Read In
बुधवार 16 डिसेंबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
बुधवार 16 डिसेंबर आज चंद्ररास धनु 25:47 पर्यंत नंतर मकर. चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा 20:03 पर्यंत नंतर उत्तराषाढा या दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–अडचणीच्या व बर्याच दिवसापासून थाटलेल्या कामात वडलांचा सल्ला उपयोगी पडेल.अकाउंटसचे काम करणारे तसेच चार्टर्ड अकाऊंटंट यांना वेगळ्याच गुंतागुंतीची केसमधे लक्ष घालावे लागेल. नोकरीत सहकारी वर्गाकडून चांगले सहकार्य मिळेल.
वृषभ :–जुळ्या व्यक्तींना अचानक प्रकृतीचा त्रास जाणवेल.नवविवाहित तरूणांना सासूरवाडीकडून आवडती गिफ्ट मिळेल. भाजी व फळविक्रेत्यांना चांगला फायदा होईल. खराब हवामानामुळे वयस्कर मंडळीना प्रकृतीचा त्रास जाणवेल.
मिथुन :–लहान मुलांच्या हातातील वस्तु कडे लक्ष द्यावे आज काहितरी वस्तु गिळण्याची शक्यता आहे. वयस्कर मंडळींना उचक्या लागण्याचा त्रास होईल. देवळाचे पुजारी, ज्योतिषी यांना अचानक मोठी बिदागी मिळेल. बुद्धीच्या क्षेत्रातील तरूणांना विशेष संधी मिळेल.
कर्क :–तरूणांच्या प्रेमप्रकरणात वेगळेच हिंसक वळण लागेल. महिलांनी स्वयंपाकघरात काम करताना घाई करू नये. विजेची उपकरणे काळजीपूर्वक हाताळावी. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी कष्ट करताना लाजू नये.
सिंह :–लहान विक्रेत्यांना अचानक मोठी आँर्डर मिळून मोठी कमाईची संधी मिळेल. बँकेच्या कर्ज प्रकरणातील होणारी प्रगती समाधानकारक होईल. खेळाडूंची स्पर्धात्मक खेळातील कारकिर्द वाखाणण्यासारखी राहील. ज्येष्ठांनी लहानांवर सतत राग काढू नये.
कन्या :–धान्य दुकानदारांन कायद्याच्या कचाट्यात सापडण्याचा धोका आहे. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या तरूणांना एकतर मनासारखी नोकरी मिळणार नाही किंवा मोठी तडजोड तरी करावी लागेल. स्त्रीयांना आज संसारात फारच कष्ट होतील.
तूळ :–लहान भावंडाच्या व्यवसायासाठी अचानक मोठी रक्कम खर्च करावी लागेल. खरेदी विक्रीच्या व्यवसायातील दलालांना एकदम आर्थिक लाँटरीच लागेल. नोकरीत दुसर्याच्या वाणीचे कामही तुमच्यावर सोपवले जाईल.
वृश्र्चिक :–पाण्याच्या शुद्धतेची विशेष काळजी घ्या. बर्याच दिवसापासून न सापडलेली कागदपत्रे सहजपणे अचानक सापडतील. महिलांना आगीपासून धोका संभवतो तरी स्वयंपाकघरातील कामे सांभाळून करावीत. नेतृत्वाची हौस पूर्ण होईल.
धनु :–कुटुंबात एखादे धार्मिक कार्य होईल व त्याची सर्व जबाबदारी तुमच्यावर येईल. पूर्वी ठरलेला प्रवासाचा बेत रद्ध होईल. मनातील विचारांची गर्दी स्वस्थ बसू देणार नाही. मन मोकळे करण्याची तीव्र ईच्छा नात तशाच राहणार आहे. कोणासमोरही उतावीळ होऊ नका.
मकर :–शाळकरी मुलांनी केलेल्या लहान प्रोजेक्टला मोठी प्रसिद्धी मिळेल.. व शिक्षकांना सन्मान मिळेल. मंदिराचे पुजारी, मठाधिपती यांना अडचणीला सामोरे जावे लागेल. आपल्या रागावर ताबा ठेवल्यास कुटुंबात पुढे होणारे वाद टळतील.
कुंभ :–औषधी उत्पादनाच्या क्षेत्रातील अधिकारी वर्गास सरकारी चौकशीला सामोरे जावे लागेल. महिलांनी मनातील भावना इतरांसमोर व्यक्त करू नयेत. ज्याच्या पायाला दुखापत झाली आहे अशांनी ताबडतोप डाँक्टरांचा सल्ला घ्यावा.
मीन :–पाण्यात राहून माशांशी वैर करू नये हे तंतोतंत पटेल. बँकांची डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड सांभाळा त्यात कांहीतरी गडबड होण्याचा धोका आहे. आज वयस्कर मंडळींचा गप्पांचा फड रंगणार आहे. व त्याचबरोबर खाण्यापिण्याची पण चंगळ होणार आहे.
|| शुभं-भवतु ||