daily horoscope

दैनिक राशीभविष्य शुक्रवार 18 डिसेंबर 2020

Read In

 

शुक्रवार 18 डिसेंबर 2020 चे दैनिक राशीभविष्य

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.

daily horoscope

शुक्रवार 18 डिसेंबर 2020 आज चंद्ररास मकर दिवसरात्र व चंद्र नक्षत्र श्रवण 19:03 पर्यंत व नंतर धनिष्ठा. आज विनायक चतुर्थी. वरील दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–महिलांना आपल्या वैयक्तिक उद्धोगात कांहीसा बदल करावा वाटेल तरी त्यानुसार अभ्यास सुरू करावा. नोकरदारांना अचानक नवीन पर्याय समोर येतील. विद्यार्थ्यांनी इतरांच्या विश्र्वासावर कोणताही निर्णय घेऊ नये. कौटुंबिक प्रश्रांना आज प्राधान्य द्याल.

वृषभ :–नोकरीतील थटलेला पगार मिळण्याचे मार्ग मोकळे होतील. व्यवसायातील परिस्थिती अतिशय समाधानकारक राहील तरी आता नवीन प्रयोगाकडे वळायला हरकत नाही. महिलांनी सासुबाईंच्या प्रकृतीची काळजी घ्यावी.

मिथुन :–नोकरीतील वाद व मतभेदामूळे तडकाफडकी नोकरी सोडण्याचा प्रसंग येणार आहे पण याही परिस्थितीत बदल होईल तरी प्रसंग शांततेने हाताळा. कोर्ट प्रकरणातील जून्या अर्जावर सुनावणी होणार आहे तरी तयारीत रहा.

कर्क :–तुमच्या मनाला वाटले म्हणून ते खरे समजू नका. वस्तुस्थिती जाणून घ्या. सामाजिक स्तरावर काम करताना वैचारिक संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. आयुष्यातील घडामोडींचा कशाशीही संबंध लावू नका. कुटुंबात पत्नीबरोबर मिळुन मिसळुन काम कराल.

सिंह :–आज तुमच्या बुद्धीचा कस लावणार्‍या घटना घडतील. तत्त्वाला मुरड न घालता योग्य ठिकाणी माघार घ्यावी लागेल. दवाखान्यात अँडमिट असलेल्यांना भेटण्याचा प्रसंग टाळू नका. कामाचे महत्व ओळखून वागा.अचानक एखादा आर्थिक लाभ होईल.

कन्या :–कालपर्यंत विरोधात असलेले सहकारी आज तुमची बाजू उचलून धरतील. वरिष्ठांबरोबरचे वाद बुद्धीचातुर्याने मिटतील तरी परिस्थितीचे गांभिर्य ओळखून वागा. मित्र मैत्रिणीचा सह प्रवास घडण्याची संधी सोडू नका.

तूळ :–आर्थिक बाजू उ़ंचावत असताना पुन्हा पुन्हा व्यवसायातील क्षेत्रात बदल करू नका. मित्रपरिवाराबरोबर एखाद्या प्रोजेक्टबाबत चर्चा कराल. परदेशस्थ मित्राचा सल्ला आवश्यक वाटला तरी स्वतःच्या अभ्यासावरून ठरवा.

वृश्र्चिक :–वाद घालून कोणतेच प्रश्र्न सुटणार नाहीत. वैचारिक चर्चेला सामोरे जा. तुमचे मुद्धे इतरांसमोर टिकणार नाहीत तरी अती अट्टाहास करू नका. नोकरीत कामाचा ताणामुळे बदलिची इच्छा निर्माण होईल.

धनु :–जून्या लांबच्या प्रवासातील सहप्रवासाचीनव्याने भेट होईल. बर्‍याच दिवसापासून रेंगाळलेली कामे मार्गावर आणण्यासाठी फार प्रयत्न करावे लागणार नाहीत. आज तुमचा निश्चयच तुमच्या कामाला यशाकडे घेउन जाईल.

मकर :–सरकारी नोकरीतील अधिकार्‍यांना आपल्या अधिकाराचा विचार करताना अतिशय अडचणी येणार आहेत. व्यवसायातील घडामोडींवर विचार करावा लागेल. खाजगी क्षेत्रातील हिशोबनीसांना आर्थिक घोटाळ्याचा अंदाज येईल येणार आहे.

कुंभ :–वयस्कर मंडळीना स्कीनचा त्रास सहन करावा लागेल. सरकारी बँकेत नोकरी करणार्‍यांना कर्जाबाबतीत ईल प्रकरणे हाताळताना अडचणी येणार आहेत. जूना नात्यातील दुरावा संपण्याची चिन्हे दिसू लागतील. आई व मुलगा या नात्यातील आलेला दुरावा तुमच्या पुढाकाराने संपेल.

मीन :–महिलांना हाय ब्लडप्रेशरचा त्रास जाणवेल. सासुरवाडीकडून महत्वाच्या कामासाठी बोलावणे होईल. कमिशन एजंट्सनी आजचे वायदे काटेकोरपणे पाळावेत. खाजगी कर्मचार्‍यांनी कोणत्याही परिस्थितीत दुसर्‍याला जामीन राहू नका.

|| शुभं-भवतु. ||

 

 

One thought on “दैनिक राशीभविष्य शुक्रवार 18 डिसेंबर 2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *