सिस्टीम म्हणून काम करताना जे आवश्यक आहे ते करा. त्यातून मिळणारा व्यवसाय व समाधान फार मोठे असेल. 

तरी वरील कालावधीचा वापर करा. 


 || शुभं-भवतु ||

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *