daily horoscope

बुधवार 06 जानेवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in
बुधवार 06 जानेवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

बुधवार 6 जानेवारी आज चंद्ररास कन्या 28:28  पर्यंत व नंतर तूळ. चंद्रनक्षत्र हस्त 17:09 पर्यंत. व नंतर चित्रा.

daily horoscope

मार्गशीर्ष कृष्णपक्षातील कालाष्टमी.  वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–अपत्यप्राप्तीच्या प्रतिक्षेतील जोडप्यांना गोड बातमी षकळणार आहे. गावाकडील शेत जमिनीविषयी वाटणी बाबतचा प्रश्र्न तुमच्या मध्यस्थीने एकोप्याने सुटेल. राजकारणातील मंडळीना कायदेशीर नियमाचा त्रास होईल.

वृषभ :–वयस्कर मंडळीनी आपले अंदाज सत्य मानून चालू नये.  कपोलकल्पित गोष्टींवर विश्र्वास ठेवू नका. आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांनी कोणत्याही नियमाचे उल्लंघन होऊ देऊ नये. फार अवघड परिस्थिती निर्माण होईल.

मिथुन :–भावंडांमध्ये  काहीतरी कारणावरून वाद निर्माण होईल. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमता ओळखून यशासाठी अभ्यासात प्रगती करावी. आवश्यक असेल तेथे मार्गदर्शन घ्यावे खोट्या विश्र्वासाात राहू नये.

कर्क :– सरकारी अधिकारी वर्गाला मोठ्या दिव्यातून जावे लागेल. मनातील प्रश्र्न तसेच ठेवू नका. त्यांचा उलगडा होऊ द्या. आईवडिलांकरीता मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करावी लागेल.

सिंह :–मित्रमैत्रिणींबरोबर अभ्यासाचे नियोजन कराल. ज्यांची इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे त्यांनी आपल्या क्लायंटसना विश्वासात घेऊन योजना समजावून सांगाव्यात. वयस्कर मंडळींना आपल्या जिवनातील जुन्या गोष्टी आठवतील.

 कन्या :–नोकरीत रेंगाळलेली, दुर्लक्षित झालेली कामे तातडीने करावी लागतील. वरिष्ठांबरोबरचे वाद निर्माण होऊन खटाखटी होईल. लहान वयाच्या मुलांना ऊंची रून पडण्याची भिती आहे.

तूळ :–अतिवादाचा परिणाम चांगला होणार नाहीत विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाबाबत वस्तुस्थिती समजून घ्यावी व मार्ग काढावा. सर्वांना रोजच्या प्रमाणे कुटुंबातील ज्येष्ठांची आठवण येईल.

वृश्र्चिक :–स्वत:बरोबर शेजारच्यांना पण आर्थिक नुकसानीत ओढू नका. पैसे गुंतवताना तज्ञांचा सल्ला आवश्यक. काही वेळेस मनाविरुद्ध निर्णय स्विकारावे लागतात हे लक्षांत घ्या. महिलांनी अती काटकसरीच्या विचार करू नये.

धनु :–मनावरील संयम वाढवावा लागेल. इतरांमुळे मानसिक त्रास होईल.  विद्यार्थ्यांना  आता कोणतीही अडचण उरणार नाही. वृद्धाश्रमाला तुमच्याकडून मोठे सहकार्य मिळेल. वाहन विक्रीचा विचार असल्यास घाईने व्यवहार करू नका.

मकर :–वयस्कर मंडळी औषध घेताना गडबड करतील. तरी तरूणांनी लक्ष घालावे. पाठदुखीच्या धुण्याचे खरे कारण कळेल. गर्भवती महिलांनी आज आरामच करावा हेच चांगले. शंकराच्या उपासकांनी नियम तोडू नये.

कुंभ :–मनातील संशयात वाढ होऊन परिस्थिती बिघडत जाईल. वयस्करांसांठी मानसोपचार तज्ञांचे सहकार्य घ्या. आजोळकडील नात्यातील दुखद प्रसंगासाठी तातडीने जावे लागेल. लहान विद्यार्थ्याचा मानसिक गोंधळ होईल.

मीन :–व्यवसायाच्या ठिकाणी तुमचे मत चालणार नाही डावलले जाईल.  मित्रमंडळींबरोबर आजचा दिवस खूप श्पेशल राहील.  बाल कलाकारांना सिनेमात काम करण्याची चांगली संधी मिळेल. बुद्धीच्या जोरावर वाद घालण्याची इच्छा निर्माण होईल.

|| शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *