Read in
लेखांक 40 वा. नक्षत्रीय फलादेश – भाग 5
जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 या कालावधीतील प्रत्येक नक्षत्रांचा कालावधी व मिळणार्या संधीबाबतची माहिती.
वर्षाच्या बारा महिन्यातून येणारा हा कालावधी फक्त आणि फक्त त्याच कालावधीत घडणार्या घटनांसाठी जर वापरला तर आपली जी दमछाक होते ती होणार नाही. व अपेक्षित यशही मिळेल. म्हणून या वेगळ्या पद्धतीने नक्षत्रीय फलादेश द्यायचे ठरवले. जसे पावसाळ्यापूर्वीच जागरूकतेने आवश्यक त्या पूरक कामांची आपण जोडणी करतो तसेच हे पण आहे. थोडक्यात काय तर येणार्या कालावधीतील सर्व त्या संधींचा फायदा घेणे. या विचाराने हे विचार मी आपल्यासमोर मांडत आहे. प्रत्येक राशीमधे सव्वादोन नक्षत्रे येत असल्याने त्यानुसार रोज एका राशीची देण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण हे वाचावे व आपला अभिप्रायही द्यावा ही विनंती.
सिंह राशीमधे येणारी नक्षत्रे ( मघा चरण 1, 2, 3, 4. पूर्वा फाल्गुनी चरण 1, 2, 3, 4. उत्तराफाल्गुनी चरण 1)
सिंह रास नक्षत्र मघा चरण 1 ते 4.
17 आँगस्ट ते 30 आँगस्ट या कालावधीत सूर्य मघा नक्षत्रातून भ्रमण करतो.
तुम्ही अतिशय स्पष्टवक्ते असून, महत्वाकांक्षी, शिस्तप्रिय, बोलण्यात वागण्यात एकदम ऐटबाज, साहसी व धीट आहात. स्वभावात निर्भयता व करारीपणा असल्याने स्वपराक्रमावर उच्चपदाला जाणारे नक्षत्र आहे. कार्यकुशलता हा महत्वाचा गुण असून अतिशय उत्साही आहे तसेच खाण्यापिण्याचीही तितकीच आवड आहे.
- 17 जुलै ते 28 जुलै या कालावधीत शुक्र मघा नक्षत्रातून भ्रमण करत आहे. या कालावधीत चित्रकार, कमर्शियल आर्टिस्ट, कलाकुसरीचे काम याबाबतचे क्लासेस चालवता येथील. नसतील तर नव्याने सुरू करावेत. आँन लाईन वर्ग सुरू करावेत तसेच शक्य असल्यास प्रदर्शनही भरवावे. महिलांनी घर सुशोभित करण्याच्या वस्तूंचे ओळखी ओळखीतून उद्योग करावा. घरगुती महिलांनी जिद्धीने केल्यास नक्कीच त्यांचा चांगला जम बसणार आहे. कलात्मक वस्तूंना चांगली मागणी येईल. नकली दागिन्यांची विक्री जोरात चालेल.
- 20 जुलै ते 10 जुलै या कालावधीत मंगळ मघा नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. या कालावधीत मसाल्याचे पदार्थ, पेट्रोलियम पदार्थ व आयुर्वेदीक शाखेतील भस्मे यांच्या विक्रीचा विचार करावा. औषधांसाठी आयुर्वेदीक डाँक्टरांबरोबर संपर्क करा. व बाकीच्या बाबतीत प्रत्यक्ष भेटून माहिती द्या किंवा आँन लाईन चा वापर करा.
- 9 आँगस्ट ते 16 आँगस्ट या कालावधीत बुध मघा नक्षत्रातून भ्रमण करतो करणार आहे. या कालावधीत पोस्टाच्या योजनांबाबत माहिती घेऊन त्याचे काम करावे व मेंबर्स वाढवावे स्टेशनरीचा व्यवसाय लहान मुलांची खेळणी हा पण व्यवसाय करू शकता. वेगवेगळ्या भाषांवर प्रभुत्व असलेल्यांनी जिथे आवश्यक असेल तिथे दुभाषीचे काम करावे. यातून करिअरची पण सुरूवात होऊ शकणार आहे.
अशा प्रकारे सध्याच्या कोरोनाच्या काळाचा बाऊ न करता फक्त पुरूषच नाही तर संसारी महिला पण लहान लहान उद्योगाची सुरूवात करू शकता व त्यातूनच व्यवसायही मिळणार आहे.
मला कसे जमणार हा विचार सोडून द्या व मनात जिद्ध केलीत तर तुम्ही करून दाखवणार आहात हे लक्षात घ्या.
सिंह रास नक्षत्र पूर्वाफाल्गुनी चरण 1, 2, 3, 4.
31 आँगस्ट ते 12 सप्टेंबर या कालावधीत सूर्य मघा नक्षत्रातून भ्रमण करतो.
तुम्ही अतिशय बुद्धीमान, धूर्त व महापराक्रमी आहात. कलासक्त असून बर्याच कलांचे जाणकार आहात. उदाहरणार्थ नाटक, काव्य, चित्रकला, पेंटींग, गायन, वादन, नृत्य. नुसते कलाकारच काय तर तुमच्या कडे मैदानी खेळाचे गुणधर्मही आहेत. जसे बँडमिंटन, बास्केटबाँल, टेबलटेनिस, क्रिकेट इ.
- 28 जुलै ते 8 आँगस्ट या कालावधीत शुक्र पूर्वा फाल्गुनी या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. तुम्ही सर्वगुणसंपन्न आहात. तुम्हाला येत असलेल्या विद्येपैकी कोणतेही कौशल्य एनकँश करता येणार आहे. दागदागिने बनवणे, आजकाल ज्वेलरी डिझायनिंगचे काम जोरात चालते त्यामुळे हा व्यवसाय सुरू करता येईल.. शिक्षण कमी असलेल्यांनी किंवा प्रौढ महिलांनी सुद्धा फँन्सी दागीने, कपडे यांचा उद्योग करावा.सिव्हील व मेकँनिकल इंजिनीअर मंडळीना तयार उद्योगात सामावून घेतले जाणार आहे.मँटर्निटी होम मधे काम करता येणार आहे.
- 31 आँगस्ट ते 12 सप्टेंबर या कालावधीत सूर्य पूर्वा फाल्गुनी या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. सरकारी नोकरीतील अधिकार्यांनी उच्च अधिकार मिळवण्याची लालसेने कांहीही प्रयत्न करू नका. पण या कालावधीत एखादा कला क्षेत्राशी संबंधीत उद्योग सुरू करायला हरकत नाही. शिक्षक, प्रोफेसर, यांनी विषयाचे स्पेशल कोचिंग क्लासेस सुरू करावेत. फोटोग्राफी, चित्रकला, शिल्पकला यातून एखादी आर्ट गँलरी तयार करावी. जेलर, न्यायालयातील जज्ज यांना एखाद्या प्रशिक्षणाची जबाबदारी पार पाडावी लागेल.
- 16 आँगस्ट ते 24 आँगस्ट या कालावधीत बुध पूर्वा फाल्गुनी या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. स्वत:चे झेराँक्सचे काम , किंवा कुरियर सर्विस चे काम सुरू करा. स्टेशनरी साहित्य, मोठ्या मुलांचे बौद्ध खेळाचे प्रदर्शन किंवा विक्री हा उद्योग करू शकता. प्रिंटींग संबंधातील कोणतेही केलेले काम तुम्हाला यश देईल. लेडीज व जेंटस् पार्लरचे काम कसे करता येईल ते ठरवा व करा.
अशा प्रकारे पूर्वा फाल्गुनी नक्षत्राच्या व्यक्तीला हा संपूर्ण कालावधी जे कराल ते यशस्वी कराल असा आहे. पूर्वा फाल्गुनी हे नक्षत्र कांही ठराविक क्षेत्रात व्यवसायाच्या अगदी सुरूवातीपासूनच लाभदायक असते. उदाहरणार्थ विद्यारंभास, वेगवेगळ्या कला शिकण्यास, खानावळ, हाँटेल किंवा कँटरींग सुरू करण्यास, सुतिकागृह किंवा दवाखाना सुरू करण्यास, किराणा मालाचे दुकान सुरू करण्यास.
सिंह रास उत्तरा फाल्गुनी चरण 1.
तुम्ही अतिशय विद्याव्यासंगी असून उत्तम स्मरणशक्ती असलेले धाडसी व उत्साही आहात. तुमचा स्वभावात कार्यतत्परता असून तुम्ही अतिशय महत्वाकांक्षी आहात. तुमचे विचार उदात्त असून वृत्ती पण सेवाभावी व सात्विक आहे. तुमची आंतरिक शक्ती चांगली असून आत्मबलही चांगले आहे. तुम्हाला सर्वांना आनंद वाटायला आवडतो.
उत्तरा फाल्गुनी चरण पहिले या नक्षत्रातून सूर्य 13 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर या कालावधीत भ्रमण करतो.
- 08 आँगस्ट ते 11 आँगस्ट या कालावधीत शुक्र या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. या कालावधीत तुम्ही तुमचा पूर्वी सुरू असलेला व्यवसाय पुन: नव्याने सुरू करा. फुलांच्या फळांच्या व्यवसायात चांगली प्रगती होईल. महिलांनी दागिन्यांच्या विक्रीसाठी कांही नवनवीन आयडीया कराव्यात. दागिन्यांचे प्रमोशन योग्य पद्धतीने केल्यास जास्त फलदायी ठरेल. डोळ्याच्या डाँक्टर्सनी डोळ्याचे लेन्सेस, चष्म्याचे दुकान या माध्यमातून लोकांच्या शंका दूर करण्याचे प्रयत्न करा. घर सुशोभित करणार्या वस्तूंच्या विक्रीसाठी लोकांपर्यंत कसे पोहोचता येईल याचे नियोजन करा.
- 24 आँगस्ट ते 26 आँगस्ट या कालावधीत बुध उत्तरा फाल्गुनी या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. या कालावधीत सरकारी कामाचे नियम सांगण्याचे एक केंद्र उघडल्यास लोकांची सोय होईल. व तुम्हालाही हा नवीन उद्योग मिळेल. मध्यस्थांची कामे, दलाल, एजंटस् अशी सर्वच माहिती एकाच विंडोवर मिळण्याची सोय करा. आँन लाईन सेमिनार घ्या. इन्कम टँक्स सल्लागारांना पण तुमच्यात सामिल करून घ्या.
- 31 आँगस्ट ते 06 सप्टेंबर या कालावधीत मंगळ या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. कोणत्याही नोकरीत असलात तरी तुम्हाला एखादा सुखद धक्का मिळणार आहे. अगदी सुरक्षारक्षक ते पोलिस अधिकारी या पर्यंत सर्वानाच मान सन्मान मिळणार आहे. सरकारी नोकरीत असलेल्यांना तर पर्वणीच आहे. जमीनीचे, घराचे, काही कोर्ट मँटर्स असतील तर वरिष्ठ अधिकार्यांच्या मदतीने सोडवून घ्या. सरकारी अधिकार्यांनी अशा प्रकारची शिबिरे लावावीत.
- 13 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर या कालावधीत सूर्य या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. दृष्टी दोष, नेत्रविकार याविषयी पण जण जागृती करण्याचा मार्ग काढावा. सर्वांना काँमन असलेला त्रास म्हणते अँसिडीटी. तरी अँसिडीटी वर व पोटाच्या विकारांवर जनजागृती करावी. डाँक्टर्सनी हार्ट अँटँक सारख्या विषयावर सेमिनार घ्यावे व जागृती करावी.
उत्तरा फाल्गुनी या नक्षत्राला मुहूर्त शास्त्रात फार महत्व आहे. विद्याभ्यास व शांतिकर्मास चांगले आहे. कोनशिला बसवणे, घर बांधणे, छप्पर घालणे व मुख्य म्हणजे गृहप्रवेशास हे नक्षत्र चांगले आहे. औषधी झाडे लावणे, बी बियाणे पेरणे यासाठी शुभ आहे.
सध्याच्या दिवसात गेल्या ८-१० महिन्यापासून आपण कांहीच करू शकत नाही अशी परिस्थिती झालीय पण आता आपल्याला कळतय की आपण स्वत:साठी व इतरांसाठी पण खूप कांही करू शकतो. तरी चला तुम्ही तयारीला लागा.
|| शुभं-भवतु ||