Read In
मंगळवार 22 डिसेंबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
मंगळवार 22 डिसेंबर 2020 आज चंद्ररास मीन दिवसरात्र चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा 25:36 पर्यंत व नंतर रेवती. आज दुर्गाष्टमी आहे.वरील रास व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :– आज दुसर्यांबरोबर बोलताना नम्रतेने बोलण्याचा प्रयत्न करा. वाद निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्या. सार्वजनिक क्षेत्रातील अडचणी मांडण्यासाठी नेतृत्व कराल. कामातील अडचणींवर मात करताना घाई करून कामात गडबड कराल तरी शांततेने करा.
वृषभ :–तेलातुपाच्या विक्रेत्यांनी आर्थिक व्यवहार जपून करावेत. उधारी वसूल करण्याकरीता मागे लागावे लागेल. आज नवीन उधारी करू नका. नोकरीत कर्तबगारी दाखवाल. धार्मिक प्रवृत्तीच्या तरूणांचे मित्रमंडळींकडून कौतुक होईल.
मिथुन :–व्यवहार कुशलतेमुळे अवघड व्यवहार पण सहजपणे करून दाखवाल. वयस्कर मंडळीना अचानक पोटदुखीचा त्रास जाणवेल. शांततेने प्रश्र्न सोडवण्याकडे कल राहील. धान्याच्या किरकोळ विक्रेत्यांच्या व्यवसायातील उधारी वसूल होईल.
कर्क :–सध्याच्या हवामानामुळे थंडीचा व सर्दीचा त्रास जाणवेल. उच्च अधिकार असलेल्यांनी आपल्या कामात उतावीळपणा करू नये पूर्ण विचारानेच निर्णय घ्यावेत. दलाल, फिरते एजंट यांना चांगला भला मोठा आर्थिक लाभ होईल.
सिंह :–विमा कंपनी किंवा बँकेमधे नोकरी करणार्यांना एखाद्या गुंतागुंतीच्या प्रकरणात लक्ष घालावे लागेल. हस्ताक्षर सुंदर असलेल्यां विद्यार्थ्यांना स्वकमाईचे महत्व कळेल. नोकरीत आजपर्यंत केलेल्या कामाची दखल घेतली जाईल.
कन्या :–लहान मुलामुलींना नवीन वस्तूची भेट मिळेल. गणित शाखेच्या विद्यार्थांना अवघड गणिते येऊ लागल्याने सर्वांकडून कौतुक होईल. तरूणांना मनातील ईच्छा पूर्ण करण्याचे मार्ग सुचतील. घर बांधणार्यांना अचानक अडचणी आ सामोरे जावे लागेल.
तूळ :–मूत्रपिंडाचा त्रास असलेल्यांनी आवश्यक त्या चाचण्या करून घ्याव्यात. सर्वांबरोबर मिळून मिसळून वागण्याच्या वृत्तीमुळे तुमच्या विषयी कोणाचीही तक्रार सगळ्याचे समजून येईल. सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न कराल
वृश्र्चिक :–आज अचानक एकटेपणा सोडून द्यावा असे वाटून इतरांमधे मिसळण्याचा प्रयत्न कराल. व्यवसायातील प्रलंबित देण्या घेण्याचे व्यवहार मोकळेपणाने बोलून सोडवण्याचा प्रयत्न कराल. ज्येष्ठांच्या विचाराने निर्णय घेतलात तरपुढे त्रास होणार नाही.
धनु :–काम्पुटरचे शिक्षण घेणार्यांना कामाचा आवाका आवरत नसल्याचे जाणवेल. तरूणांचे आईवडीलां बरोबरील गैरसमजूती दूर होऊन चांगले नाते दृढ होत असल्याचे जाणवेल. महत्वाच्या कामासाठी जिल्ह्याबाहेर लहानशा प्रवास करावा लागेल.
मकर :–कोणत्याच कामात घाईगडबड करू नका. विशेषतः वयस्कर मंडळींना पाय घसरण्यामुळे पायाला दुखापत होण्याचा धोका आहे. नवविवाहितांनी एकमेकाला समजून घेण्यात योग्य वेळ दिल्यास गैरसमजाला जागाच राहणार नाही.
कुंभ :–रेल्वे, प्रवासी संस्था येथील कर्मचार्यांना अचानक अडचणीला तोंड द्यावे लागेल. तरूणांच्या मनात धार्मिक विचारांचे काहूर माजेल. नक्की काय करावे हे सुचणार नाही तरी आजचा दिवस अगदी गप्प बसा.
मीन :–बर्याच दिवसानंतर मोकळा वेळ मिळाल्याने आवडत्या गोष्टीतून आनंद घ्याल. कोणत्याही विषयावर विश्र्वास ठेवण्यापूर्वी बातमीतील खरेखोटेपणा तपासून घ्या. नोकरदार वर्गाने आज आपण व आपले काम एवढ्या पुरताच विचार करावा.
|| शुभं-भवतु ||
Dhanyawad Tai