Read in
लेखांक 42 वा. नक्षत्रीय फलादेश – भाग 7
जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 या कालावधीतील प्रत्येक नक्षत्रांचा कालावधी व मिळणार्या संधीबाबतची माहिती.
वर्षाच्या बारा महिन्यातून येणारा हा कालावधी फक्त आणि फक्त त्याच कालावधीत घडणार्या घटनांसाठी जर वापरला तर आपली जी दमछाक होते ती होणार नाही. व अपेक्षित यशही मिळेल. म्हणून या वेगळ्या पद्धतीने नक्षत्रीय फलादेश द्यायचे ठरवले. जसे पावसाळ्यापूर्वीच जागरूकतेने आवश्यक त्या पूरक कामांची आपण जोडणी करतो तसेच हे पण आहे. थोडक्यात काय तर येणार्या कालावधीतील सर्व त्या संधींचा फायदा घेणे. या विचाराने हे विचार मी आपल्यासमोर मांडत आहे. प्रत्येक राशीमधे सव्वादोन नक्षत्रे येत असल्याने त्यानुसार रोज एका राशीची देण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण हे वाचावे व आपला अभिप्रायही द्यावा ही विनंती.
तूळ राशीमधे येणारी नक्षत्रे, ( चित्रा चरण 3, व 4. स्वाती चरण 1, 2, 3, 4. विशाखा चरण 1)
तूळ रास नक्षत्र चित्रा चरण 3 व 4.
18 आँक्टोबर ते 22 आँक्टोबर या कालावधीत सूर्य चिक्त्रा नक्षत्रातून भ्रमण करतो.
तुम्ही अतिशय बुद्धीमान , महत्वाकांक्षी, उत्तम तर्कशक्तीचे, स्पष्टदृष्टीकोन असलेले, व्यवहार कुशल असे आहात. स्वभावात धाडसी पणा, व त्याचबरोबर विलासी पणा आहे पण उत्तम व्यवहारज्ञान असल्याने स्वत:चे कुठेही नुकसान होऊ देथ नाही. मनाने स्वच्छ, कोणत्याही कामासाठी व कोणासाठीही मध्यस्थी करण्यास तयार असता. ललिक कलांची आवड असून त्याचबरोबर गायन, वादनाचे तीव्र आकर्षण आहे.
आँक्टोबर ते 22 आँक्टोबर या कालावधीत सूर्य चित्रा नक्षत्राच्या तिसर्या व चौथ्या नक्षत्रातून भ्रमण करतो.
या नक्षत्राच्या व्यक्ती मोठमोठ्या पदावर काम करत आहेत. शास्त्रज्ञ, स्त्री रोग तज्ञ, सर्जन या क्षेत्रात आहेत. संरक्षण क्षेत्रात, मिलीटरीत मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत. तुमच्यासाठीच व्यावसायिक क्षेत्रे पुढीलप्रमाणे आहेत. इंटिरियर डिझायनर, मंडप डेकोरेटर्स, विवाह नोंदणी केंद्र. कलाकुसरीची कामे, भरतकाम, चित्रकार व पेंटींग काम. गँरेज तसेच वाहनांच्या सुट्या भागांची विक्री.लहान मुलांचे खेळाचे साहित्य, तरूणांचे मैदानी खेळाचे साहित्य, बैठ्या खेळाचे साहित्य जसे बुद्धीबळ, ल्युडो, सागरगोटे, सापशिडी व अशा प्रकारचे साहित्य. सौंदर्यप्रसाधनांची विक्री, टेलरींगचे काम, फँशन डिझायनींग. इतकेच नाहीतर या नक्षत्रात तंबाखू तपकिरीचे सुद्धा व्यापारी आहेत. सुगंधी द्रव्ये, अत्तरे यांचेही नाँलेज असते. आर्टिफीशल दागिने बनवण्याचे काम, उदा. मोत्याचे मण्यांचे दागिने. जून्या दुर्बिणी, वेगवेगळ्या प्रकारचे कँमेरे, सुक्ष्मदर्शक यंत्रे यांचे संकलन व प्रदर्शन. ईत्यादी विषयांचे ज्ञान असल्याने यापैकी कोणकोणते आपल्याला व्यवसाय करता येईल ते पाहुया.
- 17 आँक्टोबर ते 24 आँक्टोबर या कालावधीत सूर्य चित्रा नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. या कालावधीत, तुम्ही स्वत: डाँक्टर असाल तर स्त्रीयांच्या संदर्भातील जागृती मोहिम राबवू शकता. व डाँक्टर नसाल तर या डाँक्टरांच्या टीमला पूर्ण मदत करू शकता. कँम्प लावणे, जाहिरात करणे, धर्मादाय संस्थांचीही मदत घेउ शकता. सरकारी खात्यांना संरक्षण विभागात मदत करू शकता. स्वत:ची टीम तयार करा.नागरी संरक्षण दल , होमगार्ड, यांच्या कामात सामिल ही होऊ शकता. याच मार्गातून तुम्ही तुमचे करिअर बनवू शकता.
- 11 आँक्टोबर ते 21 आँक्टोबर या कालावधीच्या कालावधीत मंगळ या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. धारदार वस्तूच्या मदतीने करावयाची जी कामे असतात ती तुम्ही करू शकता.यामध्ये आँपरेशनची पण हत्यारे येथील व अगदी सुई, खात्री, करवत, यासारखी फर्निचर बनवण्याची पण हत्यारे येथील. बेकरी प्राँडक्टसचे, केक्स यासारखे पदार्थ. इ. चा व्यवसाय करू शकता. महिलांनी दागिने बनवणे, फँशनेबल कपड्यांची विक्री करणे, सौंदर्प्रसाधना
- 31 आँक्टोबर ते 05 सप्टेंबर या कालावधीत बुध चित्रा नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. न्यायालयाशी संबंधितानी, पोलिस प्राँसिक्युटर्सनी, तसेच या क्षेत्रातील मान्यवरांनी जूने पडून राहिलेले दाव्याच्या बाबतीत कांही करता आले तर पहावे तुम्हाला नक्कीच यश येणार आहे. पोस्टाच्या स्माँलसेव्हींग, मुदतीचे डिपाँझिट याचेही काम तुम्हाला उत्पन्न देणार आहे तरी याचा प्रसार करण्याचे ठरवावे. जाहिरात कंपनीबरोबर काम करावे. या कालावधीत यातील कांहीही केलेत तरी तुमचाही व्यवसाय होईल व इतरांनाही मदत होईल.
चित्रा नक्षत्र हे मुळातच प्रेरणादायी व महत्वाकांक्षी नक्षत्र आहे. त्यात तर ते लक्ष्मीदायक आहे त्यामुळे या कालावधीत वरीलपैकी जे जे उद्योग कराल त्यात तुम्ही पण सेटल व्हाल.
कांही वेगळे करायचे असल्यास शिका, शिकवा व कमवा ही त्रिसुत्री वापरा. तुम्ही चांगले अर्थार्जन करू शकाल.
रास तूळ नक्षत्र स्वाती चरण 1, 2, 3, 4.
23 आँक्टोबर ते 06 नोव्हेंबर या कालावधीत सूर्य स्वाती या नक्षत्रातून भ्रमण करतो.
अप्रतिम बुद्धीमत्ता, व्यवहार कुशलता, दूरदृष्टीने विचार करणे, उत्तम स्मरणशक्ती हे गुण आहेत. वृत्तीने आत्मसंयमी, परोपकारी, भावनाप्रधान, संवेदनशील व अतिशय प्रामाणिक आहे. ज्योतिष, भविष्य सांगण्याची कला, अन्यायाचा राग असणारे आहे. यांना कोणत्याही प्रकारची उलाढाल करण्याचे सामर्थ्य व कोणताही व्यवसाय करण्याचे धाडस व हिम्मत पण आहे. स्वाती नक्षत्राच्या चारही चरणांचे अनेक उद्योग यशस्वीपणे करता येतात.
06 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत बुध स्वाती नक्षत्रातून भ्रमण करणार आहे.
- वरील कालावधीत स्वत:चे उत्पन्न निर्माण करण्याकरीता, करिअरसाठी पुढीलपैकी जे कांही करता येईल ते करा. कोणत्याही कामातील मध्यस्थ्याचे रोल, एजंट्स, जाहिरात कंपनीतील मुख्य काम, स्टेशनरी साहित्याचे पुरवठा केंद्र, स्टँम्पवेंडर, लहान मुलांचा विविध प्रकारच्या खेळण्यांची विक्री, कुरियर सर्विस, यापैकी कोणतेही काम या कालावधीत स्वत: सुरू केले किंवा त्या क्षेत्रात नोकरी केली तरी उत्पन्नाचे चांगले साधन निर्माण होईल.
- 11 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर या कालावधीत शुक्र स्वाती नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. सुंदरतेच्या जेवढ्या गोष्टींचा उद्योग करता येईल तो खरा. गायन, वादनाबरोबर अगदी नृत्याबाबत सुद्धा करू शकता. ब्युटी पार्लर, सौंदर्यप्रसाधने, उंची वासाची अत्तरे, नकली दागिने, मोत्याचे दागिने यातील कोणताही उद्योग, कलाकुसरीच्या बेडशीटस्., पिलो कव्हर्स, घर आँफीस सजावटीच्या वस्तू यापैकी ही कोणताही उद्योग सुरू करा. प्रथम ओळखीत करा बघा खूपच चांगला चालणार आहे.
- 31 आँक्टोबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीत मंगळ स्वाती नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. जमिनींचे व्यवहार, .. शेतीचे व्यवहार यामधील मध्यस्थीचे काम, इलेक्ट्राँनिक्सच्या वस्तूंचे विक्रेते, लाईटींगचे साहित्य, विजेवर चालणार्या वस्तूंचे दुकान, पेट्रोल पंपावर काम करणारे यापैकी कोणतेही केलेले काम व्यवसायात रूपांतरीत करता येईल. लहानशी खानावळ, हाँटेल चहा नाश्त्याचा स्टाँल सुरू करता येईल. वरील कालावधीत विजेवर चालणार्या गोष्टी व अग्नी वर चालणार्या गोष्टी यांचा व्यवसाय करावा.
- 24 आँक्टोबर ते 06 नोव्हेंबर या कालावधीत रवि स्वाती नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. होमगार्ड, सुरक्षा रक्षक नागरी सुरक्षा दल या क्षेत्रातही काम करता येणार आहे. कोणताही खाद्यपदार्थांचा व्यवसाय करायला हरकत नाही.
स्वाती नक्षत्र हे देवगणी नक्षत्र आहे. विवाह, मुंज, बारसे यासाठीअतिशय चांगले नक्षत्र आहे. नवीन दागिने घालणे, नवीन वस्त्राची घडी मोडणे यासाठी लाभदायक आहे. नवीन दुकानाची सुरूवात करणे, औषध घेण्यास सुरूवात करणे. एवढेच नव्हे तर विहीर खोदणे, सुगंधी झाडे लावणे यासाठी शुभ आहे.
अशा प्रकारे नवीन व्यवसायास सुरूवात करण्यासाठी तुमच्या आवडीचा व आवाक्यात येणारा वरील सर्व बाबींचा विचार करा.
रास तूळ नक्षत्र विशाखा चरण 1, 2, 3.
07 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर या कालावधीत सूर्य विशाखा नक्षत्रात भ्रमण करणार आहे.
अप्रतिम बुद्धीमत्ता आहे. वृत्ती उच्च ध्येयवादी व महत्वाकांक्षी असून सतत ज्ञान मिळवण्याची लालसा आहे. शिकणे व शिकवणे हे दोन महत्वाचे गुण तुमच्याकडे आहेत. तुम्ही स्वतंत्र विचारांचे असूनही विचार समतोल आहेत. वृत्ती सात्विक व समतोल असून व्यक्तिमत्व आकर्षक आहे.
- 23 सप्टेंबर ते 02 आँक्टोबर या कालावधीत शुक्र विशाखा नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. तुमचे लक्ष व लक्ष्य उच्च कोटीची बुद्धीमत्तेची कडे असूनही शुक्र महाराज मात्र तुम्हाला बुद्धीमत्तेचा क्षेत्रातून चैनी व विलासी वृत्ती कडे वळवणार आहेत. ब्युटी पार्लर, सौंदर्यप्रसाधनाच्या विक्रीचे व्यवसाय करावे काय इकडे लक्ष राहील. तुमचे मोठमोठे क्लासेस, स्पर्धा परिक्षा क्लासेस, सिव्हील सर्विस चे मार्गदर्शन केंद्र असलेले एकदम चंगळवादाचा विचार करतील. नव्याने हाँटेल, खाण्याच्या पदार्थांचे किंवा इतरही उद्योग करावेसे वाटतील पण या कालावधीत नव्याने कोणताच उद्योग करू नका. हा कालावधी जसा आहे तसाच जाऊदे.
- 06 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर या कालावधीत रवि विशाखा नक्षत्रातून भ्रमण करणार आहेत व 14 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर या कालावधीत बुध विशाखा नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. गुरूच्या नक्षत्रातून रवि व बुधाचे भ्रमण म्हणजे हा त्रिवेणी संगम म्हणूया. रविच्या अधिपत्याखाली येणार्या सर्व व्यवसायाचा विचार करा.
-
- रवि :—जसे सरकारी योजनांचा लाभ, वडिलोपार्जित आलेला उद्याोग व त्याची वृद्धी, संवत:च्या हिमतीवर करत असलेले कार्य, शासकिय संस्थांवर असलेले अधिकार, शासकिय संस्थेबरोबर जोडधंदा. दवाखाना, हाँस्पिटल संबंधी असलेला व्यवसाय किंवा नोकरी , औषधाचे दुकान किंवा औषधा मालाची एजन्सी. खाद्यपदार्थांचा व्यवसाय, खानावळ, हाँटेल, कँन्टीन इ.
- बुध :— वृत्तपत्र बातमीदार, एखाद्या पुस्तकाचे प्रकाशन. शिक्षक, प्रोफेसर. अनेक भाषांचे ज्ञान असल्याने दुभाषीचे काम. जनसंपर्क खाते व जाहिरात संस्था येथील जबाबदारी. सल्लागार केंद्राचे प्रमुख. पोस्त व तार खात्याबरोबरील व्यवहार. कुरियर, कम्युनिकेशन संस्था. टायपिस्ट, स्टेनोग्राफर, मँनेजर.
- गुरू :—शैक्षणिक क्षेत्रातील कार्य, शाळा, काँलेज मधील शिक्षक, क्लार्क व पदाधिकारी. न्यालयासंबंधातील नोकरी व व्यवसाय. वकिल, न्यायाधिश, साँलिसीटर. डाँक्टर, दवाखाने, हाँस्पिटल अस. बालसंगोपन केंद्र, आंतरराष्ट्रीय प्रवासी संस्था. प्रशासकीय अधिकारी.
वरील तीनही ग्रहांचा सहसंबंध येत असल्याने 06 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर या कालावधीत कोणत्याही प्रकारचा व्यवसाय उद्योग करा व स्वत:चे व इतरांचेही भले करा.
3. 20 नोव्हेंबर ते 05 डिसेंबर या कालावधीत मंगळ विशाखा नक्षत्रातून भ्रमण करणार आहे.
जमिनीच्या, घराच्या, शेताच्या घराच्या व्यवहारातील मध्यस्थी. कोणत्याही हत्याराने करावयाचे काम, यंत्रावर करावयाचे काम, भट्ट्या, बाँयलर, वाफेची इंजिने येथील काम. औषधाचे दुकान, आँपरेशन थिएटर मधे लागणारे साहित्य.
सुरक्षारक्षक, होमगार्ड, पोलिस, मिलिटरी. मसाल्याचे पदार्थ, बेकरी पदार्थ. लोखंडी फर्निचरचे कारखाने,लोखंड व्यापार, स्टेनलेस स्टील चा व्यवसाय. वीज निर्मिती केंद्र,
वरीलपैकी कोणत्याही कामासंबंधीचा उद्योग कसा करता येईल त्याचा विचार करा. या कालावधीत सुरू केलेले कार्य नक्कीच वाढणार आहे.
|| शुभं-भवतु ||