Read In
मंगळवार 29 डिसेंबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
मंगळवार 29 डिसेंबर 2020 आज चंद्ररास मिथुन दिवसरात्र व चंद्र नक्षत्र मृगशीर्ष 17.31 पर्यंत व नंतर आर्द्रा. आज श्री दत्त जयंती आहे. दत्तपरंपरेतील उपासकांनी आवर्जून उपासना करावी. ज्यांच्या हातात जास्त वेळ नाही त्यांनी बावन श्लोकही श्री गुरूचरित्राचे वाचन करावे. आज फक्त शाकाहार करावा. संध्याकाळी घरी श्री दत्त महाराजांची आरती करावी व नैवेद्ध दाखवावा.
वरील राशीचा व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–आज येणार्या महत्वाच्या निरोपाची खात्री देता येत नाही तरी आतुरतेने वाटपाहू नये म्हणजे विरस होणार नाही. कोणत्याही प्रकारची लाँटरी किंवा शेअर्स मधील व्यवहार आज करायला हरकत नाही. जून्या व्यवहारातून चांगला फायदा होईल.
वृषभ :–महिलांना आवडत्या वस्तू खरेदी करता येणार आहेत. सासरच्या मंडळींकडून नवविवाहितांना एखाद्या मौल्यवान अलंकाराविषयी विचारले जाईल. नवीन घरात रहायला जाण्याचे स्वप्न लांबणीवर पडेल. लहान मुलांना वळण लावावे लागे.
मिथुन :–मनातील इच्छा प्रत्यक्षात पूर्ण करण्याची संधी मिळेल. स्त्रीयांना आवडत्या खरेदीसाठी नवरोबांकडून पाहिजे तेवढे पैसे मिळणार आहेत. लहान मुलांना चित्रकला स्पर्धेत चांगले यश मिळेल व कौतुकही होईल. सरकारी नोकरीतील कर्मचार्यांना अचानक सुखद धक्का मिळेल.
कर्क :–डाँक्टर मंडळीना पेशंटसाठी समुपदेशनाचे कामही करावे लागेल. आईवडीलांना तरूण वयातील मुलांना समजावताना नाकी नऊ येतील. आज आळस वाढल्याने काम करावेसे वाटणार नाही. मनाला आनंद वाटण्यासाठी आवडत्या छंदाकडे लक्ष द्या.
सिंह :–जी कामे मित्रांच्या मदतीने होऊ शकतात तेथे मित्रांची मदत घ्या. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांनी आपल्याला नक्की काय पाहिजे आहे हे ठरवावे व त्याप्रमाणे प्रयत्न करावेत म्हणजे येणारी संधी वाया जाणार नाही.
कन्या :–नोकरीच्या शोधात असलेल्यांनी आपले नांवशाँर्ट लिस्ट झाल्याचा निरोप येईल. उच्चशिक्षणासाठी जाण्याच्या इच्छूकांनी सध्यातरी अजून थांबावे लागणार आहे. वयस्कर मंडळींची आरोग्याची तक्रार काळजी निर्माण करणारी राहील.
तूळ :–तुम्हा कोणत्याही क्षेत्रात असलात तरी तुम्हाला इतरांच्या मतानुसार वागून चालणार चालणार नाही. स्वतःचे मत बनवणे हिताचे ठरेल. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या प्रवासासाठी मदत करावा लागेल प्रसंगाची स्वतःला घेऊन जावे लागेल.
वृश्र्चिक :–आनंदाच्या क्षणी उद्धवा मानसिक क्लेश देणार्या घटनांचा पुन्रउच्चार कराल. कुटुंबात एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन होईल. लहान सहान बाबींवर ऊन वैचारिक संघर्ष होईल. वृद्धांच्या खांदे व पाठीचे मणके दुखण्याचा त्रास होईल.
धनु :–अडकलेल्या कामात तुमच्या सल्ल्याने कामातून मार्ग निघेल. खाजगी नोकरीतील अधिकारी वर्ग स्वतःच्या विचारांचे भांडवल करतील. गुंतवणूकीचा क्षेत्रात तज्ञांच्या सल्ल्याशिवाय कांहीही करू नका. तब्बेतीची तक्रार जाणवेल.
मकर :–बौद्धीक क्षेत्रातील मंडळीना कामाचा ताण सहन होणार नाही इतका जाणवेल. वरच्या वर्गांना आँन लाईन शिकवणार्या शिक्षकांना आपल्या कामाचे योग्य प्रकारे नियोजन करावे लागेल. मित्र मंडळींबरोबरील चर्चेतून तुमची बौद्धीक चुणुक इतरांना जाणवेल.
कुंभ :– ज्यांच्या कामाशी आपला संबंध नाही त्यांच्या कोणत्याही भानगडीत पडू नका. विनाकारण गोत्यात याल. नव्याने जागा बुक करता असाल तर पूर्ण चौकशी बारकाईने करावी लागेल. ती कोणाच्याही ओळखीची असली तरी बेफिकीर राहू नका.
मीन :– आपण खूप दमलो आहोत या भावनेने उंटावरून शेळ्या हाकू नका. अचानक दुपारनंतर प्रकृती ठीक नसल्याचे जाणवेल. आर्थिक गणिते सुटण्याची चिन्हे दिसतील पण लगेच खर्चाची कलमे काढू नका. घरातील वातावरण आनंदाचे राहील.
|| शुभं-भवतु ||
Thank you Tai