daily horoscope

शुक्रवार 08 जानेवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in
शुक्रवार 08 जानेवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

शुक्रवार 08 जानेवारी आज चंद्ररास तूळ 30:57 पर्यंत  व चंद्र नक्षत्र स्वाती 14:12 पर्यंत व नंतर विशाखा.

daily horoscope

. वरील राशीचा व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–काल कामाची सुरूवातच चांगली झाल्याने काम समाधानकारक पद्धतीने पूर्ण होणार आहे. कुटुंबातील वयस्कर मंडळीना आवाजाचा त्रास होईल. आज नव्याने कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करू नका.

वृषभ :–औषधी वनस्पती संबंधीच्या चर्चेतून नवीन माहिती कळेल. संशोधनात्मक काम करणार्यांना गाईडची चांगली मदत मिळेल. नोकरीतील अडचणींचा सामना करताना दमछाक होईल. कुटुंबातील वातावरण आनंदाचे राहील.

मिथुन :– :–कुटुंबात नातेवाईकांची वर्दळ राहील. लहान मुलांना समजावण्याच्या भरात तुमचा रागाचा पारा चढेल. ब्लडप्रेशरचा श्त्रास असलेल्यांनी स्वत:ला सांभाळावे. तरूणांचा वेळ आज सत्कारणी लागेल.

कर्क :– संगीताच्या मैफलीत तुम्हाला विशेष क्रेडीट मिळेल. बुद्धीच्या क्षेत्रात काम करत असलेल्यांच्या कामाचे कौतुक होईल. महत्वाच्या रखडलेल्या कामासाठी सर्व शक्ती लावल्यास  नक्की काम पुढे सरकेल.

सिंह :– सरकारी कर्मचार्‍यांना कामातील अडचणींवर तोडगा काढावा लागेल. नोकरीत सहकारी वर्गाकडून चांगले सहकार्य मिळेल व कामातून वेगळाच आनंद निर्माण होईल. विद्यार्थ्यांना स्वत:च्या हिमतीवर विश्र्वास ठेवूनच काम करावे लागेल.

कन्या :–वडीलांकडील दूरगावच्या नातेवाईकांच्या आजारपणाची बातमी कळेल व घरातील वातावरण बिघडेल. प्रथम संतती कडून विशेष समाधान देणारी बातमी कळेल. आजचा दिवस मानसिक त्रासाचा जाईल.

तूळ :– पाण्याच्या शुद्धतेची विशेष काळजी घ्यावी लागेल. एखाद्या आँन लाईन सेमिनार आठी तुमची निवड होईल. शाळा काँलेजमधील विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्कृष्ट  प्रोजेक्टबाबत बक्षिस जाहीर केले जाईल.

वृश्र्चिक :– कौटुंबिक चर्चेत मित्रमंडळीना सहभागी करू नका चर्चा बिघडेल. नोकरीच्या ठिकाणी नव्या दमाने काम कराल. व्यवसायातील  जूनी येणी वसूल करण्याकरीता तगादा लावावा लागेल.

धनु :–विवाहेच्छू मुलीं स्वत:च्या अपेक्षा काय आहेत याबाबत गोंधळतील. व्यवसायातील नवीन फंडस् उभे करण्यासाठी नातेवाईकांची मदत मिळेल. परदेशी असलेल्या मुलींना घरी येण्याचे वेध लागतील.

मकर :– नोकरीतील कामात झालेल्या लहान लहान चुकांबद्दल स्पष्टीकरण द्यावे लागेल. पुरूष मंडळीना जून्या मित्रमैत्रिणींची भेट महागात पडेल. लहान मुलांच्या वागण्याला वळण लावावे लागेल.

कुंभ :– प्रवासात मानसिक त्रासाचा प्रसंग येणार आहे तरी खचून जाऊ नका. घरातील नात्यात महत्वाच्या विषयावरील चर्चा सामोपचाराने व आनंदाने संपेल. व्यावहारिक बोलण्यामुळे कार्यभाग बिघडणार नाही.

मीन :– महत्व व गरज नसलेल्या कोणत्याही अगांतुक  प्रश्र्नांचा विचार करू नका. महिलांना आज कुटुंबातील महत्वाचा प्रश्र्न सोडवावा लागेल. वाहन चालवताना मनातील विचारांना थारा देऊ नका.

|| शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *