daily horoscope

दैनिक राशीभविष्य मंगळवार 15 डिसेंबर 2020

Read In

 

मंगळवार 15 डिसेंबर 2020 चे दैनिक राशीभविष्य

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.

daily horoscope

मंगळवार 15 डिसेंबर 2020 आज चंद्ररास धनु दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मूळ 21:30 पर्यंत. आज रविचा धनु नक्षत्रात 21:32 ला प्रवेश करत आहे व मूळ नक्षत्रातही 21:32. ला प्रवेश करत आहे. आज देवदीपावली असून मार्तंडभैरव षडरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–तुमच्या आजच्या कामातून तुमच्या बुद्धीमत्तेची चुणुक दाखवाल. कामाचा व्याप सांभाळताना आज दमायला होणार आहे. कोचिंग क्लास चालवणार्‍यांना आँन लाईन शिकवण्याचा फार मोठा व्याप वाढणार आहे. तरूण वर्गास हातातील प्रोजेक्ट अतिशय महत्वाचा ठरणार आहे.

वृषभ :– बुद्धीच्या क्षेत्रातील तरूण वर्गाकडून उल्लेखनीय काम करता येणार आहे. बिल्डर मंडळीना नवीन आशेचा किरण दिसेल व जून्या क्लायंटसचे नव्याने येणे होईल. तरूणांना सासूरवाडीकडून आवडती गिफ्ट मिळेल. महिलांना प्रकृतीचा त्रास संभवतो.

मिथुन :–कालपासून ज्या विषयाचा विचार करत आहात अगदी त्या विषयास पूरक अशी घटना घडेल. कुटुंबात विवाहेच्छूंच्या कार्याविषयी बोलणी, चर्चा पुढे सरकतील. हार्टच्या पेशंट्सना तब्बेतीत सुधारणा झाल्याचे जाणवेल व फ्रेश वाटू लागेल.

कर्क :–आज नोकरीतील कामात तुम्ही तुमच्या बुद्धीची ताकद दाखवाल व सगळे तुमच्यापुढे नतमस्तक होतील. संशोधनाचे कार्य करणार्‍यांना आपल्या कामातील गती समाधानकारक असल्याचे मान. गुरूवर्यांकडून कळेल. गर्भवती महिलांनी आज आरामच करावा.

सिंह :–मुलांकडून त्यांच्या करिअर विषयीची मनाला समाधान देणार बातमी कळेल. तरूण मुलेमुलींची अभ्यासासाठी जागरणे होतील. आपण घेतलेला निर्णय बरोबर असल्याचा अनुभव येईल. सामाजिक कार्यकर्त्यानी कोणतही गोष्ट करताना सारासार विचार करावा.

कन्या :–प्रेमाच्या व्यवहारातील अडचणी दूर होऊन नाते पक्के करण्याचे ठरेल. अधिकारी मंडळीना आपल्या प्रतिष्ठेस जपावे लागेल. लहान मुलांच्या आरोग्याची काळजी निर्माण होणार आहे तरी जागरूक रहा. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल.

तूळ :–व्यावसायिकांनी स्वत:ची खाजगी माहिती इतरांसमोर उघडी करू नये. फेरीवाले, लहाव रस्यावर बसून विक्री करणार्यांना अचानक मदतीचा हात सापडेल. मैत्रीच्या संबंधातून मानसिक समाधान मिळेल. वयस्कर मंडळीनी ब्लडप्रेशर बाबत सावध रहावे.

वृश्र्चिक :–अडकलेल्या कामाचा तिढा सोडवण्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागेल. विद्यार्थ्यांनी इतरांच्या नादाने आपल्या ध्येयापासून लांब जाऊ नये. आहारतज्ञ डाँक्टर्सना गुंतागुंतीची केस हाताळावी लागेल.

धनु :–नवदांपत्याच्या कुटुंबात नवीन पाहुणा येणार असल्याची गोड बातमी कळेल. वृद्ध व वयस्कर मंडळीना तरूणाईची स्वप्ने पडतील. नवीन एनर्जी असल्याचे जाणवेल. महत्वाच्या कागदपत्रांवर सह्या करताना त्यावरील अटी व शर्ती समजून घ्या.

मकर :–बसमधून किंवा रेल्वेने प्रवास करताना जून्या मैत्रीचा आनंद मिळेल. वडिलांच्या प्रकृतीची विचारपूस करूनही मनाचे समाधान होणार नाही. कोणत्याही प्रकारची वादग्रस्त विधाने करू नका कायद्याच्या कचाट्यात अडकाल.

कुंभ :–लहान मुलांना नवख्या, अनोळखी माणसांपासून सांभाळा. लहान दुकानदारांना व्यवसाय वृद्धीचे मार्ग सापडतील. पोलिस, होमगार्ड यांना वरिष्ठांच्या दडपणाखाली काम करावे लागेल. अजोळकडील मंडळींची काळजी वाढेल.

मीन :–बोलतांना शब्द काळजीपूर्वक वापरल्यास पुढील मानसिक त्रास वाचेल. वडिलांच्या पायाला दुखापत होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील जबाबदार्‍या बुद्धी कौशल्याने फार पाडाल. कोणाच्याही आर्थिक व्यवहारात सल्ला देऊ नका.

|| शुभं-भवतु ||

 

One thought on “दैनिक राशीभविष्य मंगळवार 15 डिसेंबर 2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *