daily horoscope

दैनिक राशीभविष्य गुरूवार 24 डिसेंबर 2020

Read In

 

गुरूवार 24 डिसेंबर 2020 चे दैनिक राशीभविष्य

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.

daily horoscope

गुरूवार 24 डिसेंबर आज चंद्ररास मेष  दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अश्र्विनी अहोरात्र. आज मंगळाचा मेष राशीत 10:19  ला प्रवेश करत आहे. वरील दोन्ही राशी व  नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–कालपर्यंत मोठमोठ्या घेतलेल्या निर्णयात अचानक बदल करावासा करावा लागेल. अचानक प्रकृती बिघडेल व फ्रेश वाटणार नाही. जूने देणे किंवा बँकेचा थटलेला हप्ता कोणत्याही परिस्थितीत द्यावा लागेल. डाँक्टर  मंडळीनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी.

 वृषभ :–आज अचानक ध्यानी मनी नसलेला मोठा खर्च निघेल व तो कोणत्याही परिस्थितीत करावाच लागेल.काका, आत्या यांच्या कडून रोष सहन करावा लागेल. आपले काय चुकले याचा विचार करा व व परत अशी चूक होणार नाही याची दक्षता घ्या.

मिथुन :–तरूणांना वडील भावंडाकडून समज मिळेल. नोकरीत उच्च पदाची अपेक्षा करणार्‍यांना आपला मार्ग मोकळा होत असल्याचे जाणवेल. हातात घेतलेल्या प्रोजेक्टमधे काहीतरी गडबड असल्याचे जाणवेल. लँब टेक्निशीयन्सना जीवीवर बेतण्याचा प्रसंग येईल..

कर्क :–आज व्यवसायातून धन प्राप्ती चांगली होत असल्याचे जाणवेल. संधीवाताचा त्रास असणार्‍यांना मांडला व गुडघेदुखीचा त्रास सुरू होईल. महिलांना सासुबाईना घेन लहानसा प्रवास करावा लागेल. वैद्धबुवांच्या औषधाचा चांगला गुण येऊ लागेल.

सिंह :–आज ध्यानी मनी नसताना अचानक सत्संगाचा लाभ मिळेल. नेहमी सत्संगाला जाणार्यांना आत्मानुभूतीचा  अुभव येईल. आज तुम्ही जे काम कराल त्यात चांगले यश मिळणार आहे. वृद्धमंडळी नई लहान मोठा कोणताच प्रवास करू नये त्रास होणार आहे. 

कन्या :–गर्भवती स्त्रीयांनी आज विशेष काळजी घ्यावी. वडिलांच्या किडनीचा त्रास वाढणार आहे तरी वेळीच जागे व्हा. पुढे घडणार्‍या गोष्टींची चिंता करत बसण्यापेक्षा आत्ता समोर आलेल्या घटनेचा स्विकार करा. प्रथम संततीच्या आरोग्याची चिंता वाढेल. 

तुळ :–विवाहेच्छूंनी  जोडीदार निवडताना रंगरूप ऐवजी स्वभाव व  वैचारिक पात्रतेला महत्व द्यावे. आई वडीलांनी आपली मुले मोबाईलचा उपयोग कशा प्रकारे करत आहेत यावर लक्ष ठेवावे व त्याना समजावून सांगावे. नुकतीच हरवलेली वस्तु घराच्या पश्चिम दिशेला सापडेल. 

वृश्र्चिक :–गावाला जात असाल तर कितीही विश्र्वास असले तरी किल्ल्या  कोणाकडेही सोपवू नयेत. हा संपूर्ण आठवडा कांही ना कांही वस्तु हरवणे कींवा चोरीला जाणे अशा घटना घडतील. पती पत्नीमधे कांहीही कारण नसताना कलह होईल. 

धनु :–खाजगी नोकरीतील अधिकारी वर्गाकडून कामातील क्लीष्ट प्रश्न सुटेल व कौतुक होईल. वरिष्ठांकडून एखाद्या कार्यशाळेचे नियोजन होईल व त्याची जबाबदारी तुमच्यावर राहील. राजकीयदृष्टय़ा आज तुमच्या अधिकारात कांही प्रमाणात वाढीव बदल होईल. 

मकर :–लेखकांना आपल्या लेखांसाठी प्रकाशकांची सोय होईल. आईकडून तरूण मुलांना मोलाचा संदेश मिळेल. सर्दी कफ असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी. कोरोनाच्या या कालावधीत तब्बेतीकडे जराही दुर्लक्ष करू नये. 

कुंभ :–संधीवाताचा त्रास असलेल्यांना हात व खांदे दुखण्याचा त्रास जास्त वाढेल. नवीन डाँक्टरांकडे न जाता पूर्वीच्याच डाँक्टरांकडे जावे. वैवाहिक जीवनातील अडचणी सोडवण्यासाठी समुपदेशकाची गरज जाणवेल व ती घेण्यासाठी अवघड वाटुन घेऊ नये. 

मीन :–घाईघाईने व अविचाराने घेतलेला निर्णय त्रासदायक व नुकसानीचा ठरेल. काका किंवा आत्या यांच्यासाठी दवाखान्यात जावे लागेल. आज दुपारी 03:30  नंतर डोकेदुखीचा त्रास जाणवेल. सर्वच प्रश्र्न शांततेने घ्यावेत. 

.                               || शुभं-भवतु ||

 

One thought on “दैनिक राशीभविष्य गुरूवार 24 डिसेंबर 2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *