Read In
बुधवार 23 डिसेंबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
बुधवार 23 डिसेंबर 2020 आज चंद्ररास मीन 28:32 पर्यंत व नंतर मेष. चंद्र नक्षत्र रेवती 28:32 व नंतर अश्र्विनी अहोरात्र. वरील दोन्ही राशींचा नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–अचानक आज खर्चाचे प्रमाण खूपच वाढणार आहे. विचार न करता खरेदी कराल व नंतर पश्चाताप कराल. व्यवसायात तुमच्या आजच्या बोलण्याने समोरील व्यक्ती दुखावली जाईल. आज रागाचे प्रमाण वाढेल तरी शांतपणे घ्या.
वृषभ :–डोळ्यांची काळजी घ्यावी लागणार आहे. रेल्वेतून प्रवास करणार्या प्रवाशांनी रेल्वेच्या दारात उभे राहू नका. बाहेरून एखाद्या वस्तूच्या मारामुळे डोळ्याला दुखापत होऊ शकते. हितचिंतकांकडून अडलेल्या मोठ्या घटनेवर उपदेश मिळेल. व त्याचा उपयोगही होणार आहे.
वृषभ :–बर्याच वर्षानंतर जूने मित्र भेटतील व मित्रांच्या गराड्यात स्वतःच हरवून झाल. विवाहेच्छू तरूणांना मनातील ईच्छा पूर्ण करणारी घटना घडेल. मोठ्या कुटुंबात एखाद्या विषयावर चर्चा होईल पण त्यावर एकमत न झाल्याने प्रश्र्न तसाच राहून जाईल.
मिथुन :–स्वभावातील लहरीपणा वाढेल. लहान मुलांच्या बाबतीत तर फारच वाढेल ही परिस्थिती अशीच शुक्रवारपर्यंत राहणार आहे. घर विक्रीला काढले असल्यास आज व उद्या जे चौकशी करतील त्यांच्याबरोबर व्यवहार जमणार नाही. तरी घाई करू नये व तडजोड ही करू नये.
कर्क :–व्यवसायातील व्यवहारात सारखे बदलते विचार करू नका. मित्रमंडळींच्या नादाने हाती घेतलेल्या कामात नवनवीन प्रयोग करण्याची संधी मिळेल. गेल्या आठवड्यापासून सारखे मनात येणार्या विचारांचे काहूर सत्यात येत असल्याचे जाणवेल. लहानशा कामासाठी मोठी दगदग करावी लागेल.
सिंह :– सरकारी कामातून फायदा होईल या विचाराने सुरू केलेल्या कामातून फायदा होत असल्याचे जाणवेल. कुटुंबातील वृद्धांची सेवा करण्याची संधी मिळेल तरी ती सोडू नका. विवाहित महिलांनी कुटुंबाकरता घेतलेले कष्ट कारणी लागल्याचे दिसेल व सर्वांकडून कौतुक होईल.
कन्या :– खाजगी नोकरी करणार्यांना अचानक पहिली नोकरी बदलण्याची गरज भासेल. गुंतवणूकीचा आज विचारही करू नका. नुकसान होण्याचीच शक्यता जास्त आहे. सुग्रास भोजनाचा लाभ होईल. महिलांना आवडत्या वस्तूंची खरेदी करता येणार आहे.
तूळ :–आरोग्याच्या बाबतीत आता फार वेळ त्रास सहन करावा लागणार नाही. चांगला उतार पडू लागेल. व्यावसायिकांना अनपेक्षित मोठा लाभ होईल. शेअर मार्केट मधील गुंतवणूक लाभदायक राहील तरीही तज्ञांचा सल्ला घ्या. वयस्कर मंडळीना झोप न लागण्याचा त्रास होईल.
वृश्र्चिक :–कुटुंबातील ज्येष्ठांना मानसिक त्रास होईल. वृद्धाश्रमाशी संबंधित असलेल्यांना नवनवीन योजनांचा शुभारंभ कराल. विद्यार्थ्यांन अती संगणकाच्या आहारी जाऊ नये. व्यसनी मंडळींचा मनावर संयम राहणार नाही. कशाचाही अतिरेक करू नका.
धनु :–सगळ्यात प्रभूत्व मिळवण्याच्या नादात विद्यार्थी स्वतःला अति अभ्यासात बुडवून घेतील. लहान मुलांच्या हातात टोकदार वस्तु देऊ नका. तरूणांचा लहरीपणा वाढेल. व्यवसायातील जूनी येणी सहजासहजी वसूल होणार आहेत. द्रव पदार्थाच्या सेवनाने उलट्या जुलाब होतील.
मकर :–राजकीय मंडळींना प्रतिस्पर्ध्यांकडून त्रास होईल व त्याचा परिणाम सामाजिक कार्यावर होईल. बहिण भावाच्या नातेसंबंधात अचानक दुरावा येत असल्याचे जाणवेल. तरी कोणताही गोष्ट अती ताणू नका. वैचारिक वाद लवकर मिटवणे हिताचे राहतील.
कुंभ :–तुमचे क्रेडीट कार्ड तसेच डेबिट कार्ड इतरांना देऊ नका. तुमच्याकडून पैसे हरवतील किंवा कोणीतरी तुमचे पैसे हँक करण्याचा धोका आहे तरी सावध रहावे. बँकेचे व्यवहार डोळसपणाने करा.
मीन :-निद्रादेवी आज तुमच्यावर फारच प्रसन्न होणार आहे.ज्यांचा या दोन दिवसात वाढदिवस आहे त्यांना गोडशी गिफ्ट मिळणार आहे. भाग्य उजळण्याची वाट बघत असाल तर त्याची चुणूक बघायला, अनुभवायला मिळेल. कुटुंबात आवडत्या व्यक्तीची भेट होईल.
|| शुभं-भवतु ||
Thank you Tai