Read in
लेखांक 39 वा. नक्षत्रीय फलादेश – भाग 4
जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 या कालावधीतील प्रत्येक नक्षत्रांचा कालावधी व मिळणार्या संधीबाबतची माहिती.
वर्षाच्या बारा महिन्यातून येणारा हा कालावधी फक्त आणि फक्त त्याच कालावधीत घडणार्या घटनांसाठी जर वापरला तर आपली जी दमछाक होते ती होणार नाही. व अपेक्षित यशही मिळेल. म्हणून या वेगळ्या पद्धतीने नक्षत्रीय फलादेश द्यायचे ठरवले. जसे पावसाळ्यापूर्वीच जागरूकतेने आवश्यक त्या पूरक कामांची आपण जोडणी करतो तसेच हे पण आहे. थोडक्यात काय तर येणार्या कालावधीतील सर्व त्या संधींचा फायदा घेणे. या विचाराने हे विचार मी आपल्यासमोर मांडत आहे. प्रत्येक राशीमधे सव्वादोन नक्षत्रे येत असल्याने त्यानुसार रोज एका राशीची देण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण हे वाचावे व आपला अभिप्रायही द्यावा ही विनंती.
कर्क राशीमधे येणारी नक्षत्रे ( पुनर्वसू चरण 4, पुष्य चरण 1,, 2, 3,, 4. आश्लेषा चरण 1 , 2.,3.,4.)
कर्क रास पुनर्वसु चरण 4
16 जुलै ते 19 जुलै या कालावधीत सूर्य पुनर्वसू नक्षत्राच्या चौथ्या चरणातून भ्रमण करतो.
तुम्ही अतिशय तीव्र बुद्धीमत्तेचे असून, हुशार व उत्तम स्मरणशक्तीचे आहात. तुमची तर्कशक्ती जबरदस्त असून वादविवादात एकदम तुमचे लाँजिक परफेक्ट बसते. तुमचा स्वभाव परोपकारी, दयाळू., व भावनाप्रधान आहे. तुम्ही स्वत: संवेदनशील असून एवढे भावनाप्रधान आहात की तुम्हाला प्रत्येकाबद्धल सहानुभूती वाटते प्रत्येक गरजवंताला मदत करता. तुमच्या स्वभावात मीपणा नसल्याने विनयशील आहात. तुम्हाला दानधर्म करायला आवडतो व न्यायाच्या बाबतीत तर तुम्ही अतिशय प्रामाणिक आहात.
- नोकरीच्या शोधात असलेल्यांना शिक्षकांना नवीन नोकरीची संधी मिळणार आहे. प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक यांना आपल्या आवडीप्रमाणे काम करता येईल तरी प्रयत्नही तसेच करावेत विशेषत: गणिताच्या व विज्ञानाच्या शिक्षकांनी आपले स्वत:चे कोचिंग क्लासेस सुरू करावेत. स्वत:ची परिक्षा केंद्रे तयार करावीत व विद्यार्थ्यांच्या हिताचे काम करून समाजात नवीन क्रांती घडवून आणावी. हुषार व गुणवत्ताधारक विद्यार्थी वर्ग तयार होण्यासाठीच मेहनत घेण्याची तयारी ठेवा. आत्ताचा हा कालावधी तुमच्या बौद्धीक क्षेत्रातील यशामुळे तुम्हाला फार मोठा व्यवसाय व एक वेगळेच व्यासपीठ देत आहे त्याचा लाभ घ्या. संख्याशास्त्रज्ञ , अर्थतज्ञ यांनी आपला वेगळा वर्ग तयार करा. बँकेतील प्रोबेशन पिरेडवर असलेल्या उमेदवारांना आनंददायक बातमी कळणार आहे.
- 25 जुलै ते 27 जुलै या कालावधीत बुध पुनर्वसू नक्षत्रातून भ्रमण करणार आहे.
- संगीतकार, नाटककार यांनी एखादी कार्यशाळा घ्यावी. दोनच दिवसाचा कालावधी असल्याने पुढे सुरू राहील अशा प्रकारचे काम करावे. उदाहरणार्थ महिला व बालकल्याण आईच्या योजना लोकांना समजावून देऊन त्या राबवाव्यात. द्रव पदार्थांच्या विक्रेत्यांनी आपली दुकाने सुशोभित करावीत व शीतपेयांची जागोजागी दुकाने सुरू करावीत. इतिहास संशोधक तसेच इतिहास या विषयावरील वक्त्यांनी व्याख्यानमाला सुरू करण्याचे नियोजन करून तसे जाहीर करावे.
- 22 जून ते 25 जून या कालावधीत शुक्र पुनर्वसू या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे.
- ज्याना टूर्स आणि ट्र्वल्स मध्ये काम करण्याची इच्छा आहे त्यांनी या दिवसात भरपूर प्रयत्न करावेत. त्यांना नक्कीच यश येईल. ज्याना स्वत:ला प्रवासी संस्थेत प्रवास करायचा आहे किंवा गाईडचे काम करायचे आहे त्यानी स्वत:च नियोजन करून कामाला लागावे. या कालावधीत प्रवासी संस्थेत नोकरी करता येणार आहे.
- तुमची स्वत:ची सार्वजनिक संस्था असल्यास किंवा तुम्ही तेथे पदाधिकारी असल्यास तुमच्या पुढाकाराने फार मोठे काम होईल.
- डाँक्टर, नर्स, मिडवाईफ यांना दैवी शक्तीचा अनुभव येईल. या नक्षत्राच्या नावाप्रमाणेच गलितगात्र झालेल्या, होप्स नसलेल्या पेशंटना या मंडळींकडून जिवनदान मिळेल.
- तुम्ही अतिशय सहानुभूतीपूर्वक वागणारे असल्याने दुसर्यांचे कल्याण कसे होईल याचाच विचार कराल. तुमच्या सेवाभावी वृत्तीमुळे पिडीतांना मदत मिळेल व त्यांचा उद्धार होईल. तरी तशा मदत केंद्राची उभारणी करा.
ज्यांचे दिवाळे निघाले आहे किंवा ज्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले आहे त्याच्या पुन: उभारणीसाठी हे नक्षत्र अतिशय महत्वाचे आहे.. म्हणूनच हे नक्षत्र नावाप्रमाणे पुनर्वसन करणारे आहे.
कर्क रास नक्षत्र पुष्यचरण 1, 2, 3, 4
नक्षत्र पुष्य :–20 जुलै ते 01 आँगस्ट या कालावधीत सूर्य पुष्य नक्षत्रातून भ्रमण करणार आहे.
- तुम्ही बुद्धीमान असून अतिशय कर्तबगार आहात. प्रामाणिक, न्यायाने वागणारे असून, दूरदर्शी व शांत स्वभावाचे आहात. कोणत्याही गोष्टीत त्याग करणारे, तत्त्वाने वागणारे व धार्मिक विचाराचे आहात. शिक्षणाच्या बाबतीत अग्रेसर असणारे, व अतिशय महत्वाकांक्षी आहात.
- 07 जून ते 29 जून याकालावधीत मंगळ पुष्य नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. ज्यांना व्यवसाय करावयाचा आहे , जून्या वस्तूंची आवड आहे, चांगले कलेक्शन आहे त्यांनी त्या विषयाचे प्रदर्शन भरवावे. नंतर व्यवसायाचा विचार करावा. ड्रायफ्रूट्सची प्रथम घरगुती आँर्डरस घ्याव्यात व नंतर दुकानाचा विचार करावा. हाडवैद्ध किंवा हाडाच्या डाँक्टर्सनी अपंगांच्या साधनांचा व्यवसाय करावा.
- 25 जूलै ते 27 जूलै या कालावधीत बुध पुष्य नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. पुरातन विभागाच्या अभ्यासकांनी किंवा म्युझियम मधील कर्मचार्यांनी आपला अभ्यास वाढवावा व गाईडचे काम करावे. ज्यांना लिहीण्याची कला अवगत आहे त्यांनी विविध विषयांवर लेख लिहावेत व ते प्रसिद्ध करावेत. तसेच मिडीयाचा ही वापर करावा. चप्पल, बूट, बँग्ज, पिशव्या जसे किंवा चामड्याच्या वस्तूंच्या विक्रीमुळे फायदाच फायदा होणार आहे.
- बिल्डींगच्या बांधकामाचे साहित्य जसे दगड, विटा, रेती, सिमेंट लोखंडाचा उद्धोग करता येईल.
- ज्यांना आर्थिक दृष्ट्या जे शक्य आहे त्यांनी ते ते करावे. जे उद्धोग कराल तोच पुढे व्यवसाय वाढणार आहे. वरील पैकी जो उद्धोग करता येईल तो करावा.
- शाँर्टहँड तसेच टायपिंग येत असलेल्यांना कारकुनी किंवा स्टेनोग्राफर ची नोकरी मिळणार आहे.
- 22जून ते 25 जून या कालावधीत शुक्र पुष्य नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. ज्या व्यक्ती टीव्ही, फ्रिझ, एसी, यासारख्या इलेक्ट्राँनिक्सच्या उत्पादन क्षेत्रात काम करत आहेत किंवा त्या क्षेत्रात दुकानात काम करत आहेत त्यांना डबल इन्कम होणार आहे. इन्सेनटीवह पण मिळेल. पेट्रोल पंप, गँरेज, यासारख्या ठिकाणी काम करणार्यांचे उत्पन्न अचानक वाढेल तरी त्याचा वापर कसा करायचा याचे नियोजन करा.
- सध्या कोरोना मुळे आर्थिक बाजू सर्वांचीच कमीजास्त प्रमाणात ढासळलेली आहे. या कालावधीत तुम्ही या बाबीत लक्ष घालून काम केले तर तुमचीही आर्थिक बाजू बदलेल व इतरानाही तुमच्यामुळे मदत होईल. तरी जागरूकतेने काम करा, सक्षम व्हा व अर्थार्जन करा.
कपड्याचे दुकान, दागिन्यांचे दुकान किंवा सोन्या चांदीचे दुकान सुरू करण्यास हे नक्षत्र फार महत्वाचे आहे. विद्यारंभ करणे, एखाद्या जून्या आजारावर नव्याने औषध घेणे, लहान मुलांचे किंवा फँशन म्हणून कान नाक टोचणे यासाठी हे नक्षत्र उपयुक्त आहे.
कर्क रास नक्षत्र आश्र्लेषा चरण 1, 2, 3, 4.
नक्षत्र आश्र्लेषा :–सूर्य 02 आँगस्ट ते 16 आँगस्ट पर्यंत आश्र्लेषा नक्षत्रातून भ्रमण करतो. 3 आँगस्ट ते 16 आँगस्ट या कालावधीत सूर्य आश्लेषा नक्षत्रातून भ्रमण करणार आहे.
तुम्ही बुद्धीमान, ज्ञानी आहातच पण त्याचबरोबर महापराक्रमी व कर्तृत्ववान पण आहात. तुमचे लेखन कौशल्य जबरदस्त आहे. कलाकार आहात. संगीत, साहित्य, नाटक, कला यातही प्रविण आहात. तुमची ओघवती भाषा, निरनिराळ्या भाषेवर असलेले प्रभूत्व असून, स्वभावही विनोदी व हजरजबाबी आहे.
29 जून ते 20 जुलै या कालावधीत मंगळ आश्र्लेषा नक्षत्रातून भ्रमण करणार आहे.
- जणांना आपली बुद्धी व कर्तृत्व सिद्ध करून समाजावर छाप पाडायची आहे त्यांनी निवडणुका लढवण्याची तयारी करावी. आपल्या विभागासाठी, वाँर्डसाठी जे कराल तेच तुमच्या करिअरला उपयुक्त राङील. क्षेत्रात जे करता येईल त्याचा अभ्यास करा.राजकीय क्षेत्रातील तुमची करीअर तुमची तुम्हालाच तयार करावी लागणार आहे. शाई, रंग यांच्या निर्मितीच्या कारखान्यात तुम्हाला काम मिळणार आहे. केमिकलइंजिनीअर्सनी स्वत:चा व्यवसाय करण्याकडे लक्ष द्यावे. अकाउंटन्ट, आँडीटर , गणिताचे शिक्षक व प्रोफेसर्स यांनी विद्यार्थ्यांना आपली मदतकशी होईल याकडे लक्ष द्यावे.
- 6 जुलै ते 17 जुलै या कालावधीत शुक्र आश्लेषा नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. इंटेरिअर डेकोरेट्रस, सिनेमा कलाकारांचे मेकप करणारे, माँडेलिंगचे फोटोग्राफर इत्यादीना व्यवसायाची उत्तम संधी मिळणार आहे तरी काय व कसे करायचे ते ठरवा. सुगंधी द्रव्याचे दुकान, सौंदर्यप्रसाधनांचे विक्रेते यांनी लहान स्तरावर तरी व्यवसाय सुरू करावा. कलाकुसरीच्या कामाचे शिक्षण देणारे वर्ग, सौंदर्य वस्तुंची प्रदर्शने, रंगीबेरंगी वेगवेगळ्या प्रकारचे पडदे इ. चा व्यवसाय करावा. प्रथम ओळखीतून सुरू करून मग ओपनली करावा.
- 03 आँगस्ट ते 16 आँगस्ट या कालावधीत सूर्य आश्लेषा नक्षत्रातून भ्रमण करणार आहे.
- सरकारी सत्ता हातात नसूनही सरकारी सत्तेचा वापर करण्याची खुबी तुमच्यात आहे. पण त्या खुबीने समाजाच्या उपयोगाची मोठी मोठी कामे करून घ्याल. प्रथम स्वत:चे आँफीस करा. मग समाजातील अडीअडचणींवर चर्चासत्रे घ्या. व पुढारी नसुनही पुढारीपणाने कामाची जबाबदारी स्विकारून करून दाखवा. लोक तुमचे कौतुक करणार आहेत.
- तुमची उत्तम कल्पनाशक्ती लोकांना आवडेल. ते तुमच्याच बाजुने उभे राहतील. त्यामुळे तुमच्या मनात असलेले व करण्याची क्षमता असलेले नवनवे प्रकल्प तुम्ही सुरू करणार आहात. तरी तशी माणसांची पण जमवाजमव करा. त्यांनाही तुमच्यामुळे उद्धोग मिळणार आहे.
- आजारी असलेल्यांना औषधाची सोय कराल. त्यासाठीची तयारी करण्यासाठी काँलेजच्या मुलांची मदत घ्या.
- अशा प्रकारे वरील रविच्या कालावधीत एखादे नवे प्रोजेक्ट उभे कराल.
हे नक्षत्र शुभ कार्याला चालत नाही. पण गणितासारखा अवघड विषय शिकण्यास हे नक्षत्र उत्तम आहे. शेतकरी मंडळीना विहीर खणण्यास शुभ आहे.
|| शुभं-भवतु ||