Read In
साप्ताहिक भविष्य
साप्ताहीक भविष्य रविवार 20 डिसेंबर ते शनिवार 26 डिसेंबर 2020
साप्ताहिक भविष्य कृष्णमूर्ती पद्धती नक्षत्रीय फलादेश.
रविवार 20 चंद्ररास कुंभ दिवसरात्र, चंद्रनक्षत्र शततारका 21:00 पर्यंत. सोमवार 21 चंद्ररास कुंभ 16:28 पर्यंत नंतर मीन व चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा 23:02 पर्यंत नंतर उत्तरा भाद्रपदा. मंगळवार 22 चंद्ररास मीन दिवसरात्र, चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा 25:36 पर्यंत व नंतर रेवती. बुधवार 23 चंद्ररास मीन 28:32 पर्यंत व नंतर मेष, चंद्रनक्षत्र रेवती 28:32 पर्यंत. गुरूवार 24 चंद्ररास मेष दिवसरात्र, चंद्रनक्षत्र अश्र्विनी अहोरात्र. शुक्रवार 25 चंद्ररास मेष दिवसरात्र, चंद्रनक्षत्र अश्र्विनी 07:35 पर्यंत नंतर भरणी. शनिवार चंद्ररास मेष 17:17 पर्यंत व नंतर वृषभ, चंद्र नक्षत्र भरणी 10:34 पर्यंत व नंतर कृतिका.
20 रविवार रोजी मार्तंडभैरवोत्थापन व चंपाषष्ठी आहे. 24 गुरूवार रोजी मंगळाचा मेष राशीत प्रवेश 10:19. सोमवार 25 रोजी गीता जयंती, ख्रिसमस नाताळ, व मोक्षदा एकादशी.
वरीस प्रत्येक दिवसाच्या राशी नक्षत्रांचा विचार करून व रोजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष:–24, 25 व 26 रोजी तुम्हाला तुमच्या मनासारख्या गोष्टी करता येणार आहेत. सध्या हातात असलेले प्रोजेक्ट्स पूर्ण करण्यात येणारे तुमचे एफर्टस नावाजण्यासारखे राहतील. 24 व 25 विशेषतः तुमच्या कल्पकबुद्धीला वाव देणारा ठरेल. 20 व 21 रोजी मित्रपरिवाराकडून तुमच्या व्यवसायास आर्थिक मदत होणार आहे. बँक कर्ज प्रकरणास तुमचे मित्र जराही तक्रार न करता जामिन राहतील. 22 व 23 तुमच्या आईची कांही अडलेली कामे असल्यास ती तुमच्या मदतीने मार्गी लागतील. तुमच्या वडीलांना त्यांच्या आईचे प्रेम मिळेल.
वृषभ :–20. व 21 रोजी लहान भावाची काळजी घ्यावी लागेल. त्याला आर्थिक मदतही करावी लागेल. वडीलांचे बर्याच दिवसापासून रेंगाळलेले पैसे मिळण्याचे संकेत मिळतील. निवृत्त असल्यास त्यांना तुमच्या मदतीची गरज भासेल. 22. व 23 रोजी संततीच्या आजारपणाची चिंता वाढवेल. वयस्कर मंडळींना गुडघेदुखीचा त्रास होईल. 24.,25.व 26 रोजी तुमच्या प्रतिकार शक्तिविषयी चिंता करावी लागणार आहे. सध्याच्या या कोरोनाच्या दिवसात जराही हलगर्जीपणा करू नका.
मिथुन :–20 व 21 रोजी नोकरदारांना अचानक बदलीच्या जागी जावे लागेल असे वातावरण तयार होईल. अधिकारी वर्गास आपले अधिकार वापरण्यात अडचणी येणार आहेत. अचानक नोकरीत बदल करावा असे विचार मनात येऊ लागतील. 22 व 23 रोजी समाजातील तुमची पतप्रतिष्ठा वाढत असल्याचे जाणवेल. हाती आलेले काम नव्या उमेदीने करण्याचे ठरवाल. लहाल मुलांना आज टेरेस, सज्जा किंवा गँलरीमध्ये एकटे सोडू नका. 24.,25.,व 26. रोजी कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
कर्क :–20. व 21.रोजी गर्भवती स्त्रीयांना शारिरीक त्रास संभवतो. किडनीचा त्रास असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी. परदेशी जाऊ इच्छिणार्यांना अजूनही त्यांचे मार्ग मोकळे होणार नाहीत. 22. व 23 रोजी स्वेच्छानिवृत्ती घेऊ इच्छिणार्यांनी त्यानंतर येणार्या अडचणींचा विचार करावा. 22व.23.रोजी व्यवसायातील करण्यात येणार्या बळावरच काम करावे. अचानक होणारा हा बदल लाभदायक असणार नाही. 24.,25.व 26 रोजी वडिलांच्या स्वभावावर विचार करण्याची वेळ येईल. मोठ्या भावंडाला सतावणार्या अडचणी दूर होत असल्याचे संकेत मिळतील.
सिंह :–24 , 25. व 26 रोजी अध्यात्मिक अभ्यासकांना गुरूज्ञा पाळावी लागेल. तसेच आत्मशक्तीचा अनुभव येईल. सामाजिक स्तरावर तुम्हाला गुरूतुल्य मान मिळेल व सन्मानाने वागवले जाईल. 22व.23.रोजी संशोधन कार्यक्षेत्रात काम करणार्यांना अडचणी सहन कराव्या लागणार आहेत. बद्धकोष्ठतेचा त्रास असणार्यांनी दुर्लक्ष करू नये. अँपेडिक्सचा त्रास असलेल्यांना जास्तच त्रास सुरू होईल. 20 व 21 रोजी कोर्टामधे एखादी नुकसान भरपाईची केस सुरू असल्यास त्यात तडजोड ची भाषा सुरू होईल. आजारपणातून बरे झालेल्यांना मेडिक्लेमची भरपाई मिळेल.
कन्या:–22 व 23 रोजी मनातील इच्छा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न कराल. व्यवसायातील प्रलंबित येणी वसूल होऊ लागतील. तसेच व्यवसायातील नव्या जून्या प्रयोगावर सकारात्मक चर्चा होतील. राजकीय मंडळीना स्वतःची प्रतिष्ठा जपण्यासाठी जागरूक रहावे. खोटे आरोप येऊन अपकीर्ती होण्याचा धोका आहे. 20 व 21 रोजी कुटुंबातील वातावरण गढूळ होऊन पती-पत्नीत वाद निर्माण होण्याचे प्रसंग येऊन वैवाहिक सौख्य बिघडेल तरी काळजीपूर्वक वागावे. 24, 25 व 26 रोजी पिढीजात व्यवसायात वृद्धी करण्याचे ठरवाल व त्यासाठी नवीन योजना आखाल. आजारी वृद्धांची प्रकृती सुधारत असल्याचे संकेत मिळतील
तूळ :–20 व 21 रोजी तुमच्या हाताखाली काम करत असलेल्या कनिष्ठ कर्मचार्यांत अचानक बदल करावा लागेल. दीर्घ काळापासून आजारी असलेल्यांची प्रकृती सुधारण्याचे संकेत मिळतील. नवीव नोकरीच्या शोधात असलेल्यांनी नवीन नोकरीसाठी घाई करू नये. पूर्ण विचारानेच करावे. 22 व 23 रोजी पचनसंस्थेचा त्रास असलेल्यांनी दुर्लक्ष न करता आवश्यक ती खबरदारी घ्यावी. किडनीचा त्रास असलेल्यांनी, डायलिसीसच्या रूगणांनी बेफिकीर राहू नये. 24 , 25 व 26 रोजी आंतरजातीय विवाहाच्या बाबतीत अडचणी येतील. व्यवसायिक मंडळीनी आर्थिक उलाढाल जपून करावी. अचानक भागीदारास आर्थिक मदत करावी लागेल.
वृश्र्चिक :–24 , 25 व 26 रोजी प्रथम संततीच्या नोकरीचा प्रश्र्न सुटेल. व्यवसायातील भागीदाराच्या मताचा विचार करावा लागेल. सरकारी नियमांच्या अधिन राहूनच कामे करा अन्यथा एखाद्या कामासाठी दंड भरावा लागेल. 20 व 21 रोजी कोर्टामधे एखाद्या मित्राच्या केससाठी साक्षिदाराच्या पिंजर्यात उभे रहावे लागेल. कौटुंबिक अडचणींने खचून न जाता उपाय करावे लागतील. नुकसान झालेल्या गोष्टींवर चर्चा करत बसण्यापेक्षा पुढे काय करायचे हे ठरवावे लागेल. 22 व. 23. रोजीची सबहुतेक सर्वच कामे मनाला आनंद देतील. व्यवसायिक दृष्टीकोनातून नुकसान झालेले काम नव्याने उभे करण्याकडे कल राहील.
धनु :–20 व 21.रोजी शिक्षणाच्या बाबतीतील तुमची ओढ सर्वांना कौतुकास्पद जाणवेल. नात्यातील वीण घट्ट करण्याकरीता तुम्ही पुढे केलेल्या हातास भरभरून प्रतिसाद मिळेल. प्रवासी वाहतुक संस्था असलेल्यांच्या व्यवसायात भले मोठे नुकसान झाल्याचे जाणवेल. 22 23 रोजी तरूणांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होण्याच्या वाटेवर राहील. राजकीयदृष्टय़ा पदाधिकार्यांना आपण अडचणीत आल्याची भावना होईल. सामाजिक कामातील समस्येवर चर्चेने तोडगा निघेल. 24 , 25 व 26 रोजी महिलांशी संबंधित कार्यशाळेची जबाबदारी तुमच्यावर येईल. सामाजिक प्रश्र्नावरील चर्चेत सहभागी व्हाल
मकर :–20 व 21 रोजी आईच्या स्वतंत्र व्यवसायात लक्ष घालावे लागेल. व्यवसायातील कर्ज प्रकरण हाताळताना येण्या अडचणींवर तज्ञांच्या सल्ल्याने निर्णय घ्यावा. संततीच्या भविष्यासाठी कांही कडक निर्णय घ्यावे लागतील. 22 व 23 रोजी मनातील विचारांची गर्दी कांही सुचू देणार नाही. व्यवसायातील ताणतणाव कुटुंबातील सदस्यांवर होईल. 24, 25 व 26 रोजी गर्भवती महिलांनी शारिरीक कष्ट फार होणार नाही याची काळजी घ्यावी. संततीच्या प्रतिक्षेतील जोडप्यांनी तज्ञ डाँक्टरांचा सल्ला घ्यावा. लेखक मंडळी आपल्या कल्पनाशक्तीने वाचकांची मने जिंकतील.
कुंभ :–20 व 21.रोजी वडीलांच्या नोकरीत एखादा मानसिक त्रास देणारा प्रश्र्न निर्माण होईल. नोकरीतील अडचणींवर मात करण्याचे ठरवाल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या तरूणांना एकतर मनासारखी नोकरी मिळणार नाही किंवा मोठी तडजोड तरी करावी लागेल. 24 , 25, व 26 आईच्या आजारपणावर उपाय करावा लागेल. फेरीवाले फळविक्रेते, भाजीवाले यांना चांगला लाभ होईल. मोठ्या भावाने पूर्वी बुक केलेल्या घराचा ताबा मिळेल. नोकरदार मंडळीना दूरच्या गावी बदलीसाठी जाणे जीवावर येईल. 22 व 23 रोजी कुटुंबात जोडीदाराबरोबर चा संवाद आनंददायक राहून जूने बिघडलेले नातेसंबंध सुधारतील.
मीन :–20 व 21 रोजी तरूणां कडून घराण्याचे नांव चमकवणारया घटना घडतील. वडीलांकडील नात्याकडून मान सन्मानाचे आनंदी प्रसंग अनुभवाल. लहान मुलांच्या आरोग्यात सुधारणा होत असल्याचे जाणवेल. आईला होणार्या लाभदायक घटनांनी कुटुंबात आनंदी आनंद साजरा होईल. 22, 23 रोजी राजकीय मंडळी समोर एखादे संकट उभे राहील. तरूणांच्या खर्चिक वृत्तीत वाढ होउन गरज नसलेल्या वस्तूंची खरेदी कराल. 24, 25 व 26 रोजी शारिरीक व्यांधीनी त्रासलेल्यानी अशक्य गोष्टी करण्याच्या मागे लागू नये. अविचाराने कोणतीही स्पर्धा करू नये.
|| शुभं-भवतु ||
Aabhari Aahe Tai