Read in
गुरूवार 07 जानेवारी. 2021 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
गुरूवार 07 जानेवारी चंद्ररास तूळ दिवसरात्र, व चंद्रनक्षत्र चित्रा 15:45 पर्यंत नंतर स्वाती.
वरील राशीचा व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–मनातील प्रश्र्नांचे प्रतिबिंब तुमच्या कामावर पडेल. कनवीन वस्तू, कपडे विकत घेण्याचे विचार मनात येतील. विद्यार्थ्यांनी इतरांच्या विश्र्वासावर कोणताही निर्णय घेऊ नये स्वत:च्या क्षमताांचा विचार करावा.
वृषभ :–आजचा दिवस नवीन संकल्प करण्याचा आहे. फार दिवसापासून मनात लपलेली गोष्ट बाहेर काढाल. शेजारधर्म पाळावा लागेल. नोकरीत जून्या पुराण्या गोष्टी पुन: पुन: चर्चेला घेतल्या जातील.
मिथुन:–लहान मुलांना अचानक तापाचा त्रास होईल लक्ष द्या. नोकरीत सहकार्याबरोबर झालेला वाद वाढवू नये. नवीन जागेच्या शोधात असाल तर जागेचा प्रश्र्न सुटेल. व्यवसायात अचानक राजकारणाचा वास येईल.
कर्क :–आई व मुलांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवतील. त्याचा फार वेळ परिणाम ठेवू नका. शिक्षक, प्रोफेसर मंडळीना अचानक नियोजन बदलावे लागेल. नव्याने आणलेली वस्तू उपयोगी नसल्याचे जाणवेल. तरूणांचे आर्थिक गणिते बिघडतील.
सिंह :– निवडणूक लढवण्याची स्वप्ने पडू लागतील. आँफीसमधे केलेल्या कामाचे खूपच कौतुक होईल. विवाहेच्छू तरूणांना विवाहाचे वेध लागतील. नवीन घराच्या शोधात असाल तर जागेचा प्रश्र्न सुटायला वेळ लागणार आहे, घाई करू नका.
कन्या :–मुलांबरोबरच साधा संवादही वादाकडे जाईल. कलाकार मंडळीनी आपली कलेसाठी मिडीयाचा वापर करावा. नवीन घराचे रजिस्ट्रेशन लवकर करून टाका. वेळ घालवल्या अडचणी निर्माण होतील.
तूळ :–बर्याच दिवसापासून मनातील अपुर्ण गोष्ट पूर्ण करण्याकडे लक्ष द्याल. संधीवाताचा त्रास नसूनही पाय व पाठ दुखीचा त्रास होईल. गुढशास्त्रांच्या अभ्यासाला गुरूची भेट होईल. लहान मुलांना मारू नका शांततेने घ्या.
वृश्र्चिक :– सुग्रास भोजनाचा आस्वाद घ्याल. पूर्वी घेतलेला निर्णय अचानक घेतल्याने त्यावेळचे झालेले नुकसान अजूनही भरून निघणार नाही. घाई करू नका. मुलांच्या बोलण्यावर अविश्र्वास दाखवू नका.
धनु :–कष्टाचे फळ चांगले मिळते हे पटेल. मित्र मैत्रिणींच्या वागण्याचा त्रास होईल. स्वत:ला पाहिजे असलेली वस्तू नाईलाजाने दुसर्यांना द्यावी लागेल. कामाच्या घाईगर्दीत महत्वाचे काम विसराल.
मकर :– व्यवसायातील भांडवलाबाबत मोठी चर्चा करावी लागेल. बँकेच्या ओव्हरड्राफ्टची गरज लागेल. गायकांना गाण्याच्या नवीन क्षेत्राची माहिती कळेल. वयस्कर मंडळीना मनासारखे झाल्यामुळे आनंदाच्या उकळ्या फुटतील.
कुंभ :- आज तब्बेतीची कोणतीही तक्रार निघाली तरी दुर्लक्ष करू नका. योगासनांच्या सरावाने पाठदुखीमधे फरक पडल्याचे जाणवेल. कुटुंबातील ज्येष्ठांनी दिलेला सल्ला शिरसांवद्य माना. आज गुंतवणुक करू नका.
मीन :– झोप न लागल्यामुळे त्रास होईल.नोकरी, व्यवसायात प्रत्येकाच्या कामाकडे लक्ष देणे महत्वाचे राहील. राजकीयदृष्टय़ा आज तुमच्या प्रतिस्पर्ध्याला आपण चुकत आहोत याची जाणीव होईल. पण तुम्ही कांहीही बोलू नका.
|| शुभं-भवतु ||