Read In
सोमवार 28 डिसेंबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
२८ डिसेंबर २०२० सोमवार आज चंद्र रास वृषभ २८:३९ पर्यंत नंतर मिथुन. चंद्र नक्षत्र रोहिणी १५:३८ पर्यंत व नंतर मृगशीर्ष.
वरील दोन्ही राशींचा व नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या ५:३० च्या कुंडलीनुसार कृष्णमूर्ती पद्धतीने फलादेश देत आहे.
मेषः कामाचा ताण असल्याने तुम्ही तो घेऊ नका. लहान मुलांच्या मारामारीकडे लक्ष द्या. डोक्याला दुखापत होण्याची शक्यता आहे. कोर्टातील कामाची घाई काम बिघडवेल. महिलांनी मानसिक ताणाचा राग इतरांवर काढू नये.
वृषभः कमकुवत मनाच्या महिलांनी भीतीदायक सिनेमे पाहू नये. विद्यार्थ्यांना अवघड विषयात मार्गदर्शनाचा लाभ होईल. कुटुंबात लहान भावाला आगीपासून सांभाळावे लागेल.
मिथुनः श्री दत्तगुरुच्या उपासकांची फार दिवसांची इच्छा पूर्ण होणार आहे. महिलांना आवडत्या वस्तूंची खरेदी करता येईल. आर्थिक व्यवहार लाभदायक राहतील. वयस्कर मंडळींनी पायांची काळजी घ्यावी.
कर्कः विवाहच्छुक मुलांना अपेक्षित जोडीदार चालून येईल. महिलांना बाजारात जाताना आपली पर्स सांभाळावी. कुटुंबात भावंडांमध्ये वैचारिक वाद होतील.
सिंहः फेरीवाले, रिटेल विक्रेते यांना दुपारपर्यंत भरपूर लाभ होणार आहे. विद्यार्थ्यांनी मानसिक बळ वापरून अभ्यास केल्यास कठीण विषय सोपा वाटेल. वयस्कर मंडळींना सुग्रास मेजवानी मिळेल.
कन्याः पार्लरमध्ये महिलांची ये-जा वाढेल. पुरुषांनी खरेदीसाठी महिलांना न्यावे अन्यथा आर्थिक नुकसान होईल. आईजवळ बसून त्यांना सुखाचे चार क्षण द्या.
तूळः अतिमहत्त्वाकांक्षेने त्रास करून घ्याल. गधा मेहनत टाळा. विद्यार्थ्यांनी सामूहिक अभ्यास करावा. वृद्धांना आनंद मिळेल अशा घटना घडतील.
वृश्चिकः व्यवसायातील येणी वसूल करावी लागतील. मुलांनी इतिहास विषयाचे नियोजन करावे. भविष्याची महिलांनी अनावश्यक चिंता करू नये.
धनुः नोकरीच्या शोधात असलेल्यांना अपेक्षित नोकरीची माहिती मिळेल. आज गुंतवणूक करू नका. आजूबाजूच्या वातावरणातून आनंद मिळेल.
मकरः कुटुंबातील प्रत्येकाच्या इच्छेकडे लक्ष द्यावे लागेल. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. लहान मुलांना उंचावरून पडण्याचा धोका आहे.
कुंभः अनावश्यक प्रवास टाळा. औषध क्षेत्रातील व्यापार्यांना फायदा होईल. वयस्कर मंडळींनी सांभाळून चालावे, घसरण्याची भीती.
मीनः गायक कलाकारांना व्यावसायिक बोलावणे येईल. मुलांना रस्त्यावरून नेताना सांभाळावे. अपत्यप्राप्तीच्या प्रतिक्षेतील इच्छुकांना गोड बातमी कळेल. मुलांनी भरपूर खेळून घ्यावे.
IIशुभं भवतुII
Thank you Tai