Read in
जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 या कालावधीतील प्रत्येक नक्षत्रांचा कालावधी व मिळणार्या संधीबाबतची माहिती.
प्रिय वाचकहो नमस्कार,
नेहमी भविष्य लिहीताना आपण ग्रहांच्या भ्रमणांचा नक्षत्रांचा, त्याच्या उपनक्षत्रस्वामीचा व अंशात्मक योगाचा विचार करतो पण त्याचबरोबर येणार्या कालावधीत आपण काय करावे याचाही विचार किती महत्वाचा आहे हे तुम्ही जाणताच.
वर्षाच्या बारा महिन्यातून येणारा हा कालावधी फक्त आणि फक्त त्याच कालावधीत घडणार्या घटनांसाठी जर वापरला तर आपली जी दमछाक होते ती होणार नाही. व अपेक्षित यशही मिळेल. म्हणून या वेगळ्या पद्धतीने नक्षत्रीय फलादेश द्यायचे ठरवले. जसे पावसाळ्यापूर्वीच जागरूकतेने आवश्यक त्या पूरक कामांची आपण जोडणी करतो तसेच हे पण आहे. थोडक्यात काय तर येणार्या कालावधीतील सर्व त्या संधींचा फायदा घेणे. या विचाराने हे विचार मी आपल्यासमोर मांडत आहे. प्रत्येक राशीमधे सव्वादोन नक्षत्रे येत असल्याने त्यानुसार रोज एका राशीची देण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण हे वाचावे व आपला अभिप्रायही द्यावा ही विनंती.
मेष राशीमध्ये येणारी नक्षत्रे
मेष रास अश्र्विनी नक्षत्र चरण 1 ते 4
- अश्र्विनी :–14 एप्रिल ते 27 एप्रिल या कालावधीत सूर्य अश्र्विनी नक्षत्रातून भ्रमण करतो. तुम्ही अतिशय ज्ञानी अप्रतिम बुद्धीमत्ता असलेले असून तुम्हाला सतत कांहीतरी नवनवीन शिकावे ही ओढ आहे. म्हणून या कालावधीत एखादे टेक्निकल काम शिकावे. आरोग्याशी संबंधित एखाद्या कोर्सला प्रवेश घेतलात तर नक्कीच त्यात करीअर करता येईल. 16 एप्रिलला तुमच्याच नक्षतत्रातून होणारे बुधाचे भ्रमण तर तुमच्या बुद्धीला अशी धार देणार आहे की तुम्हाला पुन्हा मागे वळून पहावे लागणारच नाही. कायद्याचे शाँर्ट कोर्सेस कींवा सायबर लाँ बाबतचे शिक्षण आयुष्याला वेगळेच वळण देईल. लेखक साहित्यीकांनी नवीन विषयावरच्या लेखनाचा संकल्प करायला हरकत नाही.
- एखादे लहानसे वर्कशाँप सुरू करू शकता. आँफीस सुरू करणे, दवाखाना सुरू करणे नवीन उद्धोगधंदा सुरू करणे, दुकानाचे उद्घाटन करणे, यासाठी हा कालावधी तुम्हाला अतिशय लाभदायक आहे. जून्या दुखण्यांवर नवीन औषध सुरू करत असाल तर नक्कीच या कालावधीत सुरू करा. औषधच नव्हे तर या नक्षत्रावर जर रखडलेली शस्त्रक्रिया केली तर ती सुद्धा यशस्वी होते. शेतकरी मंडळीना विहीर खणायची असेल तरीही या नक्षत्राचा उपयोग करून घ्या. कर्जामध्ये बुडलेल्यांनी जेवढे शक्य होईल तेवढे कर्ज याच कालावधीत फेडावे म्हणजे तुमच्या डोक्यावरचा कर्जाचा भारही लवकर उतरून जाईल. एखाद्या नविन कार्याचा आरंभ करायचा असेल तर अगदी कोणतीही शंका मनात न ठेवता कार्याचा आरंभ करा, गाडी एकदम सुसाट सुटेल नाँन स्टाँप.
- स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्यांनी आपल्या मेहनतीवर विश्र्वास ठेवावा. मर्दानी खेळाची आवड असणार्यांनी आपली जिद्द सोडली नाही तर अपेक्षित यश नक्कीच मिळणार आहे. मेडीकल क्षेत्रातील डाँक्टर साहेबांना मोठी अवघड सर्जरी मान मिळवून देणार आहे.
- ज्यांना नेतृत्वगुणाची जिद्द आहे त्यांनी या कालावधीत सहनशक्ती, मनःशक्ती वाढवण्याचा प्रयत्न करावा. पोलिस खात्यात करिअर करण्याच्या उमेदवारांनी हा कालावधी आपल्याला बोनस मिळाला आहे असे समजून मेहनत घ्यावी.
- या अश्र्विनी नक्षत्राने तुम्हाला कोणकोणते गुण दिलेत हे समजून घ्या व त्याचा पुरेपूर उपयोग करा. अप्रतिम बुद्धीमत्ता, नवनवीन शिकण्याची आवड, स्पर्धा परीक्षेत यश, महत्वाकांक्षी, निश्र्चयी स्वभाव. धीट, शूर, प्रत्येक कामातील जिद्दी स्वभाव, महत्वाकांक्षी, प्रामाणिक व विश्र्वास स्वभाव. उच्च आचारविचार, साधी राहणी, व निटनेटकेपणा व शिस्त. यश मिळवण्यासाठी कितीही दगदग सोसण्याची तयारी, अधिकाराचा मोह.
तुमचे व्यक्तीमत्व वरील गुणांनी परिपूर्ण असल्याने तुम्ही या कालावधीचा फायदा घेऊन आयुष्याचे सोने करा.
मेष रास भरणी नक्षत्र चरण 1 ते 4
27/04 2021 ला सुर्य भरणी नक्षत्र आतून भ्रमण करत आहे. हा कालावधी 11/05/ 2021 पर्यंतचा आहे. या कालावधीत आपण काय करावे याचा विचार करूया.
- तुमचा स्वभाव अतिशय प्रामाणिक व काटेकोरपणे न्यायकरणारा असल्याने वकिलीचे शिक्षण घेण्यात तुम्ही जराही मागे पडणार नाही. .वकिली शिक्षणाबरोबर टँक्सच्या क्षेत्रातील विक्रीकर खाते, रेव्हेन्यू खाते या खात्यांच्या परीक्षा द्याव्यात आता वरील कालावधीत परीक्षा होतीलच असे नाही तरी या कालावधीत अभ्यास सुरू करावा. अतिशय विश्र्वासाला पात्र असून ध्येयनिष्ठ व कठोरता असल्याने तुम्हाला विरोधकांना नामोहरण करण्याची ताकद फार मोठी भारी आहे त्यामुळे तुम्ही उत्तम फौजदारी वकील होऊ शकता तरी त्याबाबतचा अभ्यास सुरू करावा. व तुमचा स्वभाव दिलदार स्वभाव आहे स्वभाव धडपड्या असूनही कायम प्रसन्न असून वेगवेगळ्या कलांची आवडही आहे. त्यामुळे ज्यांना करीअर करायचे आहे अशा तरूणांनी आपले कलागुण जोपासावे व त्यातील शिक्षण घ्यावे.
- या नक्षत्रावर फारशी शुभकार्ये करू नयेत. पण ज्या गोष्टींचा आपल्याला साठा करायचा आहे त्या गोष्टी मात्र आवर्जून याच कालावधीत कराव्यात. महिन्यासाठी किंवा वर्षांसाठीचा साठा करावा. दुकानदारांनी पुढे फायदा होणार आहे हे ओळखून शक्य तेवढा माल भरावा. एखाद्या गोष्टीची निर्मिती करायची असल्यास या कालावधीत केल्यास ती वस्तू लवकर खराब होणार नाही व त्या वस्तूचे आयुष्यही वाढेल. म्हणूनच कोणतेही प्राँडक्शन करताना हा कालावधी महत्वाचा मानला जातो.
- मद्य करतानाही याच कालावधीचा उपयोग करून मद्याचा दर्जा वाढवला जातो. अगदी वाहनात पेट्रोल भरताना सुद्धा प्रत्येक वेळी भरणी नक्षत्र बघावे. विहीर तलावाची कामे करायची असल्यास शेतकरी वर्गाने या चा जरूर वापर करावा. घर विकत घेतलेल्या व शुभ मुहूर्तासाठी थांबलेल्यानी याच नक्षत्रावर गृहप्रवेश करावा.
- ज्यांना आपल्या प्राँडक्टसचे किंवा संमिश्र वस्तूंचे प्रदर्शन भरवायचे आहे. त्यांनी दरवर्षी याच कालावधीचे नियोजन करावे. शो प्रदर्शन करणे, फोटोग्राफीचा व्यवसाय किंवा तत्सम कार्यशाळा घेणे. कपडे, सौंदर्प्रसाधने संगिताची वेगवेगळी वाद्धे, सिल्कचे कपडे, उंचीकपडे या प्रदर्शनाला हा कालावधी अतिशय लाभदायक आहे. प्लास्टीकच्या, फायबरच्या वस्तू चामडाची वेगवेगळ्या वस्तूच्या निर्मितीला याच कालावधीत प्रारंभ करावा. ज्यांना नोकरी बदलायची आहे त्यानी याच निर्मितीच्या क्षेत्रात प्रयत्न करावा.
- हाँटेल, रेस्टाँरंटचा करिअरसाठी तुम्ही विचार करू शकता. कँटरींगची डिप्लोमा डिग्री पण तुम्हाला सहजपणे करतायेणार आहे. ज्यांना लहानसे हाँटेल किंवा चहाचा स्टाइल सुरू करायचा आहे त्यांनी आधी या कालावधीत च सुरू करावे व मग वाढवावे.
वापच्या अंगी असलेल्या गुणांचा वापर करून आपल्या आयुष्याची गाडी मार्गी लावण्यासाठी पुढील कालावधीचा पण वापर करू शकता.
22जानेवारी ते 16 फेब्रुवारी, 10 एप्रिल ते 20 एप्रिल 2021., 23 एप्रिल ते 29 एप्रिल 2021. हा कालावधी पण तुम्ही करत असलेल्या कार्यातून तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करेल.
मेष रास कृतिका नक्षत्र चरण पहिला
कृतिका :– 11/05 2021 ते 25/ 05 2021 खग या कालावधीत सूर्य कृतिका नक्षत्र आतून भ्रमण करणार आहे. सूर्य त्याच्या स्वतःच्याच नक्षत्र आतून भ्रमण करणार असल्याने सर्वच कसे दैदीप्यमान आहे.
- तुमच्या शरिरातील उत्साह, जोम हा प्रचंड असून स्वभाव पण अतिशय निश्र्चयी, व व धाडसी आहे. तर्कशक्ती उत्तम असून शिस्तप्रिय
- उत्तम प्रतीची बुद्धीमत्ता, उत्तम कल्पनाशक्ती, आवश्यक असलेली कार्यपद्धती त्यामुळे तुम्ही उच्च पदाची इच्छा बाळगणे कांही गैर नाही. उत्साह उत्तम असून वाद घालण्यात तरबेज व प्रचंड काम करण्याची ताकद आहे. कोणत्याही संकटाला धैर्याने तोंड देवून त्यातून सहीसलामत बाहेर पडण्याचा वरदहस्त लाभलेला आहे. नेतृत्वाची आवड असूनयुद्धकलेची हौ स आहे. प्रत्येकाशी स्पर्धा करण्याची वृत्ती असून अतिशय रागिष्ट, गर्विष्ठ, पण साधुजनांचा आदर करण्याचा स्वभाव आहे.तुम्ही यापैकी कोणत्याही शाखेत नोकरी करिअर करण्यास योग्य आहात. 11 मे ते 25 मे हा गोल्डन कालावधी असल्याने. या नोकरीस आवश्यक असलेल्या शिक्षणाचा पाया याच कालावधीत सुरू ठेवा. पण त्यासाठी त्या क्षेत्राचा अभ्यास करायला पाहीजे. व हा अभ्यास सुरू करण्याचा योग्य कालावधी म्हणजे हाच होय.
- पोलिस, मिलिटरी नेव्ही, अग्निशमन खाते येथील नोकरीसाठीचा अभ्यास सुरू करण्याचा पिरेड हाच आहे. कोणत्याही परिस्थितीत संकटाला धैर्याने तोंड देऊन पुढे जाण्याची वृत्ती आहे. मेडिकल, सर्जिकल , यांसाठी लागणारी प्रचंड बुद्धीमत्ता आहे. सुरक्षा रक्षक, जकात खाते, सेवानिवृत्ती विभाग शल्यचिकित्सक, यापैकीकोठेही करिअर करायची असलीतरी सहजगत्या हे घडणार आहे. पण यासाठीचा करावा लागणारा अभ्यास मात्र तुम्हाला सूर्य या गृहाच्या अंमलाखाली करायचा आहे.
- 16 फेब्रुवारी ते 11 मार्च 2021 हा कालावधी आहे कृतिका नक्षत्रातील मंगळाच्या भ्रमणांचा त्यामुळे तुम्हाला या कालावधीत या शाखांच्या अभ्यासाला सुरूवात करायची आहे. पोलिस, मिलिटरी, नेव्ही, यांच्यासाठी हा कालावधी शुभ आहे. बाँम्ब, फटाके व स्फोटके यांचा व्यवसाय करण्यसाठीच्या
- 29एप्रिल ते 6 मे 2021 हा कालावधीत बुध कृतिका नक्षत्र आतून भ्रमण करणार आहे. सरकारी कामासंदर्भात वादविवाद करणारे, वकील, जकातखाते कस्टम खाते इत्यादीसाठी लाभदायक आहे. ज्यांना या क्षेत्राविषयी आकर्षण आहे व येथे काम करण्याची इच्छा असलेल्यांनी या कालावधीचा लाभ घ्यावा.
- 1 मे ते 12 मे पर्यंतचा कालावधी पांढर्या क्रिम्स, लाल रंगाच्या स्थूल, सौंदर्य प्रसाधने, लोकरीच्या वस्तू, पार्लर्स यातून चांगला लाभ होणार आहे. या विषयांचे शिक्षण घ्यावयाचे असल्यास 29 एप्रिल ते 6 मे या कालावधीत घ्यावे. किंवा पूर्वीच शिक्षण घेतले असल्यास या कालावधीत मुलाखती द्याव्यात.
- वास्तविक हे नक्षत्र विवाह, मुंज, बारसे यासारख्या शुभकामासाठी चालत नसूनही एखादे अधिकार ग्रहण करणे, शत्रू बरोबर मुकाबला करणे मोठ्या वस्तूंची विक्री करणे, यासाठी अतिशय शुभ आहे तरी ही कामे करावीत. त्याचबरोबर आँपरेशन करणे सिझेरीयन करणे यासाठी उत्तम आहे. म्हणून कृतिका नक्षत्रातील भ्रमणांचा जो लाभ आपल्या घ्यायचा आहे त्यासाठी या वरती दिलेल्या कालावधीचा वापर करावा.
************************************************************************************.
,