daily horoscope

दैनिक राशीभविष्य गुरूवार 17 डिसेंबर 2020

Read In

 

गुरूवार 17 डिसेंबर 2020 चे दैनिक राशीभविष्य

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.

daily horoscope

गुरूवार 17 डिसेंबर 2020 आज चंद्ररास मकर दिवसरात्र व चंद्र नक्षत्र उत्तराषाढा 19:12 पर्यंत नंतर श्रवण सुरू होत आहे.. आज बुद्धाचा धनु राशीत 11:38 वाजता प्रवेश होत आहे.वरील दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मंगळवारी 15 ला धनु राशीतील रविचा प्रवेश व आजचा धनु राशीतील बुद्धाचा प्रवेश हा धनु राशीच्या व्यक्तींना किती लाभदायक व कशी बुद्धीची चुणुक दाखवणारा आहे यावरील लेख लवकरच देत आहे.

मेष :–ज्यांना सरकारी अडकलेली कामे करायची आहेत त्यांनी आज कामाचे नियोजन करावे. त्याच्या स्टेटसची माहिती घ्यावी. कामाचा वेग नेहमीप्रमाणे ठेवल्यास या कामाला वेळ लागणार नाही व 14 जानेवारीच्या संक्रांती पर्यंत काम चांगला वेग घेईल किंवा होईल.

वृषभ :–मौन ठेवण्याचे कामे होत नाहीत हे लक्षात घ्या व ज्या कामाची आतुरतेने वाट बघताय त्याविषयी चर्चा करा व आवश्यक ते संपर्क साधा त्यांच्याबरोबर बोला. वारसा हक्काबाबतचे तुमचे अंदाज खरे ठरतील. उच्चशिक्षणातील अडथळे सहजपणे दूर होणार नाहीत. पण प्रयत्न सोडू नका.

मिथुन :–विवाहेच्छूंनी जोडीदार निवडताना अती बुद्धीचा कस लावू नये. कोणीही परिपूर्ण नाही हे लक्षांत ठेवावे. भागिदारीतील व्यवसायात भागिदाराचे साथ उत्तम मिळेल मनात कांहीही शंका आणू नका. विद्यार्थी वर्गाने आत्तापासूनच अभ्यासातील मेहनत वाढविल्यास चांगले यश मिळेल.

कर्क :–सकाळपासूनच आज कामाची घाईगर्दी होणार आहे. विशेष म्हणजे महत्वाची कागदपत्रे शोधण्यात फार वेळ जाणार आहे. मनाचा चलबिचल वाढेल. दिलेली भेटीची वेळ गाठण्यासाठी उगीचच धावपळ कराल. तरूणांना आर्थिक बाबतीत नियोजनाची गरज भासेल.

सिंह :–सरकारी अधिकारी वर्गाने आपले विचार पूर्ण अभ्यासून मगच मांडावेत. पूर्वग्रह दुषित राहू नये. डॉक्टर मंडळींना अचानक मोठ्या प्रमाणातील गर्दीला सामोरे जावे लागेल.महिलांनी मनातील भावनाना वाट करून द्यावी.

कन्या:– स्वतःचा फ्लँट घेऊ इच्छिणार्यांनी आपले मत सहविचाराने पक्के करावेत. वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी करताना स्वतःची धावपळ उडेल. कुटुंबियांना आपलेसे करून वास्तवाचा विचार केल्यास भविष्यात नातेसंबंध चांगले टिकून राहतील.

तूळ :–सध्या हवेतील गारवा सांधेदुखी च्या व्यक्तींना त्रासदायक ठरेल. नव्याने व्यवसायाची सुरूवात केलेल्यांनी सरकारी योजनांची चौकशी करावा त्याचा उपयोग होईल. वयस्कर मंडळी आज भरपूर आनंदात व मजेत राहणार आहेत.

वृश्र्चिक :–बँकेची कामे करताना गोंधळ उडेल तरी अनुभवी व्यक्तीची मदत घ्यावा. प्रवासाला सुरुवात केली असल्यास दुपारी ३ नंतर येणार्या अडचणीवर मात करावी लागेल. सरकारी कामातील नियम कडक वाटतील व त्यांची भीती वाटेल.

धनु :–आजचा दिवस वेगवेगळ्या विषयाच्या चर्चा करण्यात बिझी रहाल. महिलांना ओटीपोट दुखण्याचा त्रास होईल. गर्भवती महिलांनी शारिरीक कष्ट फार होणार नाही याची काळजी घ्यावी. लहान मुलांना पोट बिघडण्याचा त्रास होईल.

मकर :–तरूणांनी आपले इगो सोडून दिल्यास ग्राऊंडलेवल वर काम करणे सोपे जाईल. तुमच्या कर्तबगारीनुसार तुम्हाला उद्धोगाची संधी मिळवता येईल. व्यवसायातील खाचाखोचांवर उगीचच भाऊ करत बसलात तर कांहीही करता येणार नाही हे लक्षात ठेवावे.

कुंभ :–ज्या स्पीडने सुरूवातीला काम करत होतात त्याच स्पीडने पुढील कांही महिने करत राहिल्यास चांगला जम बसेल व आश्र्चर्यकारक लाभ होतील. भावंडांना वैचारिक म्हणणे पटवून देण्यात यशस्वी व्हाल. राजकीय मंडळीनी मध्यस्थामार्फत आलेल्या निरोपावर विश्वास ठेवू नये.

मीन :–सततच्या कामाच्या व्यापामुळे बर्याच दिवसापासून रखडलेले काम आता सुरू करायला हरकत नाही. आज फक्क आणि फक्त जूनी राहिलेली कामेच करा व बघा चमत्कार काय होतो ते. कुटुंबाबरोबर च्या गप्पा फलद्रूप होतील. एकंदर आजचा दिवस अतिशय उपयोगी लागेल.

|| शुभं-भवतु ||

 

One thought on “दैनिक राशीभविष्य गुरूवार 17 डिसेंबर 2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *