शनिवार 02. जानेवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
शनिवार. 02 जानेवारी आज चंद्ररास कर्क 20:16 पर्यंत व नंतर सिंह. चंद्रनक्षत्र आश्लेषा 20:16 पर्यंत नंतर मघा.
आज संकष्ट चतुर्थी आहे. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–आज जून्या कामात अडकून पडू नका. स्वतःच्या घराला सुशोभित करण्याचे विचार पक्के कराल.
वृषभ :–नात्यातील गोतावळ्यात रममाण व्हाल. नोकरीत इतरांकडून जास्त अपेक्षा करू नका.
मिथुन :–तरूण मुलांसोबत कुटुंबात नवीन वर्षाचा स्वागतसमारंभ साजरा कराल. वयस्कर मंडळी खूष होतील.
कर्क :–सुग्रास भोजनाचा आनंद मिळेल. मित्रमंडळींकडून आवडती गिफ्ट मिळेल.
सिंह :: खरेदीच्या नावाखाली उगीचच भटकणे होईल. मनासारखी खरेदी होणार नाही.
कन्या :– कुटुंबात नातेवाईकांची भाऊगर्दी होईल. वडीलांच्या आवडीचा विचार कराल.
तूळ :– आईबरोबर वेळ मजेत घालवाल. प्रवासाची संधी मिळेल. मित्रमंडळीमधे कौतुकाचा विषय होईल.
वृश्र्चिक :–आर्थिक व्यवहारात फायदा होईल. नवीन खरेदीच्या मागे लागू नका.
धनु :–शेजारील मंडळींच्या गरजेला धावून जावे लागेल. विवाहित मुली कडील दुखद घटना कळेल.
मकर :– आँन लाईन शिकवणार्या शिक्षकांना आपल्या कामाचे योग्य प्रकारे नियोजन करावे लागेल.
कुंभ :–नोकरीत वरीष्ठांकडून कौतुक होईल. आँफीस कडून कामासाठी प्रवास करावा लागेल.
मीन :–आर्थिक बाजू भक्कम झाल्याने रूबाब करावासा वाटेल. व्यवसायासाठी केलेल्या नवीन अँग्रीमेंट मुळे सहकार्यांच्या चर्चेत याल.
|| शुभं-भवतु ||
Thank you Tai