Read In
शनिवार 19 डिसेंबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
शनिवार 19 डिसेंबर 2020 आज चंद्ररास मकर 07:15 पर्यंत व नंतर कुंभ. चंद्रनक्षत्र धनिष्ठा 19 :39 पर्यंत व नंतर शततारका. आज नागपूजन चा दिवस आहे.मार्गशीर्षातील शुक्लपक्षातील पंचमी व श्रावणातील शुक्लपंचमी ह्या पुण्यकारक आहेत. या दिवशी स्नान करून दान केले असता अतिशय फलदायी असते. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–मित्रमैत्रिणींच्या सहकार्यामुळे करिअरचा मोठा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडल्याचे कळेल. आजी आजोबांकडून तरूण वर्गाच्या नाना शंकाकुशंका चे निरसन होईल. लहान सहान घटनांचे पडसाद मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास देणारे ठरतील.
वृषभ :–वयस्कर मंडळीना आज कोणत्याही कामासाठी बाहेर जाण्याची गरज भासणार नाही. वृद्धाश्रमातील आजीआजोबाना प्रेमाच्या माणसांबरोबर वेळ आनंदात घालवता येणार आहे. तरूणांचा वेळ आज सत्कर्मी लागेल.
मिथुन :–जुळ्या मुलांच्या बाबतीत आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. घराची स्वच्छता करताना अचानक हरवलेला दागिना सापडेल. वर्टीगोचा त्रास असलेल्यांनी तज्ञ डाँक्टरांचा सल्ला घ्यावा. गायक व वादकांना नवीन कार्यक्रमासाठी बोलावणे येईल.
कर्क :–पुस्तकाचे वाचन करणार्यांना आवडत्या लेखकाचे दुर्मिळ पुस्तक वाचायला मिळेल. बुद्धीच्या क्षेत्रातील वृद्धांचे विचार तरूणांना मान्य होत असल्याचे बघून वृद्ध मंडळी भारावून जातील. मोबाईल फोन वरून मोठ्या पदाधिकार्यांशी संपर्क साधला जाईल.
सिंह :–पायाला दुखापत झालेल्यांनी उगाचच कांही होत नसल्याचा खोटा आव आणू नये. नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या विचाराने न चालता तज्ञांच्या सल्ल्यानेच ठरवावे. लहान मुलांच्या डोक्याला दुखापत होण्याचा धोका आहे.
कन्या :–लहान किराणा मालाचे दुकान असणार्यांना नवीन रेडिमेड पदार्थांपासून चांगला लाभ होत असल्याचे जाणवेल. नोकरीच्या ठिकाणी मँनेजर, प्रोजेक्ट मँनेजर यांच्याकडून महत्वाच्या टीप्स मिळतील. आई वडीलांसाठी महत्वाची वस्तू खरेदी कराल.
तूळ :–कलाकार व चित्रकार यांचा समावेश सन्माननीय सदस्यांमधे करण्यात येईल. शाळकरी विद्यार्थांकडून वीजेवर चालण्या यंत्राची दुरूस्ती होईल. पाण्याच्या ठिकाणापासून लहान मुलांना सांभाळावे लागेल. नोकरीनिमित्ताने लहानशा प्रवास घडेल.
वृश्र्चिक :–महत्वाच्या विषयांवर जे बोलायचे आहे ते स्पष्ट बोला. तुमच्या मनाला बोचणी लावणार्या घटना घडतील. नकारात्मक विचारांचा दृष्टीकोन बदलल्यास मनात कोणतीही भीती राहणार नाही. राजकिय मंडळींकडून कांहीच अपेक्षा करू नका व विसंबूनगही राहू नका.
धनु :–शांतपणे व धीराने काम करत राहील्यास यशाचा आलेख चढता राहील. लहान मुलांना पडण्याची व दुखापतीची भिती आहे. 8, 10 वर्षाच्या मुलांना आज सायकल हातात देऊ नका. तुम्ही करत असलेले काम वरिष्ठांच्या नजरेत आल्याने तुमचे कौतुक होईल.
मकर :–सर्वाना पुढे घेऊन जाण्याच्या वृत्तीमुळे सहकारी तुमच्यावर खुष होतील. पुरोहित व ज्योतिषी यांना अचानक कामाचा ताण जाणवेल. व्यावसायिक जुने येणे मिळण्याचे मार्ग सोपे होतील. बुद्धी चातुर्याने इतरांची मने जिंकला.
कुंभ :–कलात्मक बुद्धीमत्तेचा वापर करून एका नवीनच क्षेत्रात प्रवेश कराल. नोकरीमध्ये वरिष्ठ अधिकारी तुमच्या वागण्यातील पारदर्शकपणा तुमची प्रतिष्ठा वाढवेल. वडीलांकडून अवघड व अडलेल्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळेल.
मीन :–कधीही मदतीची अपेक्षा न करणारे तुमच्याकडे मदतीची अपेक्षा करतील. दवाखान्याशी संबंधित असलेले समाजाच्या गरजा ओळखून काम करतील. सखाजगी क्षेत्रातील अधिकारी वर्ग ग्राऊंड लेवला काम करताना जराही करणार नाही.
|| शुभं-भवतु. ||
Dhanyawad Tai