Read In
शनिवार 26 डिसेंबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
शनिवार 26 डिसेंबर 2020 चंद्ररास मेष 17:17 पर्यंत नंतर वृषभ. चंद्रनक्षत्र भरणी 10:34 पर्यंत व नंतर कृतिका. वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–पित्तप्रकृती च्या व्यक्तीनी आज जेवणात, इतर खाण्यात काळजी घ्यावी.. पित्ताचा जोर वाढून त्रास होईल. राग येणे, चिडचीड होणे अशा प्रकारचा त्रास होइल तरी त्याला आवर घालणे पण तुमच्याच हातात आहे.
वृषभ :–आळशवाणे वाटणे, कंटाळा येणे अशा प्रकारांनी आजचा दिवस सुरू होणार आहे. कामासंबंधित ज्या भेटी ठरलेल्या नाहीत त्याचे अचानक नियोजन करू नये. कुटुंबात जोडीदाराकडून कामात चांगली साथ मिळेल.
मिथुन :–तुमचा कोणत्याही प्रकारचा व्यवसाय असो त्या तुम्हाला मित्रांची साथ लाभणार आहे. आजचा दिवस सर्वच क्षेत्रात भरभराट करणारा असल्याने ज्या गोष्टी करायच्या आहेत त्यांची सुरूवात करायला लागा.
कर्क :–संततीला पोटदुखीचा त्रास होईल. वयात आलेल्या मुलीं पोटदुखीच्या त्रासाने हैराण होतील. नोकरीतील अवघड व अडकलेल्या कामातून चतुराईने मार्ग काढाल. तरूणांना अती झोपेचा त्रास होईल. दिवस सगळा पेंगत जाईल.
सिंह :–जेथे शक्ती प्रदर्शन करावयाचे आहे तेथे आज तुमचीच बाजू वरचढ राहील. ज्येष्ठांनी आपण कोणते आश्र्वासन दिले आहे याची आठवण ठेवून ते पाळण्याला महत्व द्यावे. समोरील व्यक्तीची कामातील दिरंगाई बघून मानसिक त्रास होईल.
कन्या :–महिलांना आपली इच्छापूर्ती होत असल्याचे जाणवेल. ज्येष्ठ नागरिकांना समाजसेवा करताना आपली धनदौलत लुटून द्यावी असे विचार मनात येतील व प्रत्यक्षातही कांही प्रमाणात का होईना आपले धन समाजासाठी खर्च करतील.
तूळ :–सरकारी नोकरदारांना शासनाकडून एखादा पुरस्कार मिळेल किंवा केलेल्या कामाचे विशेष कौतुक होईल. सामाजिक कार्य करणार्यांना सरकारी पुरस्कार मिळेल. सरकारी योजना राबवताना दमछाक होणार आहे.
वृश्र्चिक :– आजचा दिवस चैनीत, मौजमजा करण्यात जाणार आहे. नोकरीत किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात त्रास देणार्या व्यक्तींच्या वृत्तीत अचानक बदल होईल. कलाकार मंडळींना मित्रमंडळींकडून सुखद अनुभव येईल.
धनु :–कुटुंबात आर्थिक अडचणींवर चर्चा होईल. ज्येष्ठ बंधु वरील आलेल्या संकटातून मार्ग काढण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यावर भर राहील. राजकीयदृष्टय़ा महत्वाच्या चर्चा करण्यासाठी आरास करावा लागेल.
मकर :–नोकरीतील तुमच्या अधिकारांवर गंडांतर येऊन कांही प्रमाणात अधिकार कमी केले जातील. कोणताही अतिरेकी विरोध करू नका. कांही दिवसांनी सर्व सुरळीत पुन्हा सुरू होईल.
कुंभ :–मनातील सुप्त भावनांचा उद्रेक होईल. तरी भाव भावनाना जरा आवर घालणे महत्वाचे राहील. तरूण मुलांना राग अनावर होऊन मोठ्यांबरोबर चुकीचे वागतील. दुसर्याच्या अडचणीच्या प्रसंगात धाडसाने वागाल व मदत कराल.
मीन :–सरकारी कामातून त्रास निर्माण होईल. जी कामे वेळेवर झालेली नाहीत त्यांकरीताचा दंडभरावा लागेल. शासनाची एखादी चालू असलेली योजना बंद करण्याबाबत तुम्हाला तगादा लागेल. कोणत्याही कामाचा अट्टाहास करू नका.
|| शुभं-भवतु ||
Thank you Tai