जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 या कालावधीतील प्रत्येक नक्षत्रांचा कालावधी व मिळणार्‍या संधीबाबतची माहिती. #6

Read in
लेखांक 41 वा. नक्षत्रीय फलादेश – भाग​ 6
जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 या कालावधीतील प्रत्येक नक्षत्रांचा कालावधी व मिळणार्‍या संधीबाबतची माहिती.

वर्षाच्या बारा महिन्यातून येणारा हा कालावधी फक्त आणि फक्त त्याच कालावधीत घडणार्‍या घटनांसाठी जर वापरला तर आपली जी दमछाक होते ती होणार नाही. व अपेक्षित यशही मिळेल. म्हणून या वेगळ्या पद्धतीने नक्षत्रीय फलादेश द्यायचे ठरवले. जसे पावसाळ्यापूर्वीच जागरूकतेने आवश्यक त्या पूरक कामांची आपण जोडणी करतो तसेच हे पण आहे. थोडक्यात काय तर येणार्‍या  कालावधीतील सर्व त्या संधींचा फायदा घेणे. या विचाराने हे विचार मी आपल्यासमोर मांडत आहे. प्रत्येक राशीमधे सव्वादोन नक्षत्रे येत असल्याने त्यानुसार रोज एका राशीची देण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण हे वाचावे व आपला अभिप्रायही द्यावा ही विनंती.

कन्या राशीमधे येणारी नक्षत्रे. ( उत्तरा फाल्गुनी चरण 2, 3, 4. हस्त चरण 1, 2, 3, 4. चित्रा चरण चरण 1, 2 .)
कन्या रास  नक्षत्र उत्तरा फाल्गुनी चरण 2, 3, 4.

16  सप्टेंबर ते 26  सप्टेंबर या कालावधीत सूर्य उत्तरा फाल्गुनी या नक्षत्रातून भ्रमण करतो.

तुम्ही अतिशय बुद्धीमान व विद्वान असून तु ची बुद्धी पण अतिशय कुशाग्र आहे. तुमची स्मरणशक्ती उत्तम, तर्क ख्ती उत्तम असून अचूक  निर्णय घेण्याची क्षमता जबरदस्त आहे. वृत्ती व्यापारी असून सतत उद्योगात राहण्याची आवड आहे.

  1. 13 सप्टेंबर ते 16  सप्टेंबर या कालावधीत सूर्य या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे.
  2. 26 आँगस्ट ते 02 सप्टेंबर या कालावधीत बुध या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. वर्तमानपत्राचे बातमीदार, संपादक यांनी पत्रकारितेवर आँन लाईन शिबिर घ्यावे. वन टू वन ज्यांना शक्य असेल त्यांनी तसेही करायला हरकत नाही. पोस्ट खाते, टेलिफोन खाते याबाबतही असाच विचार करावा. लेखक, साहित्यिक यांनी तरूण पिढीला साहित्याची आवड निर्माण होण्यासाठी तसेच त्याना लेखन करण्यास उद्ध्युक्त करण्यासाठी शाँर्ट सेमिनार्स घ्यावीत. शाळकरी मुलांना हस्ताक्षर, कँलिग्राफीचे शिक्षण द्यावे  यातूनच तुमच्यासाठी तुमचा स्वत:चा व्यवसाय सुरू होणार आहे.
  3. 06  सप्टेंबर ते 09 सप्टेंबर या कालावधीत मंगळ या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. क्लेरिकल वर्क, अँडमिनीस्ट्रेशन, ह्युमन रिसोर्सेस, या क्षेत्रातील कामाची माहिती देणारी शिबीर घ्यावीत. शेअर मार्केट ट्रेडिंग चे वर्ग आँन लाईन घेऊन तरूणांना उद्योगाकडे वळवावे व स्वत:चा पण व्यवसाय यातूनच निर्माण करावा.
  4. 11 आँगस्ट ते 18 आँगस्ट या कालावधीत शुक्र या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. खगोलशास्त्र, खगोलमंडळाचे निरिक्षण,  ज्योतिषी, कथा लेखक यांनी ज्यांना आवड आहे त्यांचा ग्रुप करून त्यांना ट्रेनिंग द्यावे. त्यांच्यातील साहित्यिक जागा करावा व त्याच्याकडून साहित्य लेखन करून घ्यावे. विषयवार साहित्याची मांडणी करणे, मुद्धे काढणे असे बेसिक पासून वर्ग घ्यावेत.

अशाप्रकारे उत्तरा फाल्गुनी नक्षत्राच्या मंडळीना वरील प्रत्येक कालावधीत आपले स्वत:चे उद्योग सुरू करता येतील. व नवनवीन विचारांची दिशा देउन साहित्यिक तयार करता येतील.


कन्या रास नक्षत्र हस्त चरण 1 ते 4

27 सप्टेंबर ते 10 आँक्टोबर या कालावधीत सूर्य या नक्षत्रातून भ्रमण करतो.

तुम्ही अतिशय बुद्धीमान असून स्वकर्तृत्वाने पुढे येणारे आहात. व्यवहारव्यापारामधे कुशल असून सात्विक विचाराचे आहे. स्वभावात नम्रपणा, उदारता, असून वृत्ती परोपकारी , क्षमाशील व समाधानी आहे. तुम्ही संगीत, गायन, चित्रकला, शिल्पकला, कलाकुसर, नाट्यलेखन याचे चांगले जाणकार आहात. एक्स्पोर्ट इंम्पोर्ट, शिपींग क्लीअरींग एजंट, लिपीक, हिशोब ठेवणारे व तपासनीस  याच प्रवीण आहात. किरकोळ व्यापाराचे ज्ञान असून तुम्हाला फिरते एजंटची चांगली माहिती आहे.

  1. 19 आँगस्ट ते 31 आँगस्ट या कालावधीत शुक्र या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. या कालावधीत चित्रकार, कलाकार  संगीत,  याविषयीचे वर्ग सुरू करू शकता. लेखन, नाट्यलेखन, पत्रकारिता, बातमीदार यांच्याबाबत बेसिक वर्ग सुरू करून पुढे त्यालाच व्यावसायिक रूप देऊ शकता. एक्स्पोर्ट इंपोर्टचे ज्ञान असल्याने तेही शिकवू शकता. कोणतीही वस्तू सुरवातीला कशी विका ी याचे परफेक्ट ज्ञान तुम्हाला असल्याने तुम्हीच प्रथम या कलागुणांचा व्यवसाय सुरू करू शकता.
  2. 2  सप्टेंबर ते 9 षप्टेंबर या कालावधीत बुध या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. काँमर्स क्षेत्रातील तुमचे कोणतेही नाँलेज तुम्ही एनकँश करू शकता. शाळा काँलेजची स्टेशनरीची विक्री, काँम्प्युटरची स्टेशनरी, व कोणतीही पुस्तके यांचा व्यापार करू शकता. वर्तमानपत्रात काम करण्याची ज्क्षमता व इच्छा असलेल्यांसाठी असे वर्ग महत्वाचे ठरतील व तुमच्या व्यवसायाचे बस्तान बसेल.
  3. 21 सप्टेंबर ते 11 आँक्टोबर या कालावधीत मंगळ या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. डाँक्टर्सना, नर्स, मिडवाईफ, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह यांनी समाजातील अंधश्रध्दा, गैरसमजूती दूर करण्यासाठी आँन लाईन चा वापर करावा. बँक, पतसंस्था, बँकांचे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड,  पैसे काढताना येणारा ओटीपी नंबर याबाबतची भिती किंवा चुकीचे ज्ञान दूर करू. सर्वाना सहज समजेल अशा शब्दात सांगणारे  व्हिडीओ करावेत. आँन लाईन सांगावे.
  4. 27  सप्टेंबर ते 10 आँक्टोबर या कालावधीत सूर्य या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. इंजिनीअरींग, परदेशात संबंधीत, परदेशी वकिलात, या ठिकाणचे मान्यवर खूप कांही करू शकतात. या मंडळीना इतरांप्रमाणे जरी व्यवसायाची गरज नसली तरी समाजाला यांच्या ज्ञानाची गरज आहे म्हणून या मंडळीनी आँन लाईन माहिती द्यावी. बँकांची कामे नियमावली, शेअर मार्केट त्याचे नियम व काम कसे चालते. या बाबतचे जचे घेता येईल तसे कोर्सेस घ्यावेत.

अशाप्रकारे या नक्षत्राच्या भ्रमण काळाचा व्यक्तिगत पातळीवर फायदा करून घ्यावा व सामाजिक बांधिलकीतून इतरांना कळवावा.

हे नक्षत्र कोणत्याही शुभ कार्यास चांगले आहे. प्रथम वकोणत्याही विद्यारंभास अनुकूल तर आहेच पण गायन, नृत्य, वादनासही अनुकूल आहे. आहे. औषधी वृक्ष लावणे किंवा औषध घेणे. कोणत्याही वस्तुचे नवीन दुकान सुरू करणे, गृहारंभ करणे, वास्तुशांती करणे. शुभ, देवगणी व सत्वगुणी असल्याने विवाह, बारसे वा मुंजीस ही अनुकूल आहे.


रास कन्या नक्षत्र चित्रा चरण 1 व 2.

10   आँक्टोबर ते 17 आँक्टोबर या कालावधीत सूर्य चित्रा नक्षत्राच्या चरण 1 व 2  मधून  भ्रमण करतो.

अतिशय बुद्धीमान , तडफदार, तर्कशक्ती चांगली असून तेवढीच व्यवहार कुशलता ही असते. धडपड्या, नाना खटपटी करून स्वकर्तृत्वाने प्रगती करणारा वशूर धाडसी आहात. संभाषणात एकदम चतुर, स्पष्टवक्ता पण कुटुंबवत्सल आहात. वेगवेगळ्या शास्त्रांचा अभ्यास असून सौंदर्याची व कलेची आवड असलेला आहे.

  1. 31 आँगस्ट ते 05  सप्टेंबर या कालावधीत सूर्य चित्रा नक्षत्रातून भ्रमण करणार आहे.  सेल्स टँक्स, करवसुली विभाग, आयकर विभाग या क्षेत्रातील मंडळीनी शिकाऊ उमेदवारांना शिकवावे व तयार करावे. काँस्ट अकाउंटन्ट, रेव्हेन्यू खाते, कायदा, ट्रॅफिक पोलिस, या खात्यातील तज्ञांनी   शिकाऊ उमेदवारांसाठी शाँर्ट कोर्सेस सुरू करावेत. अलंकार बनवणार्यांनी  घरगुती महिलांना शिकवून तयार करावे ज्यामुळे त्या आपल्या पायावर उभ्या राहतील. चित्रकार, पेंटर्स, शिल्पकार यांनी आपले प्रदर्शन भरवावे.  वेगवेगळ्या फुलांचे डेकोरेशन,  शोभेच्या वस्तुंचे प्रदर्शन यातून चांगली विक्री होईल. गायक, वादक व नर्त मंडळीनी शाळकरी मुलांना. वा ज्यांना आवड आहे त्यांना  शिकवावे. स्वत:चे कार्यक्रम यार करावेत, व्हिडीओ करून लोकांपर्यंत पोहोचेल असे पाठवावेत.
  2. 11 आँक्टोबर ते 21 आँक्टोबर या कालावधीत मंगळ या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. गणित विषयावरील व्हिडीओ महत्वाचा राहील. ज्याना उत्पन्नाचे साधन पाहिजे आहे त्यानी कोणत्याही मालाचा पुरवठा करणे, डाँक्टर्स मंडळीना लागणार्‍या गोष्टी पुरवणे, घर बांधकाम कंत्राटदारांना पुरवठा करणे. तुमच्याकडे असलेल्या प्रामाणिकपणामुळे तुमचा व्यवसाय उत्तम चालेल. इलेक्ट्रिशियन, वायरमन यांनी कामे घ्यावीत. लेखक कवी, साहित्यिक यांनी सेमिनार्स घ्यावीत.
  3. 31 आँगस्ट ते 05 सप्टेंबर या कालावधीत शुक्र या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. कोणत्याही प्रकारच्या घराला शोभिवंत करणार्‍या वस्तू, प्लास्टीकची फुले, वेळी, फळे वस्तू, लाइटींगचे साहित्य अशा प्रकारच्या वस्तुंची व्यवसाय सहजपणे चालेल. आर्टिफीशल दागिने, मोत्याचे दागिने, सौंदर्यप्रसाधनाच्या वस्तू यांचा व्यवसाय डबल तीबल स्पीडने चालेल. तांब्या पितळेच्या  शोभेच्या वस्तू व भांडी यांनाही चांगली मागणी येईल.
  4. 28 आँक्टोबर ते 02 नोव्हेंबर या कालावधीत बुध या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. सरकारी योजनांची माहिती घेऊन त्याचा कसा फायदा घ्यावा याचे ज्ञान देणे. प्रत्येकाच्या क्षमतेनुसार व आवडीनुसार गरजवंताला योजनेची माहिती पटवून देऊन त्यांच्या व्यवसायाला मदत करणे. तुमच्या एवढ्या करण्याने एकही गरजवंत रिकामा राहणार नाही. प्रत्येकाला काम मिळेल.
  5. चित्रा नक्षत्र हे लक्ष्मीदायक आहे त्यामुळे तुम्ही जे कराल त्यातून तुम्हाला व इतरांना पण लक्ष्मी  प्राप्त होईल. या नक्षत्रावर कोणतीही कला शिकणे,  विद्यारंभ करणे, दागिने घेणे, नवनवीन वस्त्रांची खरेदी      करण्यास चांगले आहे. औषधी झाडे लावणे औषध घेणे, जागोजागी वृक्ष लावणे यासाठी हे नक्षत्र चांगले आहे. जावळ काढणे, बारसे करणे, मुंज करणे यासाठी हे नक्षत्र लाभदायक आहे.

 || शुभं-भवतु ||

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *