Read In
बुधवार 30 डिसेंबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
बुधवार 30 डिसेंबर 2020 आज चंद्ररास मिथुन. दिवसरात्र असून चंद्रनक्षत्र आर्द्रा 18.54 पर्यंत व नंतर पुनर्वसु आहे. आज मागर्शीर्ष पौर्णिमा सकाळी 08:57 पर्यंत आहे. वरील राशीचा व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–आजचा दिवस अतिशय आनंदात व उत्साहात जाणार आहे. समोरच्याला, प्रतिस्पर्ध्याला शांत करण्याचा प्रसंगाने आजुबाजूचे पण अचंबित होतील. सरकारी व खाजगी कामातही आज बरीच कामे हातावेगळी होतील. मानसिक आनंद मिळेल.
वृषभ :–आज प्रेमवीर काहीसे गैरसमजुतीमुळे वाद घालणार आहेत. तरूण मुलींनी लहान सहान गोष्टी मनाला लावून घेऊ नयेत. अध्यात्मिक अभ्यासकांना सत्संगाचा अनुभव घेता येणार आहे व श्री गुरूकृपेचा पण लाभ होईल. तरी सत्संग चुकवू नये.
मिथुन :– वयस्कर मंडळींच्या हातापायांना मुंग्या येणे वकिंवा बधिरपणा वाटणे हा त्रास होण्याची शक्यता आहे तरी लक्ष द्यावे. अचानक शेजारील व्यक्तीबरोबर तात्विक वाद होण्याचा प्रसंग उद्भवेल. हट्टीपणाने वाद घालू नये.
कर्क :–मनाला चिंता लावणार्या घटना कळतील. वैयक्तिक कोणताही निर्णय तडकाफडकी घेऊ नका. कलाकार मंडळींचे मनोधैर्य उंचावणारा प्रसंग घडेल. स्पर्धकांना यशाची खात्री वाढेल पण तरीही बेफिकीर राहू नका. आजीआजोबांना आश्र्चर्य वाटणारे अनुभव येतील.
सिंह :–महिलांना माहेरकडील नात्याची आनंदाची बातमी कळेल. प्रथम संततीच्या बौद्धीक क्षेत्रातील यशाबद्दल सर्वांकडून कौतुक होईल. मनामधील विचारांना बाहेर काढा अन्यथा मानसिक त्रास संभवतो. कुटुंबातील जेष्ठांकडून जून्या पुराण्या गोष्टींची चर्चा होईल.
कन्या:–कुटुंबात विवाहाबाबतची बोलणी अतिरेकीपणे हाताळली जातील. विवाहेच्छूंनी समंजसपणा दाखवावा. संधीवाताचा त्रास असलेल्या वयस्कर मंडळीनी विशेष काळजी घ्यावी. कुटुंबात भाउबंदकीच्या व्यवहारात वाद निर्माण होतील.
तूळ :–कुटुंबात कोणत्याही परिस्थितीत नाराजी राहणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. नोकरीच्या कामात एखादे विघ्न येऊन मानसिक त्रास होईल. तरी कामाकडे विशेष लक्ष द्यावे. बँकेतील कर्मचारी वर्गाला अतिशय जागरूक रहावे लागेल.
वृश्र्चिक :–आज तुमचा विश्रांतीचा दिवस आहे तरी नवीन कामे काढू नका. तरूणांचा कामातील ढिलेपणा मोठा दणका देईल. महिलांनी मनात कोंडलेले विषय बोलून संपवावेत. लहान मुलांच्या बेशिस्त वळणावर टीका होईल. महिलांनी शांत रहावे
धनु :–आज आत्मविश्वास कायम ठेवण्यासाठी सकारात्मक विचार करण्याची गरज भासेल. तुम्ही तुमची कामे तुमच्याच नियोजनाप्रमाणे कराल तरच यश मिळेल. हातातील काम अर्धवट सोडू नका. विवाहित महिलांनी कामाचा बोजा स्वतःच्या अंगावर घेऊ नये.
मकर :–कुटुंबातील आदर्श व्यक्तीचे घरी येणे होऊन मुलांसमोर कशी चर्चा होईल याचा विचार करा. तरूणांना उगीच कामाचे प्रेशर वाटेल महिलांना आवडत्या वस्तूंची खरेदी करता येणार आहे. प्रेमाच्या व्यवहारात अडचणी निर्माण होतील.
कुंभ :–इतरांना मदत करण्यासाठी धावून जाल व पदरमोडही कराल. कुटुंबातील वातावरण एकदम आनंदी व उत्साहवर्धक राहील. समाजातील मान्यवरांकडून लेखक व कवी यांना उस्फूर्त दाद मिळेल. महिलांना अध्यात्मिक आनंद. मिळेल.
मीन :–दूरगावी परगावी राहणार्या आईवडीलांची भेट होण्याचे योग आहेत. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमता ओळखून यशासाठी अभ्यासात प्रगती करावी. तरूणांना अचानक अध्यात्मिक उपासनेची ओढ लागेल. तुमच्या अंदाजानुसार गुंतवणूकीचा कोणालाही सल्ला देऊ नका.
|| शुभं-भवतु ||
Thank you Tai