Read in
मंगळवार 5 जानेवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
मंगळवार 5 जानेवारी 2021 आज चंद्ररास कन्या दिवसरात्र व चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी 18:20 पर्यंत व नंतर हस्त.
मेष :–उद्याच्या महत्वाच्या कामाची यादी व तयारी आजच करावी लागेल. नव्याने सादर करायच्या गोष्टी पुन: पुन: तपासून बघा. कुटुंबातील ज्येष्ठांसाठी त्याच्याबरोबर दवाखान्यात जावे लागेल. वयस्कर मंडळीनी फार दगदग करू नये.
वृषभ :–कलाकार मंडळींचे मनोधैर्य उंचावणारा प्रसंग घडेल. वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना आपल्या जबाबदार्या वाटून घेता येणार आहेत. व्यवसायातील नुकसानीच्या प्रकरणावर पडदा पाडा व नव्याने कामाला लागा. लहान मुलांकडे लक्ष द्या.
मिथुन :–लहान मुलांच्या वागण्याकडे जातीने लक्ष द्यावे लागेल. वयस्कर मंडळींचा आदेश पाळावा लागेल अन्यथा कुटुंबात वाद निर्माण होतील. महिलांना कामातील अडचणींवर मात करण्यासाठी मार्गदर्शन घ्यावे लागेल.
कर्क :– नोकरीच्या ठिकाणी महत्वाची बैठक होईल व त्याची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाईल. कुटुंबप्रमुख म्हणून तुमची जबाबदारी सांभाळताना सर्वजण आणा तुम्ही आनंदी करू शकणार नाही. आजीबाईंचा रोष ओढवून घेणार आहात.
सिंह :– पाण्याच्या विषयावरील मिटींगमधे मोठे वाद निर्माण होतील. ज्येष्ठांचा सल्ला घेऊन कार्य करत रहा. सरकारी अधिकारी वर्गाला लोकांचा रोष सहन करावा लागेल. विद्यार्थ्यांनी एकाग्रतेचा सराव करावा.
कन्या :–जुळ्या मुलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. दवाखान्यातील अडचणींना डाँक्टर्सना तोंड द्यावे लागेल. समाजाच्या हिताची कामे करताना मानसिक त्रास होईल. ज्येष्ठांना पाय घसरून पडण्याचा संभव आहे.
तूळ :– राजकिय घडामोडींचा परिणाम व्यक्तीगत पातळीवर होऊ देऊ नका. हातातील पैशाचा विचार करून खरेदी करा. आनंदाच्या भरात स्वतःची गोष्ट इतरांसमोर ओपन करू नका. गुपित तसेच ठेवा.
वृश्र्चिक :–मित्रमंडळींबरोबरच्या गप्पातून मोठ्या चुकलेल्या गोष्टीवर तोडगा मिळेल. वडिलांच्या नात्यातील ज्येष्ठांच्या मानपानासाठी आर्थिक खर्चाचे नियोजन करावे लागेल. नोकरीतील पडून राहिलेली कामे पूर्ण करण्याचे प्रयत्न कराल.
धनु :– आजचा दिवस अतिशय आनंदात व उत्साहात जाणार आहे. बर्याच दिवसापासूनचे रखडलेले काम स्वत:च्या जिवावर पूर्ण कराल. कोर्टातील कामात स्वत:चे डोके चालवू नका. वकिलांचा सल्ला घ्या.
मकर :– शिक्षक मंडळीना सरकारी कामाचा बोजा वाटेल. वाहन चालवताना केलेल्या चुकांमुळे पेनल्टी भरावी लागेल. नोकरीतील दुर्लक्षित राहिलेल्या कामाचा मोठा बोलबाला होईल. जबाबदारी स्विकारून मन मोठे दाखवा.
कुंभ :– आँपरेशन झालेल्यांनी दगदग करू नये. व्यवसायातील जूने जाणते लोक भेटतील व महत्वाच्या विषयावर चर्चा होतील. राजकीय मंडळीना स्वतःची प्रतिष्ठा जपण्यासाठी जागरूक रहावे लागेल. वयस्कर मंडळीनी विशेष काळजी घ्यावी.
मीन :– गोड खाण्यावर स्वत:हून मर्यादा घाला. मधुमेहीनी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. सरकारी कामातील दंड वेळेवर भरावा लागेल. बँकेचे व्यवहार इतरांवर सोपवू नका. कुटुंबातील महत्वाच्या विषयावर चर्चा कराल.
|| शुभं-भवतु ||