daily horoscope

सोमवार 04 जानेवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in
सोमवार 04 जानेवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

सोमवार 04 जानेवारी चंद्र रास सिंह 25:03 पर्यंत व नंतर कन्या. चंद्रनक्षत्र पूर्वा फाल्गुनी 19:16 पर्यंत व नंतर उत्तरा फाल्गुनी. आज बुध मकर राशीमधे प्रवेश करत आहे. वेळ 27:55.

daily horoscope

मेष :– संततीकडून मनाला आनंद देणारी व आश्र्चर्यकारक बातमी कळेल.. तरूणांनी आपल्या मनाला अती रूखरूख लावून घेऊ नये. वकिल मंडळीना चमत्कारिक केसचा त्रास होणार आहे.

वृषभ :–वडिलार्जित व्यवहारासाठी भावंडांची मदत होईल व वडिलांच्या इच्छेनुसार सर्व काही करता येईल. लेखक व प्रकाशक यांचे विचार जुळल्यामुळे पुस्तक छापण्याचे नक्की ठरेल. व रेंगाळलेला प्रश्र्न संपेल.

मिथुन :–कामाच्या व्यापामुळे बर्याच गोष्टी मागेपुढे कराव्या लागतील. पूर्वनियोजित ठरलेल्या भेटीगाठी रद्ध करू नका. नोकरीत बदलाची अपेक्षा करणार्‍यांनी आपले विचार वरिष्ठांसमोर व्यक्त करावेत.

कर्क :–गर्भवती महिलांनी मानसिक ताण घेऊ नये. वयस्कर मंडळीना पाय घसरून पडण्याची भिती आहे तरी काळजी घ्या. ब्लडप्रेशरचा त्रास असलेल्यांनी दगदग करण्याऐवजी आराम करावा व आपल्या छंदाकडे लक्ष द्यावे.

सिंह :–नोकरीच्या प्रतिक्षेतील मंडळीना लवकरच नवीन संधी मिळणार आहे. स्वत:च्या फार अटी अपेक्षा ठेवू नका. कोर्टातील कामाचा भाऊ न करता कुटुंबातील ज्येष्ठांच्या विचाराने तडजोडीचा विचार करावा.

कन्या :–कुटुंबातील नाराजी मानसिक त्रास देईल. स्वभावातील शांतपणा सर्वच रोगावर, त्रासावर इलाज करेल हे विसरू नका. वडील भावंडांबरोबर महत्वाच्या कामासाठी प्रवास करावा लागेल.

तूळ :–वैचारिक वादविवाद करू नका त्याने काहीच साध्य होणार नाही. मित्रासाठी पोलिस स्टेशनला किंवा कोर्टात जामिन राहण्यासाठी जावे लागेल. मनातील रागावर नियंत्रण मिळवा.

वृश्र्चिक :– कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा आईसाठी दवाखान्यात जावे लागेल. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण घाला नाहीतर आज दुखापतीचा संभव आहे. बाजारात खिसा पैसे सांभाळा.

धनु :– स्वत:ची कार्यशैली ठरवा. शारिरीक उत्साहाचा आवाका समजून घ्या. अंगावर घेतलेले काम श्रद्धेने पूर्ण करा. कलाकार मंडळीना कला प्रदर्शन करण्याची संधी मिळेल.

मकर :–कामातील आळस किंवा दिरंगाईचा त्रास होईल. विद्यार्थ्यांनाी आपल्याला अवघड वाटणार्‍या विषयासाठी मेहनत वाढवावी व विशेष मार्गदर्शनही घ्यावे. कुटुंबात मित्रमैत्रिणींची गर्दी होईल.

कुंभ :– व्यायाम करणार्‍यांनी डाँक्टरांच्या सल्ल्याशिवाय मनाने किंवा इतरांचे ऐकून कांहीही करू नये. हार्ट पेशंट्सना आज आराम करायचा आहे व औषधेही वेळेवर घ्यावीत.

मीन :– सकाळपासूनच आज कामाची घाई राहणार आहे. लहान भावंडांबरोबर तात्विक वाद होईल. नोकरीच्या प्रतिक्षेतील मंडळीना अचानक नवीन नोकरी कळेल. आर्थिक खर्च वाढेल.

.                                                                  || शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *