Read In
साप्ताहिक भविष्य
साप्ताहीक भविष्य रविवार 27 डिसेंबर ते शनिवार 2 जानेवारी 2020
साप्ताहिक भविष्य कृष्णमूर्ती पद्धती नक्षत्रीय फलादेश.
रविवार 27, चंद्र रास वृषभ दिवस रात्र. चंद्र नक्षत्र दुपार 13.00 वाजेपर्यंत व नंतर रोहिणी. सोमवार 28 चंद्र रास वृषभ 28.39 पर्यंत, चंद्र नक्षत्र रोहिणी 15.38 पर्यंत नंतर मृगशीर्ष. मंगळवार 29 रोजी चंद्र रास मिथुन दिवसरात्र, चंद्र नक्षत्र मृगशीर्ष 17.31 पर्यंत नंतर आर्द्रा. बुधवार 30 रोजी चंद्र रास मिथुन दिवसरात्र. चंद्र नक्षत्र आर्द्रा 18.54 पर्यंत नंतर पुनर्वसु.31 गुरूवार3 1 जानेवारी रोजी चंद्र रास मिथुन 13:37 पर्यंत व नंतर कर्क. तसेच चंद्र नक्षत्र पुनर्वसु 19:48 पर्यंत व नंतर पुष्य. शुक्रवार 1 जानेवारी चंद्ररास कर्क दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पुष्य 20:14 पर्यंत व नंतर आश्लेषा. शनिवार 2 जानेवारी चंद्ररास कर्क 20:16 पर्यंत, नंतर सिंह व चंद्र नक्षत्र आश्लेषा 20:16 पर्यंत, व नंतर मघा.
27 रविवारी प्रदोष असल्याने ज्यांचा प्रदोषचा उपवास असतो त्यांनी उपवास करावा व इतरांनी श्री भगवान शंकराची उपासना करावी. सोमवारी 28 रोजी सोम – मृगशीर्ष अमृतयोग 15:38 पासून ते 31:13 पर्यंत आहे. श्री दत्त उपासकांना मंगळवारी 29 तारखेला श्री दत्तजयंती असून गुरूपुष्यामृत योग आहे. हा योग 19:48 ते 31:14 पर्यंत आहे. 2 जानेवारी शनिवार रोजी संकष्ट चतुर्थी असून मुंबईतील चंद्रोदय 21:15 ला आहे.
मेष :-27 व 28 रोजी कामाचा मानसिक ताण जाणवेल. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना शंभर वेळा विचार करा व तज्ञांचा सल्ला पण घ्या. 28 ला कोणतेही महत्वाचे काम काढू नका. कामात अडचणी निर्माण होतील. 29 ची श्री दत्तजयंती तुम्हाला यशाकडे घेऊन जाणारी ठरेल. महत्वाचा संकल्प करायचा असल्यास आजच करा. 30 चा दिवस प्रतिस्पर्ध्यांना पाय मागे घ्यायला लावणारा ठरेल.तरीही राजकीय मंडळीनी प्रतिस्पर्ध्यांसमोर दांडगाई करू नये. 1 व 2 जानेवारी एकदम सुखात व आनंदात जाणार आहे. 2 ची संकष्ट चतुर्थी मनासारखा आनंद देईल व मनातील इच्छा पूर्ण करणारा राहील.
वृषभ :–27 व 28 या दोन्ही दिवसाचा उपयोग तुम्ही शिलकीतील कामे पून्हा सुरू करण्यासाठी वापरलात तर नक्कीच काम पूर्णत्वाला जाईल. 29, 30 व 31 या तीनही दिवसावर कामाचे जबरदस्त प्रेशर तुम्हाला सहन करावे लागणार आहे. नोकरीच्या ठीकाणीही कामाचा व्याप सांभाळताना दिवस कमी पडणार आहे. अनपेक्षितपणे गुंतवणूकीतून मात्र चांगला लाभ होईल. 1 व 2 जानेवारीच्या अनुक्रमे पुष्य व आश्लेषा नक्षत्र असल्याने व शनी व बुधाची शुक्राबरोबर मैत्री असल्याने दोन्ही दिवस तुम्हालाचांगले जाणार आहेत. ज्यांना नव्याने सोने, चांदी, रत्ने अलंकार तसेच कपड्याचे दुकान सुरू करायचे आहे त्यांनी हमखास विचार करावा. व्यवसाय चांगला चालेल. या कोरोनाच्या काळातील बँकलाँग भरून काढता येणार आहे.
मिथुन :–29 व 30 व 31 च्या दुपारपर्यंत श्री दत्त गुरू तुम्हाला अनपेक्षित सुखद धक्का देणार आहेत. जे श्री दत्त गुरूंचे उपासक आहेत त्यांना अध्यात्मिक अनुभूतीचा लाभ होईल. 27 व 28 रोजी सरकारी कामातील निर्णयाची घाई करू नका. घाई केल्यास काम बिघडेल. मध्यस्थी चा उपयोग करू नका. 1 व 2 जानेवारी रोजी पैकी 1 तारखेला आर्थिक व्यवहार लाभदायक राहतील. एखादी कोणत्याही धातुची वस्तु विकत घेत असाल तर 1 तारखेला नक्की घ्या. त्याचा उपयोगही होईल व व टिकेलही चांगली.
कर्क :–1 व 2 जानेवारी रोजी नवीन वर्षाचे नवे संकल्प करायला हरकत नाही. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून तसा संकल्प करावा व 2 पासुन अभ्यासास वा कामास सुरूवात करावी. आश्लेषा नक्षत्र 20: 16 पर्यंत असल्याने वेळ मिळाला नाही हे कारण काढू नका. 27 व 28 रोजी विवाहाबाबतची विचार पक्के केल्यास तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे जोडीदार मिळेल. कुटुंबात पतीपत्नीमधील वाद किंवा गैरसमजूत संपेल व एकोपा होईल. पतीराज पत्नीबरोबर अतिशय प्रेमाने वागतील. 29 व ३० हे दोन दिवस मात्र इतर नातेवाईकांच्या विषयावरून काही प्रमाणात वैचारिक वाद होतील. तरी सावधानता बाळगल्यास आनंदानर विरजण पडणार नाही.
सिंह :–27 व 28 रोजी आपण अतिशय सुखात आहोत अशी भावना निर्माण होऊ मनाला खूप आनंद मिळेल. आईस्क्रिम, कोल्ड्रिंक्स च्या विक्रेत्यांना मोठा लाभ होईल. नव्याने सुरू केलेल्या दुकानातूनही चांगला लाभ होईल. 1 व 2 रोजी तुम्हाला संमिश्र अनुभव येणार आहे. सरकारी कामातून फायदा होईल. तसेच जर एखाद्या व्यवसायासाठी सरकारी परवानगी मागत असाल तर त्याची तयारी या दोन दिवसात केल्यास काम चांगले मार्गस्थ होईल. 29, 30 व 31 हे या तीनही दिवसात प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. दवाखान्यात अँडमिट असलेल्यांना श्री दत्त गुरूंच्या कृपेने आराम पडू लागेल.
कन्या :–27 व 28 रोजी सौंदर्यप्रसाधनाच्या, सुगंधी द्रव्याच्या तसेच पेंटींग्ज च्या उद्धोगातून लोकांबरोबर चांगला संपर्क वाढेल. डेकोरेशनच्या साहित्यातून, रंगित पडदे इत्यादींच्या उद्धोगातून चांगली प्राप्ती होईल. घरगुती पार्लरचा व्यवसायही चांगला लाभ देईल. 29, 30 व 31 या तीन दिवसात संसाराची आवड असणार्या महिलांना खूप दिवसापासूनची घरातील मोठ्या वस्तुंची खरेदी करता येणार आहे. स्वयंपाकाची आवड असणार्यांना एखाद्या सपरधेमधे भाग घेता येईल व तेथे तुम्हाला नंबरही पटकावत येणार आहे. घरातील वातावरण आनंददायी राहील. तरूण वर्ग आईबरोबरील गप्पांमध्ये रंगून जाईल.
तूळ :–27 व 28 रोजी तुम्हाला तुमच्या महत्वाकांक्षेत वाढ झाल्याचे जाणवेल. च्याचा व्यवसाय आहे त्याना उगीचच आयुष्याची चिंता सतावेल. सध्या तुम्हाला दिवस चांगले आहेत तरी उगीचच काळजी करू नका. जे काम जसे चालले आहे तसेच सुरू राहील. 29.,30,, व 31 या तीन दिवसात कामातील मेहनतीत वाढ होईल. लोकांना दिलेल्या उधारी कडे लक्ष दिल्यास या सप्ताहातच पैसे मिळून जातील. फक्त या तीन दिवसात नवीन खरेदी करू नका व व्यवसायात नवीन मालही भरू नका. त्यासाठी 1 व 2 या तारखा एकदम चांगल्या आहेत. या दोन दिवसात दुपटीने फायदा होईल. विवाह विषयीचे बोलणे चांगले होईल.
वृश्र्चिक :–हा सप्ताह कांहीसा मानसिक त्रासाचा जाणार आहे. त्यामुळे कोणतीही मोठी अपेक्षा ठेवू नका. म्हणजे मनाला त्रास होणार नाही.27. व 28 रोजी व्यवसायातील प्रलंबित येणी वसूल करण्यासाठी त्यांना आठवण करा किंवा माणूस पाठवल्यास काम सोपे होईल. 29 , 30, व 31 रोजी प्रत्येक कामात नियोजनाची कशी गरज असते याचा अनुभव येईल. नियोजन करताना पूर्ण नियोजन तुमच्याच विचाराने करा. 1. व 2.रोजी कामातील खाचाखोचांवर एखाद्या बुजूर्गांचे मार्गदर्शन मिळेल. तरी त्या संधीचा फायदा घ्या.
धनु :–27 व 28 रोजी तुम्हाला ज्यामधे गुंतवणूक करावयाची आहे त्या व्यवसायाचा प्रथम अभ्यास करा. बाजारातील त्याची कींमत काय आहे ते पडता ऊन बघा. तरीही घाई करू नका. 29.,30.व 31 या तीन दिवसात नोकरीत त्याच त्याच प्रकारचे काम करण्यामुळे कामातील आनंद कमी होईल. तरी वरिष्ठांना कामातील बदलाबाबत विनंती करावी. 1 व 2 रोजी मात्र तु ्हाला समाधान वाटणार्या घटना घडणार आहेत. कलाकार मंडळीना 29, 30, व 31 रोची कलेचा सन्मान होईल व जूने अजूनपर्यंत न आलेले मानधन मिळेल.
मकर :–27.व 28 रोजी बर्याच दिवसापासून ज्या गोष्टीची वाट पहात आहात ती घटना घडण्याचे मार्ग ओपन होतील. तुमच्यातील व्यवहार कुशलतेने पत्नीकडून कौतुक होईल. सर्व कुटुंबिय तुमच्याकडे आदराने पाहतील. 29 रोजी आर्थिक नुकसान होणार आहे तरी व्यवहार सावधपणाने करावेत. मासिक पाळीचा त्रास असलेल्या स्त्रीयांना 30 .व 31 रोजी फारच त्रास होईल. मनाचा कमकुवतपणा वाढेल. पण आरोग्याची कोणतीही तक्रार निघणार. 1.व 2.जानेवारी ही तुमच्या कामात स्पीड घेणारी तारीख ठरेल. कांहीही विचार करावयाची गरज नाही. 2 जानेवारीला मनासारखे घडेल.
कुंभ :–27 व 28 रोजी वृद्धाश्रमाशी संबंधित व्यवहारांतून दुसर्या ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील व्यवसायाची माहिती मिळेल. फायद्याच्या मोहाने हुरळून जाऊ नका. घरातील नात्यातील मेंबर्स नवीन व्यवसायाबाबत खूप आग्रही राहतील. पण सध्या एकदम व्यवसाय बदलाचा विचार करू नका. 29.,30 व 31 या तीन दिवसासाठी आईकडील नात्यासाठी गावाला जावे लागेल. औषधाच्या व्यापार्याना अचानक मोठा लाभ होईल. संख्याशास्त्राच्या अभ्यासकांना आपल्या बौद्धीक आवाक्याचा अंदाज येईल. कुटुंबातील अडचणीवर एखादे चर्चासत्र घडेल पण निर्णय निघणार नाही. 1 व 2 रोजी सामाजिक कार्यात भाग घ्याल व तुमच्या विषयी समाजाकडून कौतुकाचे शब्द निघतील.
मीन :–27 व 28 रोजी गायक व वादक मंडळीना खूप मानाचे स्थान मिळेल. विद्यार्थ्यांना अवघड विषयासाठी मनापासून शिकवणारे शिक्षक मिळतील. 29, 30.व 31 रोजी कुटुंबात आनंदात बातमी कळल्यामुळे आनंदोत्सव होईल. घरात गोड सुग्रास अन्नाचा चा बेत जमेल. नुकत्याच नव्याने झालेल्या ओळखीतून फार दिवसापासून अडलेल्या कामाबाबत मार्गदर्शन मिळेल. कुटुंबात पाहुण्यांचे आगमन होईल. 1 व 2 रोजी व्यवहारी कामात आर्थिक बाबींची गल्लत करू नका त्रासदायक ठरेल
||.शुभं-भवतु.|| .
Dhanyawad Tai