Read in
लेखांक ३८ वा. नक्षत्रीय फलादेश – भाग 3
जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 या कालावधीतील प्रत्येक नक्षत्रांचा कालावधी व मिळणार्या संधीबाबतची माहिती.
वर्षाच्या बारा महिन्यातून येणारा हा कालावधी फक्त आणि फक्त त्याच कालावधीत घडणार्या घटनांसाठी जर वापरला तर आपली जी दमछाक होते ती होणार नाही. व अपेक्षित यशही मिळेल. म्हणून या वेगळ्या पद्धतीने नक्षत्रीय फलादेश द्यायचे ठरवले. जसे पावसाळ्यापूर्वीच जागरूकतेने आवश्यक त्या पूरक कामांची आपण जोडणी करतो तसेच हे पण आहे. थोडक्यात काय तर येणार्या कालावधीतील सर्व त्या संधींचा फायदा घेणे. या विचाराने हे विचार मी आपल्यासमोर मांडत आहे. प्रत्येक राशीमधे सव्वादोन नक्षत्रे येत असल्याने त्यानुसार रोज एका राशीची देण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण हे वाचावे व आपला अभिप्रायही द्यावा ही विनंती.
मिथुन राशीमधे येणारी नक्षत्रे
मिथुन रास, नक्षत्र मृगशीर्ष चरण 03 व 04.
मृगशीर्ष :– 15 जून ते 21 जून या कालावधीत सूर्य मृगशीर्ष नक्षत्रातून भ्रमण करत असतो.तुम्ही बुद्धीमान असून तुमची मानसिक ताकद चांगली आहे. तुमच्या मधील ऊत्साह वाखाणण्याजोगा असून चपळही आहात. वृत्ती चौकस असून विनोदनिर्मितीचा गुण आहे. व्यक्तिमत्व आकर्षक असून तुमच्या संभाषण चातुर्याने व हजरजबाबीपणाने सर्वच अचंबित होतात. मुख्य गुण म्हणजे तुम्ही उत्तम अध्यापक असून प्रसंगी लगेच भावनाप्रधान होता.
- सर्वप्रथम 13 एप्रिल ते 24 एप्रिल या कालावधीत मंगळ मृगशीर्ष या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. या कालावधीचा लाभ घेण्यासाठी तुम्ही काय काय करू शकता ते बघुया. नव्याने सुरू करताना आँडिटर, हिशोबनीस, बँकेतील कामे याबाबत प्रयत्न करा. प्रवासी वाहतूक संस्था, विमान , रेल्वे वाहतूक संस्था यामध्ये ज्यांना नोकरी करायची इच्छा आहे त्यांनी त्याबाबतची माहिती गोळा करणे, अभ्यास करणे याकडे लक्ष द्यावे. मिलिटरी , पोलिस खाते, टेलिफोन व तार खाते व दळणवळण खाते याबाबतही विचार करा.
- ज्यांच्याकडे समाधानकारक भांडवल आहे अशांनी सर्जरीची उपकरणे, स्टेशनरी व किरकोळ धान्याचे दुकान, इलेक्ट्रिक साहित्याचे दुकान व इलेक्ट्रिशियन चे कामही सुरू करता येईल.
- (1) 16 मे ते 26 मे (2) 7 जुलै ते 12 जुलै गोल्डन पिरेड.
- या कालावधीत बुध मृगशीर्ष नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. हा कालावधी शिक्षकांना, प्रोफेसर्सना आपले स्वत:चे कोचिंग क्लासेस सुरू करता येतील. सध्याची विद्यार्थ्यांची गरज ओळखून या क्लासचा विद्यार्थ्यांना चांगला उपयोग होईल व तुमची पण करिअर सुरू होईल. नवोदित लेखकांसाठी त्यांची लेखनशैली डेव्हलप करण्याकरीता नामांकित लेखकांकडून वा साहित्यिकांचेकडून किंवा त्यांच्या आँडिओक्लिपद्वारे प्रशिक्षण वर्ग घेउ शकता. आवाजाची कार्यशाळा आयोजित करण्याचे ठरवा बघा कसा प्रतिसाद मिळतो ते बघा.
- 28 मे ते 3 जून या कालावधीत शुक्र मृगशीर्ष नक्षत्रातून भ्रमण करणार आहे.
- सध्याच्या मिळालेल्या रिकाम्या वेळाचा सदुपयोग करायचा आहे किंवा उत्पन्नाचे साधन म्हणून विचार करायचा आहे त्यांनी कलाकुसरीची कामे, गायन वादन वा नतर्तन यापैकी कांहीही शिकायला व शिकवायला पण हरकत नाही. त्यातून तुमचा व्यवसाय उभा राहणार आहे. त्याचबरोबर पार्लर, दागिन्यांची विक्री, सुगंधी अत्तरे, पावडरी, मेकअपचे साहित्य इ. चा व्यवसाय करायला हरकत नाही. अगदी दुकान नाही टाकले तरी फोनवरून चौकशी करून याची विक्री होऊ शकते.
संपूर्ण वर्षभराचा व्यवसाय याच कालावधीत ऊभा राहणार आहे. त्यामुळे वरील सर्व बाबींचा सकारात्मक विचार करा, सुरू करा व कामाला लागा.
मिथुन रास नक्षत्र आर्द्रा चरण 1, 2, 3, 4.
सूर्य 22 जून ते 5 जुलै. या कालावधीत आर्द्रा या नक्षत्रातून भ्रमण करतो.
तुम्ही उत्तम बुद्धीमत्ता, स्मरणशक्ती, पाठांतरशक्तीचे असून आकलन शक्ती तर अतिशय चांगली आहे. धाडस व पराक्रमाच्या बाबतीत तुम्ही कायमच अग्रेसर राहता. फोटोग्राफी, ड्राँईंग, कोरीव काम, आर्किटेक्ट या विषयाच्या अभ्यासाचा व्यावसायिक उपयोग करायला हरकत नाही. तुम्हाला संशोधन कार्याची आवड व जिद्ध असल्याने तुम्हालालक्ष्मीप्राप्तीच्या जबरदस्त वारंवार संधी येणार आहेत. त्या संधींचा जर फायदा घ्यायचा असेल तर कांही वेळा तुम्हाला मोठ्या धनाढ्य व्यक्तीची मदत घ्यावी लागेल. त्यावेळी कोणताही मानअपमानाची भावना बाळगू नका.
- 24 एप्रिल ते 16 मे या कालावधीत मंगळ आर्द्रा नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. राजकीय क्षेत्रातील मंडळीना आपल्या विरोधकांना एकदम गप्प बसवता येणार आहे. तुम्हाला ज्या योजनांची अंमलबजावणी करायची आहे त्याचे नियोजन करा. विशेष करून संशोधन संस्थेत काम करणार्यांना आपले काम समाधान देत आहे हे जाणवेल. हाफकीन सारख्या किंवा वनस्पती शास्त्र संशोधन संस्थेतील संशोधकांकडून देशाच्या उपयोगाचे काम होणार आहे. रसायन शास्त्रवेत्ते, डाँक्टर , अणूशक्ती व उर्जा खात्यात खूपच जलद गतीने संशोधनाचे कार्य होणार आहे. तरी वरीलपैकी कोणत्याही ठिकाणी काम करणार्यांना कल्पनेतही नसलेले समाधान व आश्र्चर्य देणारे अनुभव येतील.
- 12 जुलै ते 20 जुलै या कालावधीत बुध मृगशीर्ष नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. लेखकांना आपले पुस्तक प्रकाशन करता येईल तरी त्याबाबतची डेड लाईन ओळखा. स्टेशनरी साहित्याचे दुकान, पुस्तकाचे दुकान, औषधाचे दुकान अशाप्रकारची सुरूवात करा. जाहिरात प्रसिद्धीचे केंद्र, त्यातील डिजीटल मार्केटींग, यासाठी लागणारी तयारी करा. ज्यांना स्वत:ला पुस्तकांची आवड आहे त्यांनी एखादे ग्रंथालय सुरू करायला हरकत नाही. संख्याशास्त्र, फिजीक्स या विषयावरचे कोचिंग क्लासेसना जबरदस्त मागणी येईल तरी या विषयांच्या तज्ञांनी क्लास सुरू करावेत.
- 22 जून ते 06 जूलै या कालावधीत रवि मृगशीर्ष या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. हा कालावधी मधे आपण मृगाचा पाऊस कधी येणार म्हणून वाट बघत असतो. पण आत्ता आपण या कालावधीत काय करावे याचा विचार करूया. औषधांचा रसायनांचा अभ्यास करणार्यांना हा कालावधी त्यांच्या करिअरला वेगळी दिशा देणारा ठरणार आहे. ज्यांना खाद्यपदार्थांचा व्यवसाय किंवा लहानशा उद्धोग करायचा आहे त्यानी त्याची सुरूवात करावी. निदान सध्या घरगुती पद्धतीने करण्याचा प्रयत्न करावा. मोठ्या हाँस्पिटलमधील डाँक्टर्सना औषधांच्या साईडईफेक्टसच्या दुष्परिणाम झालेल्या पेशंटना दुरूस्त करण्याची जबाबदारी येईल. या कालावधीत अन्नातून विषबाधा झाल्याचे प्रकरण, औषधाच्या साईड इफेक्टचे प्रकरणे हाताळावी लागतील.
- मिथुन आर्द्रा च्या व्यक्तीनी याकालावधीत प्रकृतीची काळजी घ्यावी. तसेच बाहेरचे पदार्थ खाऊ नयेत. घरातील शीळे अन्न, उघडे राहिलेले अन्न खाऊ नये. दुधाचे पदार्थ, मिठाई खूप काळजीपूर्वक खावी.
- 2021 जानेवारी ते 2021 डिसेंबर या कालावधीत राहू वृषभ राशीत असल्याने तो मिथुन राशीच्या व्यय स्थानात आहे. त्यामुळे 12 व्या स्थानाच्या कारकत्वातील बाबींविषयी विशेष काळजी घ्यावी लागेल.
- 12 व्या स्थानाची कारकत्वे :– खर्च, पीडा, आपत्ती, वैरी, दंड, कैद, रूग्णालय. हे स्थान अशुभ मानले गेले आहे तरी प्रकृतीची काळजी घ्या. आपल्याला त्रासदायक वाटणार्या व्यक्तीपासून सावध रहा. कोणाला जामिन राहणे, बेफिकीरीने वाहन चालवणे, किंवा मारामारी होण्याइतपत एखादी गोष्ट ताणणे. या गोष्टी करू नका.
मिथुन राशीतील नक्षत्र पुनर्वसू चरण 1, 2, व 3
नक्षत्र पुनर्वसू :–सूर्याचा पुनर्वसू या नक्षत्रातून भ्रमणांचा कालावधी 6 जुलै ते 16 जूलै आहे 2021.
तुम्हाला अतिशय उच्च प्रतिची बुद्धीमत्ता असून प्रतिभाही उत्तम लाभलेली आहे. वृत्ती अभ्यासू, न्यायी, परोपकारी असून, विशाल दृष्टीकोन, योग्य निर्णय कृती, प्रामाणिक व स्पष्ट विचारांची आहे. विचार वास्तववादी, समाधानी, विचारी व अभिमानी आहेत.
- 16 मे ते 02 जून पर्यंत मंगळ पुनर्वसू नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. या कालावधीत ज्यांना गणित हा विषय अवघड जातो त्यांनी स्पेशल गणिताचा क्लास लावल्यास आयुष्यात कधीच व कोणतेच गणित अवघड जाणार नाही. तज्ञांनी, प्रोफेसर्स, शिक्षक यांनी सेल्सटँक्स, इंकमटँक्स जमाखर्चाचे तंत्र शिकवणार्या युक्त्या या विषयांचे कोचिंग क्लासेस घ्यावेत. टायपिस्ट , स्टेनोग्राफर यांना कोर्टातील नोकरीचा राजीनामा द्यावासा वाटणार आहे. तसेच ज्यांची कामे कोर्टात अडकलेली आहेत त्यांना कोर्ट या विषयाचा तिटकारा आल्याने कोर्टाबाहेर तंटे, वाद मिटवण्याचा प्रयत्न करा. नक्की यशस्वी होणार आहात. विमा एजंट, अकाउंटन्ट, आँडीटर यांनीआपली कामे वाढण्यासाठी कांही युक्त्या करण्याचे ठरवावे.
- 6 जुलै ते 16 जुलै या कालावधीत रवि पुनर्वसू नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. या कालावधीचा उपयोग आश्र्चर्यकारक अनुभवामुळे चांगला लक्षात राहणार आहे. नोकरीतील ज्या अधिकार्यांचे अधिकार काढून घेतले होते /आहेत त्यांना ते अधिकार परत मिळण्याचे दिवस आहेत. शिक्षक वर्गास नवीन नोकरी मिळेल. ज्यांचा स्वतंत्र धंदा आहे त्यांना सरकारी योजनांचा लाभ घेता येणार आहे तरी योजनांचा अभ्यास करा व त्याबाबतचे प्रयत्न करा. प्रशासकीय अधिकारी, विभाग प्रमुख यांना ते करत असलेल्या कामाबद्दल त्याचा सन्मान होणार आहे. स्वत:चे हाँस्पिटलला असलेल्या डाँक्टर्सना सामाजिक पातळीवर गौरवले जाईल.
- 20 जुलै ते 25 जुलै या कालावधीतबुधाचे पुनर्वसू नक्षत्रातून भ्रमण राहणार आहे. या कालावधीत साहित्यिकांनी कार्यशाळा घ्याव्यात. लेखन, नाटक लेखन, कथा लेखन प्रकाशनाचे तंत्र यावर प्रशिक्षण द्यावे. पेपरच्या संपादकांनी पत्रकारिता, बातम्यांचा प्रकार, व त्यातील जागरूकता यांवर ही कार्यशाळा घ्याव्यात. ज्यांना नोकरी नाही पण ज्ञानी आहेत त्यांनी सामाजिक सुधारणेकडे लक्ष द्यावे. त्यांना आत्ता या कालावधीत नोकरीचा विचार सोडून देऊन व्यवसायाचा विचार करावा. किराणा दुकानदारांनी किराणा बरोबर स्टेशनरीचा दुकाने पण वाढवावी.
- कलाकार मंडळीतील गायक, वादक, चित्रकार, पेंटर यांनी आपला मोर्चा विद्यार्थ्यांकडे वळवावा. शाळांतील विद्यार्थ्यांना आँन लाईन शिक्षण द्यावे. आँन लाईन स्पर्धा घ्याव्यात.
पुनर्वसू हे नक्षत्र नावाप्रमाणे पुनर्वसन करणारे असल्याने ज्यांच्या नोकर्या गेल्या आहेत त्यांना हमखास नोकरी मिळेल. ज्यांच्या व्यवसायाचे दिवळे निघाले त्यांना परत उभे राहण्याची संधी या नक्षत्रामुळे चालून येथे. वरती दिलेल्या कालावधीत तुम्ही तुमचे कलावर्ग सुरू करा., प्रशिक्षण वर्ग सुरू करा. आजारी व्यक्तींनी नवीन औषध सुरू करताना वरील तारखा लक्षात ठेवून त्या वेळी सुरू करा. तविशेष म्हणजे तुमची एखादी वस्तू हरवली असेल तर ती पणमिळेल, सापडेल. असे हे शुभकार्याला शुभ असलेल्या नक्षत्राच्या कालावधीचा फायदा घ्या व अपेक्षित फलप्राप्ती करून घ्या.
. || शुभं-भवतु ||
***************************** * *************************************************