Read in
रविवार 03 जानेवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
रविवार 03 जानेवारी आज चंद्ररास सिंह दिवसरात्र. चंद्रनक्षत्र मघा 19:56 पर्यंत व नंतर पूर्वा फाल्गुनी. वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :– मुलांच्या अभ्यासावर लक्ष ठेवावे लागेल. तरूणांच्या मनातील इच्छा पूर्ण होण्याचे संकेत मिळतील. वडिलांच्या नोकरीतील अडचणीवर उपाय सापडेल. पुरूष मंडळीना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.
वृषभ :– सासुबाईंच्या तब्बेतीची काळजी घ्यावी लागेल. घराला नवीन भाडेकरू मिळेल. महिलांनी खाजगी गोष्टी इतरांना कळणार नाहीत याची दखल घ्या. कुटुंबातील समारंभ तुमच्या पुढाकाराने फार पडेल.
मिथुन :–नोकरीतील कामाचा ताण अचानक अर्ध्यावर येईल. सामाजिक कार्यकर्त्यानी कोणत्याही काँमेंटस् अविचाराने करू नयेत. वयस्कर मंडळीना नवीन औषध सुरू करताना तज्ञांचा सल्ला घ्या.
कर्क :–लहान भावंडाच्या वतीने त्याचे विचार व्यक्त करावे लागतील. आजोळ कडील नवीन पाहुण्यांचे स्वागत करावे लागेल. एखाद्या शासकिय आश्रमशाळेच्या सोयीसाठी पैसे खर्च करावे लागतील.
सिंह :–कर्तव्य कठोर असलेली तुमची प्रसिद्धी तुम्हाला मान मिळवून देईल. बदलीच्या प्रतिक्षेत असाल तर तुम्हालाच त्याबाबत आपले म्हणणे वरिष्ठांना सांगावे लागेल.
कन्या :–विवाहेच्छूना आता फार विचार केल्याचा मानसिक त्रास होईल. मानसशास्त्राच्या अभ्यासकांना वेगळ्याच क केसची स्टडी करावी लागेल. बँकेत अडकलेले पैसे विनासायास मिळणार नाहीत
तूळ :–आईच्या नात्याकडील आर्थिक व्यवहारास हजर रहावे लागेल. लहान मुलांच्या कानाचा त्रास अचानक वाढेल तरी दुर्लक्ष करू नका. बाजारात जाताना आज जास्त पैसे घेऊ नका.
वृश्र्चिक :–मित्राच्या अडचणीसाठी पोलिसस्टेशनला जावे लागेल. कालच्या दिवसातील झालेल्या चर्चा निष्फळ ठरतील. वकील मंडळीनी स्पष्टपणा च्या नावाखाली फटकळपणे बोलू नये.
धनु :–श्री दत्तगुरूंच्या प्रसादाने गेल्या वर्षीपासून सापडत नसलेली कागदपत्रे सापडतील. रेल्वेचा प्रवास महागात पडेल. लहान मुलांच्या हातातील वस्तुवर नीट लक्ष ठेवा.
मकर :–वडिलांना पिण्याच्या पाण्यापासून झालेल्या त्रासावर ईलाज करावा लागेल. आईचे आँपरेशन करण्याचे नक्की ठरेल. तरूण मुलीकरीता वडीलांकडून नवीन गाडीची खरेदी होईल.
कुंभ :–व्यायामाच्या शिक्षकांवर मुलीना प्रशिक्षण देण्याचे काम सोपवले जाईल. सरकारी योजनेची माहिती देण्याचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाईल.
मीन :–लहान मुलांच्या डोळ्याला ईजा होण्याचा धोका आहे. काळजी घ्या. वयस्कर मंडळीनी आरोग्याची तपासणी करून घ्यावी तरूणांना सुग्रास भोजनाचा आस्वाद घेता येणार आहे.
||शुभं-भवतु ||