Read in
लेखांक ३७ वा. नक्षत्रीय फलादेश – भाग 2
जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 या कालावधीतील प्रत्येक नक्षत्रांचा कालावधी व मिळणार्या संधीबाबतची माहिती.
वर्षाच्या बारा महिन्यातून येणारा हा कालावधी फक्त आणि फक्त त्याच कालावधीत घडणार्या घटनांसाठी जर वापरला तर आपली जी दमछाक होते ती होणार नाही. व अपेक्षित यशही मिळेल. म्हणून या वेगळ्या पद्धतीने नक्षत्रीय फलादेश द्यायचे ठरवले. जसे पावसाळ्यापूर्वीच जागरूकतेने आवश्यक त्या पूरक कामांची आपण जोडणी करतो तसेच हे पण आहे. थोडक्यात काय तर येणार्या कालावधीतील सर्व त्या संधींचा फायदा घेणे. या विचाराने हे विचार मी आपल्यासमोर मांडत आहे. प्रत्येक राशीमधे सव्वादोन नक्षत्रे येत असल्याने त्यानुसार रोज एका राशीची देण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण हे वाचावे व आपला अभिप्रायही द्यावा ही विनंती.
वृषभ राशीमधे येणारी नक्षत्रे
वृषभ रास कृतिका चरण २ ३, ४.
कृतिका:–11 मे ते 24 मे या कालावधीत सूर्य कृतिका नक्षत्रातून भ्रमण करत असतो.
तुम्हा अतिशय उच्च बुद्धीमत्ता, उत्तम कार्यकुशल, तर्ककुशल व उत्तम कल्पनाशक्ती असलेली व्यक्ती आहात. तुमची वृत्ती मनमिळाऊ, परोपकारी प्रेमळ, विनयशील व अतिशय उदार अशी आहे. तुम्हाला असलेली समाजकार्यात ईल आवड तुम्हाला माणसांच्या गोतावळ्यात रमवते व त्यांचे दुख कमी होऊन त्यांना आनंद वाटला जातो. तुमच्यातील उत्साह हा वाखाणण्याजोगा असून तुमचे व्यक्तीमत्व अतिशय प्रसन्न आहे. गुणांनी युक्त असून तुमचे सरकार दरबारी चांगला धबधबा निर्माण करणारा आहे. येणार्या 2021 च्या वर्षात तुम्हाला कोणकोणत्या संधी घेता येणार आहेत ते पाहून तुम्ही वर्षभराचे नियोजन करू शकाल.
- आता सर्वप्रथम 16 फेब्रुवारी ते 11 मार्च पर्यंत सूर्य कृतिका नक्षत्रातून भ्रमण करतोय. या दिवसात आपल्याला काय काय मिळणार आहे बघा. बर्याच दिवसापासून गावी घर बांधण्याचा विचार जो रेंगाळतोय त्याचा विचार करा ज्यांनाी फार्मसी केलय व औषधाचे दुकान टाकायचे त्यांचे प्रयत्न यशस्वी होणार आहेत. दाताच्या डाँक्टर्सना आपले स्वतःचे क्लीनीक सुरू करता येणार आहे. बेकरी तसेच लहानसे नाश्त्याची केंद्र तुम्ही उभे कराल. जेथे दवाखाना आहे अशा ठिकाणची जागा निवडल्यास तुमचे केंद्र उत्तम चालणार आहे. स्टीलच्या भांड्याचे दुकान त्यात कांही भाग तांब्याच्या भांड्यांसाठी ठेवला तर तुफान चालेल.
- याच्या पाठोपाठयेणारा कालावधी आहे बुधाचा. याच रविच्या कृतिका नक्षत्रातून बुध महाराज भ्रमण करणार आहेत तो कालावधी आहे 29 एप्रिल ते 06 मे 2021.या कालावधीत तुमची बौद्धीक क्षेत्रातील कामे होणार आहेत. तुम्ही एखादे पुस्तक लिहीत असाल तर त्याचे नक्कीच तुम्ही प्रकाशन या दिवसात करणार आहात. वृत्तपत्रकार, असाल तर महत्वाच्या बातम्यांमुळे प्रसिद्ध व्हाल. शिक्षक, प्रोफेसर असाल तर राजकीय विश्लेषण किंवा एखाद्या वादविवादात तुमचा सहभाग तुम्हाला प्रसिद्धी मिळवून देईल. एखाद्या शासकीय प्रशिक्षणाच्या ठिकाणी तुहाला मानाचे स्थान मिळून संपूर्ण जबाबदारी तुमच्यावरच राहील.
- बँकेतील नोकरीसाठी प्रयत्न करा. स्टँम्पवेंडर, ठसेतज्ञ यानी या संधीचा फायदा घ्यावा. सेल्समन, किंवा लेखकांनी आपल्या विचारांचा एरिया पुस्तकाच्या वाढवावा. करवसुली क्षेत्रातील तुम्ही कमालीचे काम करून दाखवाल. ज्योतिषी, खगोलशास्त्राचा अभ्यास करणारे यांच्या बुद्धीचे अतिशय कौतुक होईल. तरी याच वेळेत एखागे संशोधनात्मक काम कसे करता येईल याचा विचार करा.
- 21 सप्टेंबर 2021 ला राहू कृतिका नक्षत्रात प्रवेश करेल या कालावधीत ज्यांना संमोहन शास्त्र तंत्र – मंत्राचा अभ्यास शिकायचा आहे त्यांना ते अवश्य जमणार आहे. तसेच ज्यांच्या नोकर्या किंवा व्यवसाय कारागृह संबंधीत आहे त्यांनी आपले आर्थिक व्यवहार फार जपून करावयाचे आहेत.
- कृतिका हे नक्षत्र विवाह, मुंज, बारसे या करीता वर्ज्य आहे. पण पुढील बाबींकरीता शुभ आहे. नोकरीत वरच्या अधिकाराची जागा स्विकारणे, शत्रूंबरोबर मुकाबला करणे, पशुप्राण्यांना ट्रेनिंग देणे. बर्याच कालावधीपासून ठरवलेले पण न होणारे आँपरेशन, सिझेरीयन करणे. विहीरी खणणे. खाणीतील माल बाहेर काढणे.
तुम्ही अतिशय धाडसी, प्रचंड काम करणारे, निग्रही व उत्तम उत्साही आहात. त्यामुळे न होणार्या कामासाठी सुद्धा पूर्ण ताकद लावून प्रयत्न करता. वरील कालावधी तर तुमच्या हक्काचा मालकीचा आहे त्या कालावधीत वरती उल्लेखलेली कामे होणारच आहेत फक्त तुम्ही ती सुरू करायची आहेत. यश होत जोडून समोर उभे असणार आहे.
वृषभ रास नक्षत्र रोहिणी चरण १ ते ४.
सूर्य 25 मे ते 06 जून या कालावधीत रोहिणी या नक्षत्रातून भ्रमण करतो.
तुम्ही स्थिर बुद्धीचे व शांत व स्थिर विचारसरणीचे आहात. स्वभावातील प्रामाणिकपणा व परोपकारी वृत्ती हेच तुमच्या यशाचे दोन बिंदु आहेत. शांत, विवेकी कधीच कोणाचाच मत्सर न करण्याची वृत्तव सालस वृत्तीने नेहमीच तुम्ही इतरांची मने जिंकत आहात. तुमच्यातील रसिकता, कलाकौशल्य , संगीताची तुमची आवड या सर्वांमुळे तुम्ही तु ची एक जागा निर्माण केली आहे. तुमची ऊंची पसंद व विलासी वृत्ती यामुळे मानसिक, शारिरीक व ऐहिक सर्वच सुख व ऐंश्र्वर्य मिळत आहे.
- सर्व प्रथम 11 मार्च ते 2 एप्रिल 2021 या कालावधीत मंगळ रोहिणी नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. हा कालावधी आपल्याला कांही महत्वाच्या सूचना देत आहे. नको तिथे केलेले धाडस त्रास देईल. स्वभावातील शांतपणावर आक्रमकपणा मात करेल तरी व्यावहारीक बोलणी करू नका. मानसिक रोग, उन्माद, विक्षिप्तपणा नैराश्य यांसारख्या भावनिक त्रासापासून सावध रहा. फ़िट्सचा विकार असलेल्यांनी तर या कालावधीत नेहमीपेक्षा जास्त काळजी घ्या. प्रवास करणे, मौजमजेसाठी फिरायला जाणे नको. चर्चेतून वाद व वादातून हाणामारी असे प्रसंग येऊ देऊ नका.
- 06 मे ते 16 मे बुध रोहिणी नत्रत्रातून भ्रमण करणार आहे. व परत त्यानंतर बुध 17 जून 28 जून या कालावधीत रोहिणी नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. हा कालावधी व्यावसायिक बोलणी करायला फारच चांगला आहे. ज्याना आपली स्वतःची खानावळ सुरू करायची आहे किंवा हाँटेल व लहानसे रेस्टाँरंट चालु करायचे आहे त्यांनी आत्तापासूनच तयारीला लागावे. ज्यांच्याकडे चांगला भक्कम पैसा आहे त्यांनी बार चा डेव्हलपमेंटचाही विचार करावा. बेकरी प्राँडक्टसचे फक्त मार्केटींग करू शकता. ज्यांना झेराँक्सचे मशिन टाकायचे आहे तसेच कुरियर सर्विस सुरू आहे त्यांनी आपल्या योजना कार्यान्वित कराव्यात. या नक्षत्राच्या नोकरीच्या शोधात असलेल्यांनी पुढील क्षेत्राकडे मोर्चा वळवावा. टेलिप्रिंटर, टेलिफोन आँपरेटर, जाहिरात संस्था, टायपिस्ट, स्टेनोग्राफर.
- 12 मे ते 23 मे या कालावधीत शुक्राचे भ्रमण रोहिणी नक्षत्रातून होणार आहे. या कालावधीत तुम्ही महिला असाल तर नक्कीच तुम्हाला चालवता येणारे व्यवसाय करता येणार आहेत. मोत्याचे दागिने, रेडीमेड कपडे, फँशनेबल ड्रेसेस, सुगंधी पदार्थ, सुवासिक साबणे यांचा व्यवसाय सुरू करा. फुला फळांच्या रसाचे सरबताचे सेंटर सुरू करा. आईस्क्रिम, काँफी, साखरेचे आवरण असलेले पदार्थ यांचा उद्धोग सुरू करा. अत्तराचा, उदबत्यांचा उद्धोग सुरू करा. विवाह जमण्याचे वधुवर सूचक केंद्र सुरू करा.
- 14 फेब्रुवारी ते २१ सप्टेंबर 2021 पर्यंत राहू रोहिणी नक्षत्रात असणार आहे. या कालावधीत कोणताही मानसिक त्रास होणार नाही याची काळजी घ्या, व झाल्यास श्री गुरूमाऊलीची, तुमची कुलस्वामी व कुलस्वामिनी यांची उपासना करा.
- रोहिणी हे नक्षत्र विवाह, मुंजी, बारसे या, साठी शुभ आहे. नवीन मौल्यवान वस्तु घेण्यास हे नक्षत्र अतिशय शुभ आहे. हे नक्षत्र स्थिर व उर्ध्वमुखी असल्याने पायाभरणी करण्यास, शिलान्यास करण्यास, घराचा वरचा मजला बांधण्यास, कळस चढवण्यास शुभ आहे. सुगंधी वस्तुंच्या व्यापारास अतिशय लाभदायक आहे.
सध्या या कोरोनाच्या काळात ठप्प झालेली अर्थव्यवस्था तुमच्या हातभाराने सुरू होण्यास नक्कीच मदत होईल. तरी नक्की विचार करा व कामाला लागा.
वृषभ राशीतील नक्षत्र मृगशीर्ष चरण १ व २
नक्षत्र मृगशीर्ष :–सूर्याचा मृगशीर्ष या नक्षत्रातून भ्रमणांचा कालावधी आहे 07 जून ते 14 जून 2021.
तुम्ही बुद्धीमान असून तुमची स्मरणशक्ती उच्च कोटीची आहे. सळशळता उत्साह व अभ्यास वृत्ती असून व्यवहारात कुशल व व्यवहारी विचारांचा जास्त पगडा आहे. लोभ व मोहाची लालसा नसल्याने संतुष्ट व समाधानी वृत्ती आहे. उत्तम नेतृत्वगुण असूनही इतरांच्या मताचा आदर करणे तसेच एखादा निर्णय घेताना विचाराने मगच निर्णय घेण्याची वृत्ती आहे. तुमचा मुख्य गुण व्यवस्थितपणा, स्वच्छता व अतिशय निटनेटकेपणा हा आहे. स्वभावात अवखळपणा, खिलाडूवृत्ती असून तुम्हाला सतत इतरांबरोबर बोलण्याची हौस आहे.
- 02 एप्रिल ते 13 एप्रिल या कालावधीत मंगळ मृगशीर्ष नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. ज्या कामात धाडस आवश्यक आहे तेथे तुम्ही उसने अवसान आणून का होईना पण धाडस दाखवाल. व हाच तुमच्या स्वभावात बदल करणारा टर्निंग पाँईंट ठरेल. ज्यांना सुरक्षारक्षक, होमगार्ड, अग्निशमन दल, पोलिस दल येथे नोकरीची अपेक्षा आहे त्यांनी या कालावधीत आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत. मिलिटरीमधे जाण्याची इच्छा असलेल्यांना तर ही सुवर्ण संधीच ठरेल. दारूगोळा, शस्त्रास्त्रे, धारदार वस्तू, हत्यारे इ. बरोबर व्यावसायिक संबंध येणार आहे. अग्नीशी संबंधित बाबतीतील सहभाग महत्वाचा आहे.
- 16 मे ते 26 मे या कालावधीत बुध मृगशीर्ष नक्षत्रात भ्रमण करणार आहे. फार्मसीची डिग्री, डिप्लोमा घेतलेल्यानी अवश्य औषधाचे दुकान सुरू करण्याचा प्रयत्न करावा. वीटभट्यांच्या व्यवसायातील अडचणी दूर होऊन व्यवसायाला तेजी येईल. कारखान्याच्या भट्टया, बाँयलर वाफेचे इंजिन इत्यादी ठिकाणी काम करण्याची संधी मिळणार आहे तरी सोडू नका. आँपरेशन थिएटर मधील काम करण्याची क्षमता सन्मान मिळवून देईल.
- 28 जून ते 7 जुलै या कालावधीत पुन: बुध याच नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. करवसुली खाते कन्सल्टन्सी सर्विसेस, रेल्वे खाते, कम्युनिकेशन खाते, दळणवळञ खाते या खात्याशी संबंधित असलेल्यांना आपले कर्तृत्व दाखवता येईल.
- 23 मे ते 28 मे या दिवसात शुक्र मृगशीर्ष नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. नर्तक, वादक, गायक या कलाकारांना आपली कला मोठ्या प्रमाणात सादर करता येणार आहे. ज्यांची फ्रीज, टी, व्ही, एसीची दुकाने आहेत त्यांनी चांगला सेल होण्यासाठी कांही युक्त्या काढाव्यात. ब्युटी पार्लर, सुगंधी अत्तरे यांच्या उत्पादकांना मोठ्या रकमेची आँर्डर मिळणार आहे तरी त्या विषयाची स्वत:ची गणिते तयार ठेवा. चष्म्याचे लेन्सेस, चष्म्याची दुकाने सुरू करायची इच्छा असेल तर हाच कालावधी त्याबाबतची तयारी करण्याचा आहे. गोड पदार्थांचे घरगुती व्यवसाय सुरूवात करा.
- 08 जून ते 15 जून 2021 या कालावधीत रवि मृगशीर्ष नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. दरवर्षी आपण 07 जूनला मृगशीर्ष नक्षत्राची पाऊस कधी पडेल म्हणून वाट बघतो. आपण वैयक्तिक भविष्याच्या दृष्टीकोनातून विचार करूया. ज्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे व त्यांना आता वाढवायचा आहे तर आत्ताच वाढवा पावसासारखा धोधो पैसा मिळेल. स्वतंत्र व्यवसायाचा विचार करा. सरकारी नोकर, अधिकारी, सरकारी प्रशासनाधिकांरी यांना राज दरबारी मान मिळणार आहे.
मृगशीर्ष हे नक्षत्र सर्वच शुभकार्याला चांगले व शुभ आहे. कलाकारांनी नवनवीन कला शिकाव्या. मौंजी, विवाह, बारसे यांना शुभ असून ज्यांचा गृहप्रवेश विधी राहिलेला आहे त्यांनी या नक्षत्रावर करण्यास हरकत नाही. नवीन व्यवसाय सुरू करणे, दुकान सुरू करणे याचा नुसता विचार करू नका तर संधीचा फायदा घ्या व पावसासारखा धनाचा पूर तुमच्याही व्यवसायात येईपर्यंत काम करा.
. || शुभं-भवतु ||
***************************** * *************************************************
सूचना:–सोमवारी पहा मिथुन राशीतील नक्षत्रांकडू काय काय मिळवायचे ते.
रास मिथुन नक्षत्र मृगशीर्ष चरण ३ व ४. आर्द्रा चरण १ ते ४. पुनर्वसू चरण १, २, ३.
Thank you Tai