Read In
सोमवार 21 डिसेंबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
सोमवार 21 डिसेंबर आज चंद्ररास कुंभ 16:28 पर्यंत व नंतर मीन. चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा 23:02 पर्यंत व नंतर उत्तरा भाद्रपदा. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :– मित्रमंडळींच्या सहकार्याने अवघडातल्या अवघड कामाना सुरूवात कराल. मागे पडलेले प्रश्न पुन्हा ऐरणीवर येथील. पायाला झालेली दुखापत पुढे मोठे रूप घेईल या विचाराने आत्ताच पूर्ण ट्रिटमेंट करा. मुलांच्या विचारांना किंमत द्या.
वृषभ :–फार पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून आत्ता भरपूर लाभ होणार आहे. व्यावसायिकांनी सध्याचा बाजाराचा ट्रेंड पहावा व पुढील निर्णय घ्यावेत. कुशाग्र बुद्धीने वस्तुस्थितीचे भान ठेवल्यास आजचा दिवस नक्कीच वाया जाणार नाही.
मिथुन:–लहान मुलांच्या हाताला दुखापत होण्यात धोका आहे. शाळकरी मुलांच्या सवयी व वागण्यावर विचार करून शिस्त लावावी लागेल. प्रेम विवाहाच्या बाबतीत बेजबाबदारपणे वागल्यास त्रास सोसावा लागेल व नाते संबंध बिघडतील.
कर्क :–तरूणांच्या मनाला लागतील अशा गोष्टी ज्येष्ठ व्यक्तींकडून घडणार आहेत. महिलांच्या बाबतीत सर्व चुका त्यांच्याच डोक्यावर मारल्या जातील. विद्यार्थ्यांनी आपले हित कशात आहे हे ओळखून वागावे. मनात राग ठेवू नये.
सिंह :–आईकडील नात्यातील सदस्यांची घरी वरादळ राहील. ज्येष्ठांना त्याच्या अनुभवावर आधारित माहिती देण्याचे काम सोपवले जाईल. आज तुमची मानसिकता इतकी खंबिर असेल की कोणत्याही संकटावर मात कराल.
कन्या:–लहान भावाच्या वैवाहिक जीवनाविषयीची चिंता वाढेल. महत्वाच्या कामाकरता अचानक प्रवास करावा लागेल. सरकारी कामाबाबत बेफिकीर राहू नका. ओळखीच्या लोकांकडून गैरसमजूतीने तुमच्यावर आरोपपत्र दाखल होईल.
तूळ :– सहजीवनाचा आनंद उपभोगाल. शारिरीक कष्ट आज वाढणार आहेत. नोकरीतील वरीष्ठांवरील विश्र्वास डळमळीत होईल. खाजगी कर्मचार्यांना सध्यातरी नोकरीची खात्री राहणार नाही. मोठ्या संकटातून सहीसलामत बाहेर पडाल.
वृश्र्चिक :–संशोधनाच्या कार्यातील व्यक्तींना कामाचा आवाका समजून येईल. व कामाविषयीची आस्था वाढेल. कालपर्यंत घट्ट मैत्रीचे नाते असलेले मित्रमैत्रीणीं आज अचानक तुमच्या विरोधात उभे राहतील. चुलत घराण्याबरोबर एकोपा निर्माण होईल.
धनु :–ट्रेनिंग सेंटरला नव्याने भरती झालेले ट्रेनीना विषयाचा अंदाज न आल्याने अभ्यास तसेच ट्रेनिंग नकोसे वाटेल. वृद्धांना प्रत्येक क्षण तासाप्रमाणे वाटेल. मनातील नकारात्मक विचार कमी करण्यासाठी मुद्धमहून प्रयत्न करावे लागतील.
मकर :–आपल्यापेक्षा मोठ्यांबरोबर वडीलकीच्या नात्याने पहावे लागेल. नोकरीत जून्या सहकार्यांची भेट होईल व मनाचा बांध फुटेल. महिलांना आपले वजन आवाक्यात आणण्यासाठी फारच प्रयत्न करावे लागतील. अपत्य प्राप्तीच्या इच्छूकांनी आपले निर्णय पक्के ठेवावेत.
कुंभ :–विवाहेच्छू प्रौढ मुलामुलीसाठी त्यांचे प्रबोधन करणारे विचार त्याच्यासमोर मांडावे लागतील. आईच्या विचारांना महत्व द्या. व्यायाम करणार्या व शिकवणार्या गुरूजींना व्यायामाचे महत्व पटवण्यासाठी अचानक फार मोठ्या दिव्यातून जावे लागेल.
मीन :–लहान मुलांना उपदेशाची गरज निर्माण होईल. विद्यार्थ्यांना आपल्या प्रगतीसाठी खूप मेहनत करावी लागणार आहे. वडीलांच्या बाबतीतील व्यवहारांची जबाबदारी आनंदाने स्विकारल्यास त्यांना दिलासा मिळेल. आँन लाईन कोचिंग क्लासच्या विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घ्याव्या लागतील.
|| शुभं-भवतु ||
Thank you Tai