Read in
गुरूवार 31 डिसेंबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
गुरूवार 31 डिसेंबर चंद्ररास मिथुन 13:37 पर्यंत व नंतर कर्क. चंद्रनक्षत्र पुनर्वसु 19:48 पर्यंत व नंतर पुष्य. आज गुरूपुष्यामृतयोग 19:48 ते 31:14 पर्यंत आहे.वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज 2020 या वर्षाचा शेवटचा दिवस असून उद्यापासून 2021 चे नविन वर्ष सुरू होत आहे.
मेष :–उद्योग व्यवसायातील रेंगाळलेली कामे शक्य तेवढी आवरती घेण्यासाठी कामाचा पिच्छा पुरवाल. लहान मुलांच्या अभ्यासातील प्रगतीकडे लक्ष द्यावे लागेल. पुरूष मंडळीना सासुरवाडीकडून छानशी कांहीतरी गिफ्ट मिळेल.
वृषभ :– महिलांना नटून थटून बाहेर फेरफटका मारावा असे वाटेल. ज्येष्ठ महिलांना घरगुती प्रश्र्न सोडल्याचा आनंद मिळेल. वडिलांच्या नात्यातील ज्येष्ठांच्या स्वागताची तयारी करावी लागेल. पतिराजा्बरोबररर दिवसाची लहानशी पिकनीक करून याल.
मिथुन :–बर्याच दिवसापासूनच्या मनातील इच्छा पूर्ण करणारा आजचा दिवस आहे. पण त्याचबरोबर मनात एकापाठोपाठ शंकांचे काहूर माजेल. आज तुमचे भरपूर पैसे खर्च होणार आहेत कितीही वाचवायचा प्रयत्न केला तरी वाचवता येणार नाहीत.
कर्क :–बर्याच दिवसापासून जपुन ठेवलेली वस्तू लहान मुलांकडून हरवल्याचे लक्षात येईल. जवळच्या मित्राच्या आजारपणाची दुख मानसिक त्रास देईल. संततीवर अचानक एखादे संकट ओढवेल. त्यांना नीट समजून घ्या व आधार द्या.
सिंह :–स्वभावातील मी पणात वाढ होऊन आत्मविश्वासात अतिरेकी वाढ होईल. सामाजिक कार्यात सहभागी होताना त्यामुळे अडचणीत याल. पती पत्नीमधील नात्यात वादग्रस्त विषयावरील चर्चा वाढत जाऊन चर्चेचे रूपच बदलेल. तरी शांत राहण्याचा प्रयत्न करा.
कन्या :–आजचा दिवस एकदम सुखासमाधानात जाणार असल्याचे संकेत मिळतील. अपत्य प्राप्तीच्या प्रतिक्षेतील दांपत्याला गोड बातमी कळेल. न सुटणार्या प्रश्र्नांवर तोडगा सापडल्याने तुम्हाला जग जिंकल्याचा आनंद होईल.
तूळ :–घरगुती प्रश्र्नावरील चर्चा महत्वाची ठरेल व अखेर निर्णयावर येण्याची चिन्हे दिसू लागतील. पूर्वनियोजित कार्यक्रमाची तयारी न झाल्याने कार्यक्रमात उत्साह वाटणार नाही. मित्रांकडून मनाला आनंद देणारी घटना घडेल.
वृश्र्चिक :–लहानश्या गोष्टीला मोठे रूप देउन उगीचच भिंतीचे वातावरण निर्माण कराल. आर्थिक बाबतीत आज तुमची फसवणूक होण्याचे प्रसंग येथील. बँकेचे व्यवहार कोणाकडेही सोपवू नका. महिलांना आपले छंद जोपासण्याचे मार्ग सापडतील.
धनु:–श्री दत्तगुरूंच्या कृपेने मागील वर्षातील प्रलंबित झालेली येणी आज अचानक मिळू लागणार आहे. नोकरीच्या ठीकाणी आज कामाचा उरका वाढेल व त्यामुळे मनावरचे ओझे उतरेल. मुलांच्या काळजीने मन त्रस्त होईल. मनाला त्रासदायक ठरत असलेले वाईट विचार येतील.
मकर :–भावाबरोबर वैचारीक वाद होऊन मानसिक क्लेश वाढतील. महिलांना कुटुंबातील व्यक्तींच्या वागण्याचा आज खूपच त्रास होणार आहे. व्यावसायिकांना घेणेकरी तगादा लावतील. वयस्कर मंडळीना पायदुखीचा भयंकर त्रास जाणवेल.
कुंभ :–कुटुंबात मंगलकार्याची नांदी सुरू होईल.फार दिवसापासून प्रतिक्षेत असलेल्या घराचे स्वप्न पूर्ण होईल. आर्थिक व्यवहार पूर्ण करता येणार असल्याची मुलांकडून खात्री मिळेल. दवाखान्यात अँडमिट असलेल्यांना डाँक्टरांकडून दिलासा मिळेल.
मीन :–महिलांचे वैचारिक वाद विकोपाला जातील. नवीन यांत्रिक पद्धतीने कामे करण्याचे डेमाँन्स्ट्रेशनची जबाबदारी तुमच्यावर येईल. सामाजिक कार्यकर्त्यानी कामाचे योग्य नियोजन केल्यास कामात सुसूत्रता येईल व काम ही सोपे होईल.
|| शुभं-भवतु ||