Read In
शुक्रवार 25 डिसेंबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
शुक्रवार 25 डिसेंबर 2020 आज चंद्ररास मेष दिवसरात्र, व चंद्रनक्षत्र अश्र्विनी 07:35 पर्यंत व नंतर भरणी. आज मोक्षदा एकादशी आहे. तसेच आज नाताळ आहे. वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–स्त्रीयांना सासरच्या ज्येष्ठांकडून मानाचे उंची वस्त्र मिळेल व तुमच्या गुणांचे कौतुक होईल. पूर्वी बुक केलेल्या घराचे आता पझेशन मिळण्यातील अडचणी दूर होत असल्याचे लक्षात येईल. बँकेच्या हप्त्याचे मानसिक प्रेशर येईल.
वृषभ :–आजारी असलेल्यांनी आपण एकदम बरे आहोत असा आव आणू ननय व खोटी फुशारकी मारू नये.. वयस्कर मंडळीनी आरोग्याची तपासणी योग्य वेळेत करून घ्यावी. स्कीनचा त्रास असलेल्यांनी दुर्लक्ष करू नका
मिथुन :–तरूणांनी कामाच्या घाईगडबडीत प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. विशेषतः लहान मुलांच्या डोक्याला किंवा नाकाला दुखापत होण्याची शक्यता आहे तरी काळजी घ्यावी. आईच्या नात्यातील ज्येष्ठ व्यक्तीची तब्बेत बिघडेल.
कर्क :–सुख म्हणजे काय असते ते तुम्हाला आज कळणार आहे. मनातील सूप्त इच्छा, आकांक्षांची पूर्ती होणार असल्याचे जाणवेल. महत्वाच्या कामासाठी तज्ञांचा सल्ला घेतलात तर भरभरून यश मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे व उत्साहाचे राहील.
सिंह :–कुटुंबातील पुरूष मंडळीना वडीलांकडील ज्येष्ठांची काळजी वाढवणार्या घटना घडतील. विवाहेच्छूना आपल्या अपेक्षेप्रमाणे जोडीदाराची निवड करता येणार आहे. नोकरीतील अधिकारांवर अचानक मर्यादा घालण्यात येथील.
कन्या :–किरकोळ व रिटेल कपड्याच्या विक्रेत्यांना चांगला भरभरून फायदा होणार आहे. तरी अजू थोडीफार गुंतवणूक करून व्यवसाय कसा वाढवता येईल ते पहावे. शेअर मार्केटमध्ये किंवा पैसे डबल करण्याच्या कोणत्याही स्कीममधे पैसे गुंतवू नयेत.
तूळ :–विवाहेच्छूंनी पूर्ण माहिती न घेता घाई करू नये. वृद्धांच्या पायाला दुखापत कींवा ईतर कांही त्रास होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस चैनीत आणि एकदम आरामात घालवण्याची इच्छा होईल.
वृश्र्चिक :– दुसर्यांच्या सांगण्यावरून आपले मत बनवू नये. चांगल्या व प्रामाणिक मित्राविषयी मत कलुषित होतील. नोकरीत हातात असलेले कोणतेही काम आंधळेपणाने कोणाकडेही सोपवू नका. कुटुंबात एखादा दुखद प्रसंगाचा त्रास होईल.
धनु :–नोकरीत अधिकारात झालेल्या बदलाचा सदुपयोग कराल. तसेच राजकीयदृष्ट्या तुमच्यावर नवीन अधिकार व जबाबदार्या टाकल्या जातील. नोकरीतील कामाचा आवाका आवरणार नाही व ताणतणार वाढेल. नवीन वाहन खरेदीचे विचार कराल.
मकर :–प्रथम तब्बेतीची काळजी घ्यावी व नंतरच सर्व गोष्टी कराव्यात. कवी, लेखक याना समाजासमोर आपली कला सादर करण्याची संधी मिळेल. कुटुंबात व्यक्ती व्यक्तीत वादाचे मुद्धे वाढून वैचारिक संघर्षाला तोंड फुटेल.
कुंभ :–गुडघे दुखीच्या तरूणांना हाडे झिजण्याचा त्रास सहन करावा लागेल. पण त्यासाठी घरगुती उपाय न करता. आर्थोपेडीक तज्ञांचा सल्ला घ्यावा. महिलांना नव्याने शिकलेल्या विषयावर चांगले प्रभुत्व मिळाल्याने कौतुक होईल.
मीन :–मनातील सूप्त विचार बोलण्याची हीच वेळ योग्य असल्याचे जाणवेल. हातातील कामात संथपणा येणार आहे. मुलांना अभ्यासाची गोडी लागण्यासाठी पालकांना विविध प्रयत्न करावे लागतील. पूर्वनियोजित कामात व मिटींग्ज च्या वेळात बदल होईल.
|| शुभं-भवतु ||
Thank you Tai